नवीन लेखन...

जादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें

जादुटोणाविरोधी कायदा होऊनही अंधश्रध्दा कमी न होता वाढतच आहेत. नवीन जादू घेऊन नवीन बाबा अवतार घेतच आहेत. जादू नसतांना जादू मानणे हे, त्याच्या मागचे विज्ञान न समजून घेणे, अताकिर्क विचार करणे, शरीराचे पोस्टमार्टम होतं पण मनाचं कसं करणार? अंधश्रध्दा खिळे ठोकल्याप्रमाणे मनांत घट्ट रुतून बसल्या आहेत. कायदा कागदावरच रहातो, मनात रुजत नाही व अंधश्रध्दा मनातच रहाते व वृत्तीतही रुजते. अर्धा समाज अंधश्रध्देवर, त्याच्या व्यापारावर जगतो, त्यांना ती हवीच आहे. आर्थिक, शारिरीक, सामाजिक गरज शमविण्यासाठी, प्रसिध्दीच शिखर लोकांना अंधश्रध्दा ठेवूनच त्याना गाठायचं आहे. चिकित्सा नाही तोपर्यंत जादूटोणा चालतच राहणार. अंधश्रध्देच्या खतावरच मालिका फुलवल्या जात आहेत. प्रसारमाध्यमातून अंधश्रध्दा इतक्या झिरपतात की लोकांना त्या जगण्यात उतराव्या वाटतात. प्रत्येक चॅनलने भविष्यवाल्यांना, वास्तुशास्त्रवाल्यांना, बुवांना, इतकं जवळ केलंय की त्यांच्याशिवाय चॅनले चालणार नाही व चॅनल शिवाय अंधश्रध्देला व्यासपीठ मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. उठल्यापासून ते झोपेपयर्तं अनेक औषधे, उत्पादने नको ती व नको असली तरी लोकांना खरेदी करायला भाग पाडले जात आहे.

प्रसारमाध्यमे लोकांवर संमोहन करत आहेत. संमोहन करण्यासाठी जणू व्यासपीठ प्रसारमाध्यमांनी उपलब्ध करुन दिलय, त्यालाही काही “अर्थ” आहे व त्यामागेही काही “अर्थ” आहे. सगळ्या वर्तमानपत्रात भविष्य सांगणार्यां नी जम बसवला आहे. लोकांची करमणूक व आर्थिक लाभ, याचं श्रेय वृत्तपत्रांना मिळतं. काही लोकाचं भविष्य खरं ठरणारंच व ते भविष्य वाचणार व विश्वास ठेवणारच. भविष्य, अंधश्रध्दा बाबत दोनच शक्यता, कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत होय किवा नाही या असतात. आंबा खाल्ल्याने पुत्रच होणार, हे ५० टक्के लोकांच्या बाबतीत खरं ठरतं. बाकीचे ५० टक्के नशीबाला व स्वतःला दोष देत समोर येतच नाहीत. प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो. हे लोक समजूनच घेत नाहीत. देवाला जाणारे व देवदर्शनाहून येणार्यांयचा अपघात होतोच नां? तांत्रिक कारण विचारात घेतलं जात नाही.

दूरदर्शनवर तर अनेकांनी उच्छाद मांडलाय, त्यांच्याकडे लोकांकडून वसुल केलेला पैसा ते जाहिरातीसाठी व कार्यक्रमांसाठी वापरतात. दूरदर्शनवाल्या वाहिन्यांना पैसा हवाच असतो. जे जे दूरदर्शनवरुन कार्यक्रम आरोग्यविषयक, वास्तुशास्त्र विषयक, भविष्याविषयी प्रसारित होतात. त्याची सत्यता, विश्वासहार्यता तपासणारी यंत्रणाच नाही. काही चांगल्या कार्यक्रमांबरोबर प््तसवणूक करणारे कार्यक्रमही प्रसारित होतात. ज्यांनी अध्यात्मात लोकांना गुंगवून ठेवलं ते आज तुरुंगात आहेत. बलात्कार, विनयभंग करणारे संत, राजकारणी, नेते, अभिनेते #me too च्या त्सुनामीत अडकलेत.

दूरदर्शनवरुन फसवणूक करणार्यांतचे अनेक कार्यालये शाखा, A.C.कार्यालये आहेत. प्रचंड फी आकारुन लोकांना वाट पाहून प्रवेश मिळतो. गुरुंची कृपा होण्यासाठी लोकं काहीही करतात. सांगेल ते गरीबांना खाऊ घालायला सांगितलं जातं, काही देवी, देवतांच्या दर्शनाला जायला सांगितलं जातं, झाली कृपा.

