नवीन लेखन...

गावाकडची गोष्ट – जिवाचा सखा मित्र

रेल्वे मध्ये कामाला लागण्या अगोदर मी बिगारी काम दुसऱ्याच्या शेतामध्ये करीत होतो. त्यात वडील वारलेले घरामध्ये पैशाची चणचण फार भासत होती.वडीलतरी या जगातून निघून गेले घर रिकामे झाले वडिलांचा आधार नाहीसा झाला. गेली कित्येक दिवस वडील अंथरुणावर पडून होते आधार होता तो आधार नाहीसा झाल्यामुळे. अखंड घर दुःखात बुडाले होते घरात मला अजिबात करमत नव्हते. सोबत घरातील चारी भिंती मला खायला उठल्या होत्या. घरा मध्ये लाईट नाही दिव्याच्या मीन मिनित प्रकाशात मला काही सुचत नव्हते. वडील आजारी असल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत दोन मामानी केलेली मदत मला डोंगराएवढी वाटत होतं. या जगामध्ये कुठेतरी देव आहे आणि तो देव मामाच्या रूपाने आम्हाला मदत करीत आहे हे मला जाणवत होते. परंतु आम्ही लहान होतो त्यांचे डोंगराएवढे माझ्यासारख्या कमी वयाच्या मुलाला न पिलं न्या सारखे नव्हते. यांची परतफेड कशी करायची हा विचार माझ्या मनामध्ये राहून राहून येत होता. उपकाराचे ओझे कर्ज पेक्षा फार मोठे आहे हे मला जाणवत होते परंतु विलाज नाही आलेल्या दिवसाला तोंड देणे एवढेच बाकी होते. माझे वय कमी मला शेतीकामाला कोण देईल का हा विचार मी मनात करीत होतो. माझी आई शिंदे अण्णांच्या द्राक्ष बागेमध्ये काम करत होती मी ही शिदे अण्णांच्या द्राक्ष बागेमध्ये कामाला जावे असा मी मनामध्ये विचार केला. नाचार आला म्हणून विचार सोडू नये हे माझ्या आईचे वाक्य आहे मी मनाचा निर्णय केला आणि अण्णांच्या बागेमध्ये कामाला गेलो. हे काम करीत असताना मला काम करणारे सारे सौंगडी भेटले त्यामध्ये अशोक शिंदे. शिवाजी शिंदे गणपत शिंदे भीमा मामा अशी मंडळी मला भेटली. आमच्या घरची परिस्थिती पाहून या माणसानी प्रत्येक वेळी मला कामांमध्ये सांभाळून घेतले…।
…. शिवाजी तर म्हणू लागला हा सुसा काकूचा दोन नंबर चा मुलगा आहे त्याला आपण शेती कामांमध्ये संभाळून घेतली पाहिजे. त्याप्रमाणे हे माझ्या जीवाचे जिवलग मित्र यांच्यासोबत मी शेतीत काम केले. परंतु या मित्रांची आठवण मला अजून सुद्धा होते आमच्या घरची परिस्थिती ढासळली परंतु या मित्रांनी माझे वय कमी असताना मला कामांमध्ये पुष्कळ मदत केली. माझ्या वडिलांना देव या जगातून घेऊन गेला सुसा काकूच्याऐन तारुण्यात सौभाग्याचं लाल कुंकू गेलं . आमचा संसार मधीच कट झाला याचे दुःख या माझ्या मित्रांना झाले असावे असे माझ्या मनाला वाटत होते. ग्रामीण भागामध्ये एखाद्याच्या घरामध्ये दुःखद घटना घडली तर कोणीही मदतीला धावून येते. इतकी प्रेमळ व जिव्हाळ्याची माणसं त्यावेळी होती माझ्या आयुष्यामध्ये मला शेती काम करत असताना या माणसानी पुष्कळ मदत केली हे उपकार माझ्यावरती आहेत. या माणसांची उतराई कशी करायची या संभ्रमात मी होतो परंतु गेल्या महिन्यामध्ये हा शिवाजी शिंदे मला भेटला. आमची दोघांची गळा भेट झाली आणि म्हणाला…।
