एक मालवणी कविता !!!

चिंचो, आवळे, काजू आणि गरे,
कोकणी माणूस लय लय बरे….

शिवीगाळये घालतत खरे,
मनांत त्यांच्या काय नाय बरे…..

करवंदा खावची तर कोकणात
जावचा,
डोंगरातून फिरतांना, मजा लय
गावता….

नदी किनारी झाडा बघा
नारळाची,
पाणी पिता तेतूरला, स्वर्गच
गावता…..

हिरवी हिरवी गार आंब्याची
तोरा,
काजीचो रंग बघा लाली लाल
जरा….

जांभळाचो रंग जांभळो सगळ्यांका
ठाऊक हा,
पण डायाबिटीसवाल्यांका मात्र
लय लय भावता……

कापो आणि बरको, हे फणसाचे
प्रकार,
प्वॉटभर खाल्ल्यार वाढता
पोटाचो आकार…..

होडयेतून फिरतांना म्हणता,
वल्हव रे नाखवा,
मुंबईचो चाकरमानी इलो, त्येका
कोकण दाखवा……..इति
— मयुर तोंडवळकर.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…