नवीन लेखन...

जेवणाची बैठक कोणती ?भाग ४

ज्यांना जमिनीवर बसताच येत नाही, त्यांनी काय करावे ?

आधी ज्यांना जमिनीवर बसता येतंय, त्यांनी जमिनीवर बसायची सवय अजिबात मोडू नका.

आज जमिनीवर मांडी घालून बसूच नका, असा पाश्चात्य बुद्धीचा ऊफराटा सल्ला सर्वच अस्थिरोगतज्ञ देत असतात. असा मांडी न घालण्याचा सल्ला कदाचित बरोबर असेलही, पण, अगदी क्वचित हाताच्या बोटावर मोजायच्या अवस्थेत ! म्हणून सर्वांनीच जमिनीवर मांडी घालून बसणे सोडावे, असे थोडेच आहे ?

जशी संस्कृति तसे आचरण. पाश्चात्य संस्कृतीमधे मांडी घालून बसणे हा संस्कार त्यांच्या लहानपणापासूनच नाही, मग अगदी कितीही उच्चविद्याविभूषित झाले तरी, खाली बसायचे असते, हे त्यांना माहीतच नसते.

पाश्चात्यांचे एकवेळ समजू शकतो, पण ज्यांच्या आयुष्याची निम्मी वर्ष जमिनीवर, पाय दुमडून जेवण्यात आणि उकीडवे बसून मलविसर्जन करण्यात गेली, अश्या आमच्या भारतीय वैद्यक तज्ञांनी, असे सल्ले आपल्या फाईल्सवर छापील स्वरूपात आणल्यावर, बदललेल्या शिक्षणपद्धतीने, भारतीय संस्कृतीचे किती नुकसान झाले, हे लक्षात येते.
भारत हा माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत …
माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन….
या प्रतिज्ञेचा एवढ्या लवकर विसर पडावा, याचेही आश्चर्य वाटते. या आमच्या भारतीय परंपरा हळुहळू आमच्या जीवनपद्धतीतून नाहीश्या होत चालल्या आहेत. एवढे पाश्चात्य विचारांचे आपण होत चाललो आहोत, हे आमच्या लक्षातही येत नाहीये.

सहज या परंपरांचा हिशोब करीत बसलो असताना असे लक्षात आले की, सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किमान एकशे सत्तावीस ठिकाणी आपण अभारतीय पद्धतीने वागतोय, ज्यांचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध आहे.

पण आमची विचारसरणीच अशी काही बदलली गेली आहे, की अश्या एकशे सत्तावीस गोष्टी, मूलतः भारतीय नाहीत, हे आमच्या अस्सल भारतीय मनालादेखील पटत नाही.
त्यातीलच एक म्हणजे जमिनीवर बसणे.

जमिनीशी, या मातीशी थोडा तरी संपर्क हवाच ना ? !

वैज्ञानिक भाषेत बोलायचे तर “अर्थिंग” हवेच ! अनेक विचारांची, माणसे आपल्याला दररोज भेटत असतात. आपल्याला नको असलेले विचार ते आपल्याला बोलून दाखवतात. काही विचार आपल्याला, आपल्या अंतर्मनातून काढून टाकायचे असतात, पण ठरवले तरी काढता येत नाहीत, अशावेळी हे “अर्थिंग” उपयोगी होते, असा माझा अनुभव आहे.

आकाशात कितीही भरारी घेतली तरी आपले पाय मात्र जमिनीवरच हवेत, असे म्हटले जाते, ते काही अगदीच शब्दशः घ्यायचे नसते, असे नसते. पाय शक्यतो जमिनीवरच हवेत, म्हणजे “शाॅक” लागण्याची भीती नसते.
असो.

जमिनीशी असलेली ही भारतीय नाळ, जेवताना जर जुळली तर फार बरे.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
20.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..