नवीन लेखन...

मला देव भेटला तर……………….

मला देव भेटला तर मला खूप आनंद होईल. मी त्याला सगळीकडे हात लाऊन बघेल. त्याचे केस, त्याची पाठ, त्याचे हात, त्याचे पाय, डोळे सर्व काही मी चाचपून पाहीन. मला वाटते कि तो माणसासारखाच असेल.
मी त्याला अगोदर विचारील कि त्याला भूक लागली आहे का? त्याला त्याच्या आवडीचे जेवण देईल. त्याचा चांगलाच पाहुणचार करेल.
मग थोडा वेळ आम्ही गप्पा मारू. मी त्याला तो कोठे राहतो ते विचारून घेईन. त्याच्या घरात कोण कोण आहेत त्याची चौकशी करीन. मी त्याला मला संपूर्ण जग फिरवून आणण्याची विनंती करेल. मग आम्ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी , आयफेल टॉवर, ऑपेरा हाउस पाहून येऊ. नायगारा, नाईल, ब्रम्हपुत्र पाहू. मग थकून भागून घरी येऊन आराम करू.
मी त्याला बोर होऊ देणार नाही. त्याच्याशी मी खूप खेळेल. आम्ही सायकलिंग करू, स्केटिंग करू, क्रिकेट, फुटबाल खेळू. मी देवाला त्याची मंदिरे दाखवून आणीन. त्याची सुंदर मंदिरे पाहून देव खूपच खुश होईल. पण सतत काहीतरी मागणारी माणसे पाहून त्याला रागही येऊ शकतो.
यानंतर आम्ही घरी येऊन नाष्टा करू. आईने दिलेले पोहे त्यालाही खूप आवडतील. वर घरी बनवलेला केक. देव मी आम्ही दोघेही खुश. आता मग देवाकडे मागण्याची वेळ माझी. मी त्याला माझ्या आजोबांची पाठदुखी बरी करायची विनंती करेल. माझ्या दुस-या आजोबांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यामुळे त्यांचा एक हात काम करत नाही. तो बरा करायला मी देवाला सांगेन. मी त्याला विनंती करीन कि माझे सर्व कुटुंब व मित्रमंडळी सुखी असू देत. त्यांना सतत आनंदी राहण्याची कला दे. त्यांचे दुस-यांना त्रास देण्याचे विचार असतील ते दूर कर.
आता देवालाही त्याच्या घरी जायचे असेल. मी देवाला मोकळ्या हाताने जाऊ देणार नाही. त्याला मी काढलेली चार सुंदर चित्रे देईल. मी त्याला विनंती करेन कि परत परत मला भेटायला येत जा.

Devavrat Rajendra Choure, 5th A,
Majhatma School of Acdemics and Sports, New Panvel.

14 Comments on मला देव भेटला तर……………….

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..