नवीन लेखन...

नववधू सखे

अंग हळदीत न्हाले म्हणून हुरळू नकोस गं आता हळदीचा रंग रोज अनंत छटांत गं अक्षता त्या रंगीत येता वाट्यास गं आता तसे शुभ्र कण निवडून तू रांध गं तुझ्यातले जे भले बुरे दिसेल अगदी उठून गं आधी लपेटी सारे मायेच्या मखमली पदरी गं बोल लावील कोणी तेव्हा कोसळून उन्मळू नको गं समजून उमजण्या वेळ लागे तेव्हा […]

वेडा चंद्रास्त

केशरी क्षितिजी त्या चंद्राची कोर सोबत चांदणी फिरते सभोवार दाटलेल्या सांजवेळी परतून येई सारी पाखरं नसे उजेड संपूर्ण नाही काळोख फार सोबती निघे तो चंद्र जिथवर जाई नजर जणू सखा सोबती प्रेमळ मृदू अलवार निर्मळ नितळ मनी उगी उठे हुरहूर कातळास का कधी सांग फुटेल पाझर रेंगाळू नकोस तेथे तू वेळी सावर आता मनास वेड्या तू […]

मोबाईल

आता तर एक वर्षाच्या मुलालाही आई म्हणण्या आधी मोबाईल म्हणता यायला लागलय! अगदी खरं, पण याबाबतीत काही नव्याने विचार करावा असं वाटलं, आणि आपली आई – आजी यांनाही मोबाईल सहजगत्या वापरता यावा म्हणून हा लेखन प्रपंच ! […]

सोबत

मिट्ट काळोख इथे आसपास दिसेना कुठे वाट होतात नको ते भास वाटते जणू थांबले नकळत श्वास ऐकू येतात आता हृदयाचे ठोके खास सोबतीला फक्त किर्रर्र शांत अधिवास स्थिर नाही चित्त फक्त भीतीचा आभास अशात येई हाक सख्या घेई मन तुझा ध्यास तिरीप आली उजेडाची मज येई तुझा तोच सुवास सोबत किती गरजेची हे जाणवले, लागली आस […]

थोडं थांबूया

किती तो मोह आता तरी आवर गरजेचं खरं काय याचा करूया विचार आधीची पिढी मानी समाधान खरं पोटापुरत जगणं आपलं आपण बरं एक पिळा दोरीवर दुसरा जोड अंगावर ठेवणीतले एखाद पातळ खणात नसे गच्च अडगळ नसे कधी अतिरिक्त ताण न ऋतू बदलता वरचेवर आजार तृप्त जेऊन सकस घरगुती अन्न बाळसे असे कायम अंगावर टेकता पाठ शांत […]

एक्झिट

कधीतरी एक्झिट घायचीच ना, घेऊयात कि आरामात आलंय कोण इथे थांबायला, जाऊयात कि आरामात एक्सिट घ्यावी अशी कि कोणालाच कळणार नाही थांबवायचे म्हटले तरी शोधूनही सापडणार नाही उगाच त्रास नको कोणा, नकोत वाया टिपे गाळाया इथे प्रत्येकालाच कोण व्याप, सगळेच म्हणतात उचला चला उरकूयात कोणताही असो प्रसंग काट्यावरच सरकूयात आज मी गेलो… उद्या तू येणारेस रडतोस […]

बाबा

नेहमीच तिन्हीसांजेला वाट पाहीली आमचे बाबा घरी कधी येतील? मायेचा पंख पसरून कुशीत कधी घेतील परिराणीची गाणी कि गोष्ट आज सांगतील? नेहमी सांगे आई, कामात गुंतले असतील निज बाळा आता, आत्ता इतक्यात येतील वाट पाहून पाहून डोळे जाती थकून दिवा जाई विझून नि रात्र जाई सरून बाबा येण्याची रात्र कधी उगवलीच नाही गोड गोष्टींच सुख कधी […]

ओंजळीतली फुले

कधीतरी दे तुझ्या ओंजळीतली फुले, सुगंधाने भरू दे माझ्या अंगणातले झुले कधीतरी ये वावटळीच्या वाऱ्याला घेऊन, उधळून दे मनातले सगळे पाश सारे तोडून कधीतरी ये चिंब ओली बनून माती, जीव तळमळेल फक्त त्या वेड्या सुंगंधासाठी कधीतरी दे तुझ्या मनातले थोडे जग, व्यापून उरेन इतका, कधी देऊन तर बघ… — वर्षा कदम.

कृष्णसखी

थांब थांब मोहना, आर्त वेणू वाजवू नकोस तुझ्याचसाठी वेडी ही , अजून तिला भारू नकोस थांब जरा मोहना, असा मल्हार छेडू नकोस होऊन जाईल चिंब धरणी, का उसंतही देऊ नकोस? थांब जरा मोहना असा तू नाचू नकोस मनीच्या या झंकारल्या तारा, अजून त्या तोडू नकोस थांब आता मोहना असा तू बहरू नकोस भरल्या या तरुवर आता […]

ताई

आज ती येऊन गेली पोटातली माया ठेऊन गेली इतक्या दिवसांच पोरकेपण क्षणात सार मिटवून गेली आज ती येऊन गेली भाच्याला पापा देऊन गेली खेळणी आणि पैसे थोडे खाऊसाठी देऊन गेली आज ती येऊन गेली सासर माहेरचं बोलून गेली तिच्या माझ्यातलीच काहीं गुपिते मनामनामध्ये साठवून गेली. आज ती येऊन गेली हळदीकुंकू घेऊन गेली तोंडभरून आशीर्वाद अन घर […]

1 2 3 4 5 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..