रडत रडत लोकं दुखणं, गार्हाहणं सांगतात, नुसता आशिर्वाद देवून ५ हजारात बोळवण केली जाते काही जणांचे लग्न, नोकरी या गोष्टी होणारच असतात (५० टक्के) ते विश्वास ठेवून पुन्हा येतात व दरबार भरभराटीला येतो, श्रेय बाबाला मिळते.

पत्रिका पाहून लगेच भविष्य सांगितलं जातं. जोपर्यंत अंधश्रध्द समाज राहील, तोपर्यंत यांचं फावणारच. अनेक बुवांचा पर्दाफाश झालाय, पण पुन्हा लोकं नवीन नवीन बाबांना शरण जात आहेत. लोकांना परिवर्तन हवयं, पण वर्तन तचे ठेवून. माणसं औकतात, त्यांना ते पटतं पण व्यवहारात ते प्रवाहाच्या विरुध्द जात नाहीत. लोक भाषणे देतील, लेख लिहितील पण चाकोरी, परंपरेच्या बाहेर जाणार नाहीत.

जादूटोणा विरोधी कायद्याने काही प्रमाणात नियंत्रण आले असेल, पण रोज अंधश्रध्देचे तण वाढतच आहे. लोकांची सामाजिक, मानसिक, भावनिक, श्रध्दाळू आंदोलने कायद्याला धाब्यावर बसवून चालतात, त्याला काय करणार? डी.जे.ला गणेशोत्सवास सुप्रीम कोर्टाची बंदी होती, तरीही लोकच नाही तर पोलीस कायदा राबविणारेही नाचलेच. दहीहंडीचे भर कमी होत नाहीत, धार्मिक स्थळावरील भोंगे उतरत नाहीत. कायदे चांगले आहेत, पण लोकांना मनाप्रमाणे वायदे व फायदेच हवेत.

आमची समाजमाध्यमें आजही जवाबदारीने संस्कारच रुजविण्याची हमी देत नाहीत. पैशापुढें संस्कार किवा विकार दोन्हींनाही सारखंच लेखलं जातं. आज प्रत्येक वर्तमानपत्राच पहिलं पान पूर्णतः जाहिरातीला अर्पण असतं. जाहिरातीचा आशय, विषय यावर नियंत्रण नाही. कंडोम ची जाहिरातही सरकार बंद करु शकत नाही. कडक कायदा करुन बलात्कार बंद होत नाहीत, अंधश्रध्दा कमी होत नाहीत.

लोकांना धर्म, जात, परपंरा याशिवाय विचारच करावासा वाटत नाही, जे करतात त्यांना संपवलं जात आहे. जेलमध्ये असणारे, बलात्कार करणारे यांनाही मानणारे, त्यांचं कार्य चालू ठेवणारे अनेकजण आहेत. समूहापुढे कायदा थिटा पडतो आहे. जेलमधून निवडणूक जिकणारे या देशात आहेत. दैवत भंगलं तरी त्यांचे तुकडे गोळा करुन पुजणारा समाज आहे. लोकांना नतमस्तक होणारे पाय नसले तरी चालतात, दगडासमोर ते नतमस्तक होतात. दगडाचा शेंदूर चालतो, माणसाचा चिकित्सक विचार नाही चालत. There is no God, no ghostअसे डॉ. केवुर म्हणत. श्रध्देची चिकित्साच लोकांना नकोय. ‘जूनं ते सोनं म्हणत ते नाकारायचंच नाही. नवीन स्वीकारायचंच नाही, मग परिवर्तन कसं होणार? अंधश्रध्देच्या, जादूटोण्याच्या त्सुनामीपुढे परिवर्तन तग धरेनासे झालय. माणसे बदलायला तयार असतात. पण त्यांना बदलचू दिलं जात नाही. हवा तो इतिहास लिहिला जातो, समोर आणला जातो, लादला जातो. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, पण ती जाणून बुजून घडवून अंधश्रध्दा जोपासल्या जात आहेत. अजूनही भूत-प्रेत, जादूटोणा, गुप्तधन, चेटूक, करणी हे मालिकेंमधून, चित्रपटांतून बिबवले जातात व समाजात ते आजही घडतातच. आपलं शोषण होतय हे काहींना कळतच नाही, कळलं तरी बदनामी होईल म्हणून त्याविरुध्द ब्रही काढत नाहीत. शारिरीक शोषणाविरुध्द आता #me too मोहिम निघाली आहे.

