नवीन लेखन...

निरंजन – भाग ५१ – गुरुतत्व!

माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी… […]

निरंजन – भाग ५० – शुभ असावा लोभ…

लोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा… […]

निरंजन – भाग ४९ – घाव शिल्पकाराचे

एका खेडेगावामध्ये गणपती बाप्पांचं एक खूप जुन्या काळातील मंदिर होतं. सर्व बाजूंनी कुठे कुठे थोडसं मंदिराचं बांधकाम ढासळलेलं होतं. पण तरीही लोकांची गर्दी तिथे खूप होत असे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये श्री गणेशांची मूर्ती देखील तितकीच पूर्वीची…. एके दिवशी सर्व गावकऱ्यांनी मिळून गावामध्ये दरवर्षी होणाऱ्या सभेमध्ये, मुख्य पदाधिकाऱ्यांसमोर या मंदिराच्या बांधकामाबद्दल विषय मांडला. सर्वांनाच हा विषय योग्य वाटला. […]

निरंजन – भाग ४८ – स्वभाव…

जर आपला स्वभाव चांगला असेल आणि लोकांना आकर्षित करणारा असेल, तर लोक आपल्याजवळ येण्यासाठी उत्सुक होतील, म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते, आवश्यक असतो तो आपला स्वभाव. जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो, अश्याच व्यक्तींना लोक आपलेसे करतात. […]

निरंजन – भाग ४७ – आपल्या प्रत्येक देण्यामध्ये येणं हे आहेच

काय परिणाम होईल हे माहिती नसताना देखील, जेव्हा जयदीपने विश्वासाने स्वतःजवळ जे पण आले ते देण्याची तयारी ठेवली तेव्हाच त्याने त्या मोबद्ल्यात कितीतरी जास्त पटीने सुख मिळवले. जेव्हा आपण आपली मनस्थिती बदलतो तेव्हाच आपण आपल्या परिस्थितीत बदल घडवु शकतो. […]

निरंजन – भाग ४६ – रहस्य!

गुरुंची साथ मिळालेल्या शिष्याचा उद्धार हा निश्चित स्वरुपात होणारच. त्याच्या प्रगतीमध्ये कोणतीही अडचण येत नाही. त्याला जिवनामधल्या संकटांना सुक्ष्म रुपात पाहण्याची एक अलौकीक दॄष्टी मिळते. आणि आपल्या शिष्याला त्याच्याही कळत-नकळत त्याच्यातील अवगुणांपासुन त्याची सुटका करणे हे साक्षात सदगुरुचं वैशिष्टय…. […]

निरंजन – भाग ४५ – स्पर्श परिसाचा!

संत आणि ऋषींची संगत म्हणजे जणु परीस स्पर्शाचा अनुभव… ज्यामुळे जीवनाचं सोनं होतं. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे साक्षात परमेश्वराची भेट होते. हे देखील तितकेच खरे. असाच एक संत पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या काळात होऊन गेला. याचं नाव आहे भागवत. […]

निरंजन – भाग ४४ – दंगले देऊळ संतध्यानात

“जय जय राम कृष्ण हरी” जपत-जपत श्री संत नामदेवांची संत मंडळी खूप मोठ्या उत्साहाने एकदा जंगल पार करीत होती. हा प्रवास सुरू असतानाच वाटेमध्ये त्यांना महादेवांचे एक भव्य मंदिर दिसते. सर्वांची उत्कट इच्छा होते की, आपण सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे दर्शन घ्यावे. […]

निरंजन – भाग ४२ – अहंकाराला चुकीची कबुली नसते

एका राज्यामध्ये एक सुप्रसिद्ध नामवंत मूर्तिकार राहत होता. त्याचे नाव होते. इंद्रजीत… मूर्ती घडविण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याजवळ होते. तो अगदी हुबेहूब आणि जिवंत मुर्त्या घडवित असे. त्याच्या कलाकौशल्याला परदेशातही मागणी होती. राज्यात कित्येकदा त्याला त्याच्या या कलेबद्दल पुरस्कार मिळाला होता. […]

1 2 3 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..