नवीन लेखन...

अरसिबो दुर्बिणीचा शेवट…

दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अरसिबो दुर्बीण कोसळली… वेस्ट इंडिजच्या परिसरातील प्युर्तो रिको या बेटावर असलेली ही जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून यापूर्वीच व्यक्त केली गेली होती! या दुर्बिणीच्या ३०५ मीटर व्यासाच्या तबकडीवरून परावर्तित होणारे रेडिओ किरण या तबकडीपासून सुमारे दीडशे मीटर उंचीवर असणाऱ्या साधनांद्वारे टिपले जात होते. ही साधनं […]

अणुस्फोट आणि पाऊस

पावसाळी ढगांतील पाण्याचे थेंब हे विद्युतभारित असतात. किंबहुना, धूळ किंवा हवेतील तत्सम पदार्थांवरील विद्युतभार पावसाळी ढगांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो. तसंच ढगातील पाण्याच्या थेंबांच्या आकारावरही या विद्युतभाराचा परिणाम होत असल्यानं, या विद्युतभारावर पावसाची तीव्रता अवलंबून असते. हवामानाचा अभ्यास करणारे संशोधक या विद्युतभाराचा आणि पावसाचा संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न पूर्वीपासून करीत आहेत. अलीकडेच केल्या गेलेल्या एका संशोधनासाठी, […]

सावलीपासून वीज!

सौरऊर्जेशी आपला व्यवस्थित परिचय आहेच. यात सूर्यकिरण विशिष्ट प्रकारच्या पट्ट्यांवर पडल्यावर वीज निर्माण होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता सावलीपासून अशी ऊर्जा निर्माण करणे शक्य झाले आहे. अर्थात अशा प्रकारे ऊर्जा निर्माण करण्यासठी सावलीबरोबरच प्रकाशाचीही गरज असते. सावलीपासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या या साधनाचा काही भाग हा सावलीत ठेवलेला असतो, तर काही भाग हा प्रकाशात असतो. सौरऊर्जा […]

आशियाचं प्रवेशद्वार

आफ्रिकेतून आशियात जाण्यासाठी माणसानं कुठला मार्ग वापरला असावा, हा मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीनं पूर्वीपासून कुतूहलाचा विषय ठरला आहे. तो अरेबिआतून आशियात शिरला असण्याची शक्यता खूपच आहे. मात्र त्यानं अरेबिआ नक्की कुठून पार केला, याबद्दल संशोधकांत एकमत नाही. काही संशोधकांच्या मते तो खालच्या बाजूनं – दक्षिण अरेबिआतून – तांबड्या समुद्रामार्गे आशियात शिरला असावा; तर काही संशोधकांच्या मते, तो […]

शिटीच्या भाषा

शिटीचा आवाज किती दूरपर्यंत पोचेल हे त्या-त्या परिसरावर अवलंबून असतं. घनदाट जंगलात हा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत पोचतो तर, डोंगराळ भागातल्या काही ठिकाणी तो तब्बल आठ किलोमीटरपर्यंतही पोचू शकतो. […]

शहरी खाणकाम

इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात तांबं तर असतंच, परंतु त्याशिवाय इतर सुमारे तीस मूलद्रव्यं असतात. यातील काही मूलद्रव्यं ही या वस्तूंच्या इलेक्ट्रॉनिक भागांत विशिष्ट उद्देशानं, मुद्दाम वापरलेली असतात; तर काही मूलद्रव्यं ही मुद्दाम वापरलेल्या मूलद्रव्यांत अपद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. या सर्व मूलद्रव्यांत ऱ्होडिअम, पॅलाडिअम, चांदी, सोनं, यासारखे दुर्मीळ आणि उपयुक्त धातूही असतात. […]

वूली मॅमथचा दूरसंचार!

वूली मॅमथ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं वय जसं वाढत जातं, तसं त्यांच्या सुळ्यांत काळागणीक नवेनवे थर जमा होऊन सुळ्याची जाडी वाढत जाते. त्यामुळे या प्राण्यांच्या सुळ्यांतील या थरांची संख्या मोजून त्यांचं वय समजू शकतं. […]

महावीज !

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी कडाडलेल्या या विजेची, आकाशातली लांबी सुमारे ७०९ किलोमीटर इतकी प्रचंड होती. ही वीज दक्षिण ब्राझिलच्या पूर्वेकडील अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यापासून ते पश्चिमेकडील अर्जेंटिनाच्या सीमेपर्यंत पसरली होती. जागतिक हवामान संघटनेनं केलेल्या एका विश्लेषणात या महाविजेचं अस्तित्व स्पष्ट झालं. […]

धावणारा काळ

आपली घड्याळं ही दिवसाच्या या चोवीस तासांच्या कालावधीवर आधारलेली आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणा काळातील बदलामुळे आपली घड्याळं ही अधूनमधून पृथ्वीप्रदक्षिणेशी जुळवून घ्यावी लागतात. पृथ्वीचा वेग बहुधा कमी होत असल्यानं, दिवसाचा कालावधी वाढत असतो. दिवस चोवीस तासांचाच असण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं मागे न्यावी लागतात. यासाठी घड्याळ किंचितसं थांबल्याचं मानलं जात. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..