अंधश्रध्देच्या, बुवांच्या शोषणाविरुध्द अशी चळवळ कां नाही वेग धरत? तसं झालं तर अनेक बुवा,
जादूटोणा करणार्यांोचं पितळ उघडं पडेल. जादूटोणा विरोधी कायद्याबरोबरच #me too अशी चळवळ उभी रहायला हवी. केवळ सेलीब्रेटी, राजकारणी बरोबरच सामान्यांनीही अंधश्रध्देच्या शोषणाविरुध्द #me too चळवळ निर्माण केली पाहिजे. कोणी गुप्तधनासाठी, कोणी वास्तुशास्त्र, भविष्य, संतती, करणी, भूतपिशाच्य बाबतीत फसवलं तर लोकांनी पुढे येवून तक्रार द्यायला हवी व त्यासाठी स्वतंत्र विभाग #me too साठी पोलीस स्टेशनमध्ये हवा. जादूटोणा विरोधी कायदा अधिक व्यापक व लोकाभिमुख व्हायला हवा, त्याचं गांभिर्य अनेकांच्या गावीही नाही. अनेक महाराज, बुवां, आजही भविष्य, वास्तुशास्त्रवाले फसवत आहेत. प्रसारमाध्यमांचा आधार घेऊन फसवणूक चालू आहे, याचं वाईट वाटत. घरात संवाद न साधणारी माणसे, चॅनल वर संवाद साधत आहेत, वास्तुबद्दल लग्नाबद्दल, यशाबाबत व त्यांना पत्रिका पाहून मार्गदर्शन केले जाते व त्यांचे प्रतिनिधी येऊन परिक्षणही करतात, इतकं जाळं त्यांनी पसरवलय. त्याला जोडूनच वधु-वर सूचक मंडळाद्वारे ते विवाहही जुळवतात. जादूटोणाविरोधी कायद्यात पिडीत व्यक्ती किवा नातेवाईकांनाच तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. पण अनेक पिडीत व नातेवाईक यांना गुन्हा आहे हे कळतच नाही. कळलं तरी ज्याचं ते ऐकतात त्याच्याविरुध्द ते जात नाहीत, चिकित्सा करत नाहीत. स्वतःमध्ये दोष असेल समजून पुन्हा श्रध्दा ठेवली जाते. श्रध्दा, सत्य तपासले नसले तर ती अंधश्रध्दाच होते.

अशा परिस्थितीत नातेवाईक दक्षता अधिकारी यालाच तक्रार दाखल करता येते, पण हे सगळ्याच अंधश्रध्देबाबत घडत नाही आणि अंधश्रध्दा, जादू, चमत्कार आपले साम्राज्य प्रस्थापित करतात. श्रध्देचं रुपांतर अंधश्रध्देत कधी होतं, तेच अनेकांना कळत नाही व त्यांना ते समजूनही घ्यावं वाटत नाही. अंधश्रध्देच्या संम्मोहनातच समाजाला जगावं वाटतं. तकर्शुध्द विचार करण्याची सवय निर्माण केल्याशिवाय अंधश्रध्दा जाणार नाहीत. कारण अशिक्षिताबरोबर, सुशिक्षितमध्येही अंधश्रध्दा आहेत, ताकिर्कतेला खुंटीला टांगलेल्या समाजात हे घडत आहे. टिपकागदाचं काम शाई टिपणं, शोषण करणं आहे, पण टिपकागदाप्रमाणे अंधश्रध्दा टिपणारे प्रसारमाध्यमे अंधश्रध्देतच बुडाले तर अंधश्रध्दाच ठिपकणारं, कारण शाईत टिपकागद बुडवला तर शाईच ंठपकणार. प्रसारमाध्यमांतून काय झिरपतं यावरुनच समाजाची ओळख असते.

