एलसीडी टीव्हीमध्ये जसा लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्लाझ्मा टीव्हीत प्लाइमा सेल्सचा वापर केला जातो. हे प्लाझ्मा सेल्स म्हणजे फ्लुरोसंट लॅपवर आधारित चेंबर्स असतात. आपले सीएफएल बल्ब ज्या तंत्रज्ञानावर चालतात त्याच पद्धतीने हे प्लाझ्मा सेल कार्यान्वित केले जातात.
या बल्बमध्ये पारा असतो त्याची काचेच्या नलिकेत वाफ होते व त्याला व्होल्टेज दिले की, नळीतील वायूचे रूपांतर प्लाझ्मामध्ये (आयनद्रायू) होते. जेव्हा वीजप्रवाह वाहतो तेव्हा काही इलेक्ट्रॉन पाऱ्याच्या कणांवर आदळतात. इलेक्ट्रॉन जेव्हा प्लाझ्मामधून फिरतात तेव्हा रेणूंची ऊर्जा पातळी वाढते.
नंतर पारा ती वाढीव ऊर्जा अल्ट्राव्हायोलेट फोटॉनच्या रूपात त्यागतो. हे अल्ट्राव्हायोलेट फोटॉन बल्बमधील फॉस्फर आवरणावर आदळतात, त्यामुळे फॉस्फरच्या रेणूतील बाह्य कक्षेमधील रेणूची विद्युत ऊर्जा पातळी वाढते, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन अस्थिर बनतो. हा इलेक्ट्रॉन मग अतिरिक्त ऊर्जेचा त्याग करतो. त्यामुळे कमी ऊर्जा पातळीवरील फोटॉनची निर्मिती होते. उष्णता व दृश्य प्रकाश या रूपातऊर्जा बाहेर पडते. कुठल्या प्रकारचा फॉस्फर वापरला आहे यावर कुठल्या रंगाचा प्रकाश निर्माण होणार हे अवलंबून असते. प्लाझ्मा डिस्प्लेमध्ये तीन प्रमुख रंगांच्या सेल्सचा समावेश असतो.
सेल्सला दिलेले व्होल्टेज बदलून रंग बदलले जातात. १९३६ मध्ये कालमन तिहानयी यांनी प्लाझ्मा टीव्हीचे मूळ तत्त्व स्पष्ट केले होते. प्लाझ्मा डिस्प्लेचा शोध जुलै १९६४ मध्ये इलिनॉईस विद्यापीठातील प्रा. डोनाल्ड बिटझर व जीन स्लोटो तसेच त्यांचा विद्यार्थी रॉबर्ट विल्सन यांनी लावला. याच विद्यापीठातील लॅरी वेबर या विद्यार्थ्याने या तंत्रात दहा पेटंट घेतली होती. त्याने १९९४ मध्ये सॅन जोस येथे कलर प्लाझ्मा डिस्प्ले सादर केला. नंतर फुजित्सुने असे प्लाझ्मा टीव्ही सादर केले. पॅनासॉनिकने २०१० मध्ये १५२ इंचांचा थ्री डी प्लाझ्मा टीव्ही सादर केला आहे.
प्लाझ्मा टीव्ही हा सडपातळ असतो, तो फ्रेमसारखा भिंतीवर लावता येतो. वजनाने हलका असतो. त्याचा कॉन्स्ट्रास्ट रेशो चांगला असतो. कुठल्याही कोनातून पाहिला तरी आपल्याला जे चित्र दिसते त्यात फरक होत नाही. उजेडाच्या खोलीतही त्याचा पडदा चमकत नाही. प्लाझ्मा टीव्हीमध्ये काही वैगुण्येही आहेत ती म्हणजे कालांतराने फॉस्फर खराब होऊन उजळपणा कमी होतो. काही वेळा फ्लिकरचा दोष यात दिसतो. एलसीडी टीव्हीपेक्षा हा जड असतो. उंच प्रदेशात प्लाइमा टीव्ही निर्दोषपणे चालत नाही. काहीवेळा यात इमेज बर्न इनचा धोका | असतो. प्लाझ्मा टीव्हीला वीज जास्त लागते. प्लाइमा टीव्हीत नायट्रोजन ट्रायफ्लुओराईड हा वायू वापरतात तो पर्यावरणास धोकादायक असतो. अजून तरी प्लाझ्मा टीव्ही महाग आहे.
Leave a Reply