नवीन लेखन...

प्रेझेंट देण्यासाठी वेगळी पाकिटे !

0005.. हल्ली भेटवस्तू द्यायच्या असतील तर पुन्हा एकदा गहन प्रश्न पडायला लागलाय काय द्यायचे ? पूर्वी लग्नामध्ये ५-५,६-६ मिल्क कुकर्स,कफ लिंक्स,४/५ लेमन सेट प्रेझेंट आलेले असायचे. नंतर फ्लॉवर पॉटस, स्टीलची भांडी,घड्याळे,पेन्स,रुमाल. आता अगणित निरुपयोगी चीनी वस्तू,गणपतीच्या विविध मूर्ती,नको असलेले शो पिसेस. काय द्यायचे प्रेझेंट ?… लोकं पुन्हा रोख रक्कमच देण्याकडे आता पुन्हा वळायला लागली आहेत. मी स्वत: बनविलेल्या पाकिटातून असा आहेर किंवा भेट देतो. सोबतची शाळेतील पाटी ही काळा  कागद व पट्ट्यांचा वापर करून बनवली असून त्यामागे रोख राक्कामेसाठी पाकीट आहे. १०वी उत्तीर्ण झालेल्या 0001एका मुलीला मी असेच पाकीट दिले होते ती मुलगी आज वकील झाली तरी तिने ते जपून ठेवले आहे. साध्या की चेनला असलेल्या छान बाहुल्या चिकटवून बारशाचा आहेर देता येतो. बडीशेपेच्या गोळ्या भरलेल्या बदकाचे २ उभे तुकडे चिकटवून मुला-मुलींचे नाव लिहायला पताका करता येते.छोटी गणेशमूर्ती,प्लास्टिकचे छोटे गुलाब फुल व गवत (दुर्वा) चिकटवून आकर्षक पाकीट तयार होते. २ छोटी कागदी भिरभिरे किंवा छोट्या (लहानपणी पाण्यात सोडायला करायचो तश्या ) होड्या पाकिटांवर चिकटवून उत्तम पाकिटे 0002तयार होतात’ सोबत काही पाकिटांची छायाचित्रे देत आहे. त्यावरून अनेकांना अधिक चांगल्या कल्पना सुचू शकतील. नवीन वर्षाचा हा एक नवा उपक्रम !


— मकरंद करंदीकर.

Avatar
About मकरंद करंदीकर 43 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..