काही आरोग्यविषयक कार्यक्रम चांगले आहेत, पण आपले व आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करणं हा अनेकांचा हेतु असतो. निराश झालेल्यांना शस्त्रकि्रया, औषधे घ्यायला भाग पाडले जाते. डॉ. जगन्नाथ दिक्षीत, ऋतुजा दिवेकर यांचे हेतु शुध्द आहेत. विनासायास व बिनखर्ची जीवनशैलीमुळे त्यांचे अनेक अनुयायी देश-परदेशात आहेत. व्हॉटस्अप वरुन मोफत मार्गदर्शन केलं जातं. आजही प्रथितयश दवाखान्यामध्ये डॉक्टर मंत्रोपचार करतात, मेलेल्या मुलाला स्मशानातून घरी आणून मंत्रोच्चाराने जिवतं करुन देतो म्हणणारे डॉक्टर आहेत. हे थांबायला हवं, पण थांबत नाही.

वडिलांनी स्वप्नात येऊन सांगितल्यामुळे ११ जणांची सामूहिक आत्महत्या होते. कायदा आपल्या जागी आहे, चमत्कार करणारे, भोगणारे, पहाणारे आपल्या जागी आहेत. कायद्यात अडकला तर गुन्हेगार, नाही तर तोपर्यंत तो फसवणार. तक्रार येत नाही तोपर्यंत फसवणूक थांबत नाही. अनेकांनी फसवून आपले साम्राज्य प्रस्थापित केलं, परदेशात बस्तान बसवलं, शाखा उघडल्या, लाखो अनुयायी केले, तक्रारीनंतर आज ते जेल मध्ये आहेत, अशा लोकांसाठी त्यांचं वास्तव समोर आल्यावरही, त्यांच्यासाठी प्राण देणारे लोकं आहेत, हे बदलत नाही तोपर्यंत अंधश्रध्देची जादू चालूच राहणार, प्रसारमाध्यमेच तार्किकता रुजवू शकतात, पण अर्थहिनता रुजविण्यातच अर्थ आहे, हे त्यांनी जाणलय.

प्रसारमाध्यमांची जादू ओसरली व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला तरच जादूटोणाविरोधी कायदा सक्षम होईल. आपल्या देशात काहीही करता येतं, धुम्रपान आरोग्यास हानिकारक आहे म्हटलं की जबाबदारी झटकली जाते. अंधश्रध्देबाबत केवळ वैधानिक इशारा देवून चालणार नाही तर जादूटोणा विरोधी कायद्याचा इशाराच तारणार आहे. विज्ञानाच्या, ताकिर्कतेच्या, यशोगाथा व अंधश्रध्देची खोटी आकडेवारी लोकांसमोर यायला हवी. लोक काय म्हणतील म्हणून अंधश्रध्दा जपल्या जातात. आपण असं वागलो तर विज्ञान काय म्हणेल? हा प्रश्न लोकांना पडला पाहिजे.

केवळ ज्ञान नाही तर विज्ञान ही आज आवश्यक बनले आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्णयही न मानण्याची मानसिकता झालेल्या लोकांमध्ये जादूटोणा विरोधी कायदा राबवायचा आहे, त्यासाठी व्याख्याने, प्रबोधन, प्रयोग, मेळावे, परिषदेतून, प्रसारमाध्यमातूनच हे चित्र बदलू शकते, जादू, चमत्कार, भूतप्रेत, करणी असं काही नसतंच, प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो अशी धारण जेव्हा लोक वृत्ती व कृतीतून दाखवतील तेच जादूटोणाविरोधी कायद्याचं यश असेल. अंधश्रध्देमुळे देव-धर्म, जात यांना “अच्छे दिन” आलेत. आमचा देव, धर्म, जात, आमची परंपरा याचा उदोउदो करण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे असे लोकांना वाटत आहे. सुधारक, संत यांनीही अंधश्रध्देला विरोध केला, विवेकवादी मांडणी केली. देव, धर्म, परंपरा या प्रांतात तकर्बुध्दी वापरायची नाही असा संस्कार मनात रुजलेला, जे रुचतं तेच रुजतं. प्रसार माध्यमांचा प्राधान्यक्रम आधी मनोरंजन मग वेळ उरला तर प्रबोधन असा आहे. लोकांना काय आवडतं. टीआरपी निर्बुध्द लोकांचा का असेना त्यावरच कार्यक्रम प्रसारित होतात. पुन्हा पुन्हा देव, धर्म, अंधश्रध्दा दाखवून भावनेला हात घातला जातो आहे. शेंदूर फासला की दगडाचा देव होतो, तसं विज्ञानाचा लेप मानवी मनावर दिला तरच सुजलाम् सुफलाम् होईल.

— डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 28 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..