नवीन लेखन...

मूग

आयुर्वेदात मूग या कडधान्याला फार महत्त्व आहे. अगदी भारतातील अनेक ठिकाणी मुगाचा उदय होतो. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत होते. एवढेच नव्ह तर जगाच्या पाठीवर म्हणजे चीन आणि व्हिएतनाम, ब्रम्हदेश, श्रीलंका या ठिकाणीही मग सापडतो. जपान, कोरिया, फिलीपाईन्स, बांगलादेश, पाकिस्तान वगैरे ठिकाणी सापडते. मग हे हिरवेगार तर कधी सोनेरी दाणे दिसतात. मूग पाण्यात टाकल्यावर ते थोडे नरम होतात व मग त्याची आमटी, मोड आल्यास बिरडे वगैरे करण्याची प्रथा असते. पाण्यात भिजवून काही काळ ठेवल्यावर त्यात मोड येतात व ते पिवळे धम्मक दिसतात.

हिरव्या मुगाच्या दाणे अनेक प्रकारचे प्रकार करतात. मुगाची खिचडी अथवा मुगाचे सूप अथवा मुगाची कांजी वगैरे खाद्यप्रकार करता येतात. आपण जेव्हा मूग कोमट पाण्यात टाकल्यावर त्याला मोड तयार होतात. अशा प्रकारचे मुगाचे गुणधर्म कायम राहतात. मुगाचे अनेक खाद्यपदार्थ परदेशातही तयार करता येतात. जसे डाळ मोथ आणि मोड आलेले मुगाचे बिरडेही चांगला प्रकार असतो. लहान मुले खेळून आल्यानंतर  त्यांचे पाय खूप दुखतात. हाच प्रकार ज्येष्ठ नागरिकांमध्येही असतो. अशा प्रकार पाय अथवा पोटऱ्यातल्या दुखण्यात याचे कारण म्हणजे शरीरात पोटॅशियम कमी पडते. मुगामध्ये एवढे पोटॅशियम कोठेच नसते. म्हणूनच अशा लोकांना मुगाचे सूप अथवा तत्सम प्रकार केल्यास निश्चित आराम मिळतो.

लहान मुलांना अशक्तपणा जाणवत असल्यास अख्खे मूग दोन तास भिजवून ते स्वच्छ धुवावे व चार कप पाणी टाकून ते उकळून द्यावे अशाप्रकारे केले असता मुगाचे गुणधर्म तसेच राहतात. म्हणूनच लहान बाळांना ते चमच्याने थोडे प्यायला द्यावे. त्यात थोडी साखर टाकल्याने ते मूग होत नाही. याला ‘कढणं’ असे म्हणतात. तसेच मोठ्या माणसांना जर चरबी कमी करावयाची असल्यास तसेच सूप चार कप ते एक कप झाले तर पिण्यास देतात. त्यानेच वजनही कमी होण्याची शक्यता असते. तसेच मुगाची उसळ अथवा मुगाची आमटी करण्याचीही पद्धत असते. तसेच एका रात्री मूग भिजत घातल्यावर सकाळी मोड येतात. या मोडलेल्या मुगाची डाळ करून त्यात मुगाचे बिरडेही छान लागते. त्याचप्रमाणे थोडे मुगाचे दाणे उकडून याचेही सर्वत्र सूप बनविता येतात. तसेच मुगाचे दाणे थोडे मऊ करून त्यात दालमोठ हा प्रकार करता येतो. व याचा न्याहारीकरिता खाता येतो. तसेच मुगाच्या डाळीचे पीठ करून त्यात दिरडी वगैरे अनेक प्रकार करता येतात. एकूण काय तर मूग हे अत्यंत गुणी औषध आहे आणि याचा उपयोगही हवा तसा करता येतो.

१०० ग्रॅम मूग कच्चे दिसल्यावर त्यातील गुणधर्म

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..