नवीन लेखन...

भावनांची घरें

घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी   ।।धृ।। वास्तुकला सुंदर   रंग त्याचे बहारदार आकर्षक वाटणार  परी निवड करा जपुनी, घ्याहो निरखूनी   ।।१।। ही घरे भावनांची    त्यांत छटा विचारांची भर पडतां श्रद्धेची    जीवन जाईल तसेंच होऊनी, घ्याहो  निरखूनी   ।।२।। राग लोभ अहंकार   मद मत्सर हे विकार ह्यांची ती घरे असणार   शोधा विचार करुनी, घ्याहो निरखूनी    ।।३।। दया क्षमा शांति   […]

आशिर्वाद

घक्के देऊन आली   धरणीकंप करुन भावना मनीं चमकली    बनेल ही महान   ।। बालपणाची मुर्ति   गोंडस तुझें भाव तेज चेहऱ्यावरती   घेती मनाचे ठाव   ।। शाळेतील जीवन   दाखवी मार्ग विजयाचे सर्वामध्यें चमकून   प्रमाण मिळे यशाचे   ।। एकाग्रचित्त करुनी   मिळवलेस तूं यश प्रतिष्ठा टिकवूनी   असेच जा सावकाश   ।। विजे सारखी चमकूनी    झेप घे नभांत प्रकाशमान होऊनी   यशस्वी हो जीवनांत   […]

प्रभू मिळण्याचे साधन

ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।। अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।। अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।। सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।। यंत्र असे साधन   जाणण्या कांहीं गोष्टी […]

संतुलन

आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।। नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।। सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।। वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।। एकाची शक्ती बनते    दुसऱ्यास […]

वलय

सतत फिरत राही, चक्र जीवनाचे विविधता पाही ,  रंग आयुष्याचे सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com        

भावनेच्या आहारीं

नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।। प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं नकोस विसंबून    आत्मविश्वास […]

आत्म गुरू

गुरूचा महीमा थोर | उघडूनी जीवनाचे द्वार सांगूनी आयुष्याचे सार | मार्ग दाखविती तुम्हां  १ वाटाड्या बनूनी | भटकणे थांबवूनी मार्गासी लावूनी | ध्येय दाखवी तुम्हां  २ न कळला ईश | न उमगले आयुष्य दु:ख देती जीवन पाश | बिना गुरू मुळे  ३ अंधारातील पाऊल वाट | ठेचाळण्याची शक्यता दाट प्रकाशाचा किरण झोत | योग्य रस्ता […]

दुःख

दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे   आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो   आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना   इतरांसाठीं आहे ती भावना  उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी   शोक भावना दाखवी तुझ्या […]

उपकार

उपकार करुन त्याने   मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी   आभार ना मानले केली नाही परतफेड   उपकाराची मी कामाचे होते वेड   सतत मग्न कामी कामाच्या मार्गांत   चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत   यश साधले अर्धवट खंत वाटली मनां   आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा   उशीर झाला फार   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com     […]

मातीचा पुतळा

मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी   ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला   ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना    ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

1 4 5 6 7 8 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..