नवीन लेखन...

आत्म्याची हाक

उचंबळूनी येतील शब्द,  हृदयामध्ये दडले जे  । संदेश असता सर्वांसाठी,  कुणी न म्हणतील ते माझे  ।। जे जे काही स्फूरूनी येते,  जेव्हा अवचित समयी  । हृदयामधली हाक असे,  ठरते आनंद दायी  ।। ‘आनंद’ आहे कोणता हा,  अन् येई कोठूनी  । अंतर्यामी सर्वांच्या ,  सदैव राही  बैसूनी  ।। बाहेर पडूनी झेप घेई   दूजा हृदयावरी  । तेथेही जो […]

देह एक बदलणारे घर

बदलत गेलो घरे मी माझी, आज पावतो कितीक तरी  । पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी  ।।   बालपण हे असेंच गेले, फिरता फिरता गावोगावी  । वडिलांची  नोकरी होती, धंदा करणे माहीत नाही  ।।   पाऊलवाट तीच निवडली, मुलाने देखील जगण्यासाठी  । तीन पिढ्या ह्या चालत राही, एका मागून एकापाठी  ।।   गेले नाहीं आयुष्य सारे, […]

मन तन बंधन

चंचल मन हे चंचल धारा,  पंख पसरीत उडे भरारा  । झेप घेवूनी उलटी सुलटी,  लक्ष तयाचे चमकत तारा  ।। लुकलुकणारे तारे अगणित,  नभांग सारे प्रसन्न चित्त  । ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती,  झोके घेते सहज अविरत  ।। वेळ क्षणाचा पुरतो त्याला,  टिचक्या टपल्या मारीत गेले  । आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले  ।। कोठून येते त्याला शक्ती, […]

दर्शनाची ओढ

पांडूरंगाचे दर्शन घेण्या,  गेला पंढरपूरी  । चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी  ।।   आजपरी शरीर दुबळे साथ देईना  । मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना  ।।   आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी  । भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी  ।।   आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे  । अंगणीत जमले भक्त गण […]

मशाल

श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर  । विविध नामे परि,  दुर्बलांची करण्या कामे  ।१। अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी  । दैवी शक्ती अंगी,  अंधारी चमकली ठिणगी  ।२। मशाल घेवून हाती,  आला धावत पुढती  । अति वेगाने, सर्वांची उजळीत मने  ।३। कर्म योग आणि भक्ती,  ह्या तीन ईश्वरी शक्ती  । एकत्र जाहल्या,  मशालीत त्या समावल्या  […]

आज-उद्या

‘उद्या’ साठी जगतो आम्हीं   राहून मृत्युच्या दाढी  । भविष्यांतील सुख कल्पूनी   आज सारे कष्ट काढी  ।। ‘आज’ राहतो नजिक सदैव    ‘उद्या’ चालतो पुढे पुढे । आज नि उद्या यांची संगत     कधीही एकत्र न पडे  ।। कष्ट ‘आज’ चे शिरीं वाहूनी   ध्येय ‘उद्या’ चे बघती । हातीं न कांही पडते तेव्हां     निराश सारे होती  ।। समाधान  चित्तीं आणण्या […]

चाकोरी

नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे  । कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे  ।। कसा आलो या जगतीं    ठाऊक नव्हते कांही मजला  । कसा वाढलो हलके हलके     जाण आहे याची मला  ।। जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे  । काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे  ।। परिस्थितीच्या […]

तूच माझा ईश्वर

मनांत ठसले रूप तुझे,  येते नयना पुढे  । रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।। शरीर जरी सुंदर मिळे  । प्रयत्नांनी तूंच कमविले  ।। चपलता ही छाप पाडीते  । लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे  ।१। हासणे खेळणें आणि चालणें  । ‘ढंगदार’  तुझे बोलणे  ।। शरीरामधल्या हालचालींना  । सहजपणाचे वळण पडे मनी ठसविले रूप […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत, होत नसे निचरा….१, गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे, पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे….२, पेला पेला जमवूनी, कलश भरून आला, नाहून जाता त्यात, देह भान विसरला….३, सांडता पाणी वाहे, पसरते चोहीकडे, आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सर्वात तोच आहे

अगणित तारे जीव जीवाणूं  । अथांग विश्व अणू रेणू  ।। रंगरूप हे नेत्री दिसती  । भिन्न भिन्न राहूनी जगती  ।। रस गंध दरवळे चोहीकडे  । जगण्याचा तो मार्ग सापडे  ।। हे जर आहे रूप ईश्वरी  । बघती त्याला आमुच्या नजरी  ।। सुख दु:ख ही त्याची निर्मिती  । फिरे सदा आमचे भोवती  ।। निराकार निर्गुण,  म्हणती त्याला  […]

1 5 6 7 8 9 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..