नवीन लेखन...

पाय

आपल्या हिमतीवर उभे रहाण्यापासून ते xxला लावून पळण्यापर्यंत पायांचा मानवी जीवनात भक्कम पाया आहे. गोष्टींना पाय फुटून त्या नाहीशा होणे किंवा तोंडात पाय (Foot in mouth) घालण्यापर्यंत आपण ऐकलं आहे, पण पायाला तोंड फुटलेलं अजून ऐकिवात नाही म्हणून हा प्रपंच!

पाळण्यातले इवले इवले पाय नाचरे
निखळ, नितळ निष्पापसे मखमली गोबरे
निवांत शांत, भाबडे पहुडले बहुतसे सारे
कुणी विधीदर्शित जागृत मापती नक्षत्र तारे

नकळत वळत, रांगत दुडदुडणारे वारे
मायेच्या हाताने घेत वळण गोजिरे
शाळाशिस्तीत, स्पर्धेच्या धास्तीत धाव धावरे
नादात काही, हौसेत तालात थिरकत सितारे

हळव्या आळिताने घेतले लाजरे फेरे
परतवत आठवणी, करुन आसवांचे निचरे
कोऱ्या पदराआड, ओलांडत अनोळखी उंबरे
नव्या आशेचे, नव्या धरेवर पाऊल ठरे

कुणी स्वयंभू वाट आपली वेगळी मळणारे
निर्धारित काही ध्येयापायी पेलत रोष सारे
निर्विचार, भुईभार ते सोडत आळस सुस्कारे
वक्र वळणी काही दूषितकर्मी विघातक निखारे
दिशाहीन कुणी फरफटणारे दुर्देवी फेरे
उरले सारे नेटके आपण, प्रपंच रेटणारे

माध्यान्ही राबत, रापरापत, चिंताग्रस्त म्हातारे
वाहून ओझे आयुष्याचे वाकलेले बिचारे
थकले भागले, सुरकुतलेले कापरे कातरे
कातरवेळी चाहूल घेत, वेशीवर घुटमळणारे
ओढाळ ओढीने आप्तांच्या, उगा थबकणारे
उपेक्षेच्या उन्हात काही आपल्याच घरी उपरे
वेध लागले, जडावलेले विसावण्या आतुर रे

-यतीन सामंत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..