नवीन लेखन...

तेज

किरणात चमक ती असूनी, तेजोमय भासे वस्तूंचे अंग, सूक्ष्म अवलोकन करीता, कळे तेज ते, वस्तूचाच भाग ।।१।।   जसे तेज असे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते दृष्टी मधले किरणे देखील, सर्व जनांना हेच सांगते ।।२।।   तेजामुळेंच वस्तू दिसती, विना तेज ती राहील कशी, तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी ।।३।।   डॉ. भगवान […]

कल्पकतेमुळे निराशा

निराशेचे बीज पेरतो,  आम्हीच आमच्या गुणानें, विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।।   जाणूनी ईश्वरी स्वरूप,  प्रतिमा ती मनीं बसवी, धडपड चालते सतत,  तशीच प्रतीमा दिसावी ।।२।।   तपसाधना ती बघूनी,  कित्येकदा मिळे दर्शन, परि केवळ अज्ञानाने,  न होई त्याचे अवलोकन ।।३।।   सभोवतालच्या वस्तूंमध्यें,  जाण तयाची येते, निसर्ग रम्य सौंदर्यात,  भावना तशी उमटते […]

बंदीस्त करा मनाला

वातावरणी वस्तू पडतां, नाश पावते लवकर ती, हवा पाण्याच्या परिणामानें, हलके हलके दूषित होती ।।१।।   ठेवूं नका उघडयावरती, वस्तू टिकते निश्चितपणे, दूषितपणाला बांध घालता, कसे येई मग त्यात उणे ।।२।।   बाह्य जगातील साऱ्या शक्ती, आघात करती मनावरी, दूषिततेचे थर सांचूनी, मनास सारे दुबळे करी ।।३।।   देहामध्यें बंदीस्त ठेवून, एकाग्रचित्त करा मनाला, कांहीं न […]

सारेच खेळाडू

खेळाच्या त्या मैदानीं, रंगात आला खेळ, मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ ।।१।।   खेळाच्या कांहीं क्षणी, टाळ्या शिट्या वाजती, आनंदाच्या जल्लोषांत, काही जण नाचती ।।२।।   निराशा डोकावते, क्वचित त्या प्रसंगीं, हार- जीत असते, खेळा मधल्या अंगी ।।३।।   सूज्ञ सारे प्रेक्षक, टिपती प्रत्येक क्षण, खेळाडू असूनी ते, होते खेळाचे ज्ञान ।।४।।   मैदानी उतरती, ज्यांना […]

नशीब

का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें, यत्न होता भगिरथी, नशीब येईल संगे ।।१।।   प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें, यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते ।।२।।   प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल, इच्छा शक्ती प्रभावानें, नशीबही बदलेल ।।३।।   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

तमोगुण

राज्य तमाचे येथें बाह्य जगावरती, म्हणून दिसे आम्हां, विध्वंसक प्रवृती ।।१।।   नाश करण्यासाठीं शक्तीच हवी येथे, हेच रुप शिवाचे, समजण्या अवघड जाते ।।२।।   जागा करु देई, नविन घटनांना, चक्र कसे चालेल, न मिटवता त्यांना ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो, घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी, लाखोली देई तिजला  ।।१।।   संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी, अमंगळ ती ठरली।।२।।   आकर्षक रूप माझे, लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी, केले सारे तूंच फस्त ।।३।।   परि मिळतां तुझा तो, अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी, मिळे हा नरकवास ।।४।।   डॉ. भगवान […]

काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी, दुर्घटना ती घडली, अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली ।।१।।   प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले, वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले ।।२।।   घिरट्या घालीत काळ आला, झडप घातली त्याने, वेळ आली नव्हती म्हणूनी, बचावलो नशिबाने ।।३।।   अपमान झाला होता त्याचा, सुडाने तो पेटला, थोड्याशाच अंतरी जावूनी, दुजाच बळी घेतला […]

विश्रांती

धावपळीचे जीवन सारे, मिळे न कुणा थोडी उसंत विश्रांतीच्या मागे जाता, दिसून येतो त्यातील अंत ।।१।।   चैतन्यमयी जीवन असूनी, चक्रापरी ते गतीत राही चक्र थांबता क्षणभर देखील, मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।।   थांबत नसते कधीही जीवन, अंत ना होई केंव्हां त्याचा निद्रा असो वा चीर निद्रा, विश्रांती ही भास मनीचा ।।३।।   थकून जाई […]

आत्म्याचे मिलन

आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।   देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।   कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर […]

1 2 3 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..