,,, तू सुसा काकूचादता काय..।
,,,,होय. महाराज तुम्हाला मी ओळखले आहेतुमचे वय झाले आता तुमचे कसे चालले आहे. आणि तुमची बायको सुशीला ताई कशी आहे..।
,,, नाही या जगातून ती निघून गेली..।
,,, पण मी सर्व्हिसला असल्यामुळे मला काही समजले नाही परंतु तुमची मुले तुम्हाला सांभाळतात की नाही..।
,,, सांभाळतात मला काही कमी नाही परंतु पूर्वीचे दिवस आठवले की शेतात काम करणाऱ्या माणसांची नावे डोळ्यापुढे येतात. पूर्वीचे दिवस आठवतात मला कुणीतरी परवा म्हटले तू लेखक झाला आहेस हे खरे आहे का..।
,,,,,, होय अगदी खरी आहे माझी शाळा मराठी तिसरी पर्यंत आहे हे तुम्हाला माहित आहे. मी गावामध्ये शेती काम करत असताना दिवसभर शेती काम करून रात्री साहित्याचे लेखन करतो. परंतु तुम्ही आज मला फार वर्षातून भेटला मला तर फार आनंद होत आहे. मी त्यावेळी काम करीत असताना मला केलीली कामात मदत हे मी विसरू शकत नाही. मी त्यावेळी 13 14 वर्षाचा असेल परंतु मी तुम्हाला विसरलो नाही पण मला आज फार आनंद झाला..।
,,,,, तू मला भेटलासयाचाआनंदमलाहीफारहोत आहे आता तुझे काय चालले आहे शिवाजी म्हणाला..।
,,,, लेखन करीत बसतो आता मला दुसरी काय काम आहे मी म्हणालो..l
,,,, आपल्या गावामध्ये तुला एक चांगली सवय लागली आहे तू त्या वेळी भजणा मध्ये तबला वाजवत होतास हे सुद्धा मी ऐकून आहे हे खरे आहे का..।
,,, होय अगदी खरे आहे परंतु मी सध्या तबलावादन फार कमी करतो. कारण माझा मुलगा सध्या तबला वाजवतो म्हणून मी या विषयाकडे जात नाही मुलाला का म्हणून नाराज करायचे..।
,, अगदी बरोबर आता तुझी मुले मोठी झाली असतील..।
,, होय अगदी बरोबर माझा थोरला मुलगा माझ्यासारखा लेखक आहे. दोन नंबरचा मुलगा तो मोठा आर्टिस्ट आहे तिसरा मुलगा उत्कृष्ट तबला वादक आहे. यात च मी फार सुखावलो आहे महाराज रेल्वे मध्ये चौतीस वर्षे नोकरी केली परंतु रेल्वेमध्ये चोरी केली नाही. पाचशे रुपये पगारामध्ये तीन मुले संभाळली त्यांना पैसा कमी पडू दिला नाही. माझ्या तीन मुलांचा हट्ट पुरवला परंतु माझी तीन मुले मला व माझ्या बायकोला विसरत नाहीत. यातच मी माझा आनंद शोधत असतो..
वाचक मंडळी मला माझा जुना मित्र शिवाजी शिंदे भेटल्यामुळे त्यादिवशी फार आनंद झाला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्याशिवाय खरी मैत्री समजत नाही हे माझ्या लक्षात आले. या जगामध्ये माणसे भरपूर आहेत परंतु शिवाजी शिंदे या नावाची माणसे फार कमी आहेत..।
… धन्यवाद..।

— दत्तात्रय पांडुरंग मानुगडे,

ग्रामीण कथा लेखक..।

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..