नवीन लेखन...

दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=j-HJUR5tcYs[/embedyt]

आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लीक करा.

जर तुम्हाला वजन घटविण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्यास वेळ नसेल, तर घरच्याघरी दोरीवरच्या उड्या मारणे हा चांगला पर्याय असू शकतो. सतत दहा मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्याने सुमारे शंभर कॅलरीज खर्च होतात. यासाठी तुम्ही घरामध्ये, एखाद्या पार्कमध्ये, किंवा कोणत्याही मोकळ्या ठिकाणी हा व्यायामप्रकार करू शकता. या साठी तुम्हाला एका चांगल्या प्रतीच्या स्किपींग रोपची व तुम्हाला आरामदायी वाटतील अश्या स्पोर्ट्स शूजची आवश्यकता आहे.

दोरीउड्या हा खेळाडुंसाठी एक आदर्श व्यायाम आहे. पायांची चपळता वाढवण्यासाठी, पायांच्या हालचालींमध्ये सुसूत्रता येण्यासाठी, पोटर्यांचे-मांड्यांचे व नितंबांचे स्नायू सुदृढ व प्रमाणबद्ध होण्यासाठी, हातांचे स्नायू सशक्त व लवचिक होण्यासाठी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हृदयाला सक्षम करण्यासाठी व पर्यायाने तुमचा दम वाढवण्यासाठी दोरीउड्या हा व्यायाम निश्चित उपयुक्त आहे. त्यामुळे धावपटू, टेनिस व बॅडमिंटनपटू, बॉक्सर्स, मार्शल आर्टस्चे खेळाडू यांना; किंबहुना कोणत्याही खेळामध्ये खेळाडूची क्षमता वाढवण्यासाठी तो उपयुक्त आहे, यात शंका नाही.
लहानपणी मारलेल्या दोरीच्या उड्या आपण मोठेपणी पूर्णपणे विसरुन जातो. पण ही गोष्ट ऐकून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल. कारण दोरीच्या उड्या मारणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे तुमच्या प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो आणि कॅलरीज जळण्यासही मदत होते.

दोरीच्या उड्यांमध्ये आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम होत असल्याने इतर कोणत्याही व्यायामापेक्षा हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा ठरतो. सलग ठराविक वेळ दोरीच्या उड्या मारल्यास त्याचा शरीराला अतिशय चांगला उपयोग होतो. यासाठी वयाचेही बंधन नसते. दोरीच्या उड्या मारल्यानं वजन कमी करण्यास मदत होते. रोज अर्धा तास दोरीच्या उड्या मारल्यानं ५०० ग्रॅम वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे नियमित व्यायाम प्रकारांमध्ये दोरीच्या उड्यांचा समावेश असावा.

 

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..