नवीन लेखन...

गावाकडची गोष्ट – हिरा मावशी

मी शाळेत शिकायला असताना अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. खरंतर मराठी शाळेमध्ये शिकायला मला फार आनंद वाटत असे. वर्गामध्ये भिताडवर रंगीबिरंगी लावलेले सुरेख अक्षरातील तकते वेगवेगळी काढलेली सुरेख चित्रे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सुरेख देखावा पुन्हा पुन्हा पहावा व या चित्रावर ती काहीतरी लिहावे असे माझ्या मनाला नेहमी वाटत होते. त्यातील काही म्हणी अजून आठवतात खत देऊन जाते,गोत देऊन जाते, हातच्या काकणाला आरसा कशाला, अशा अनेक म्हणी प्रत्येक वर्गाच्या भिताडावर सुरेख अक्षरांमध्ये लिहिलेल्या दिसत होत्या. वर्गातील शिक्षक मुले व मुली शिस्तीचे पालन करीत होते खाकी हाफ शर्ट पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट व डोकीला पांढरीशुभ्र टोपी. काखेत अडकवलेलं शाळेचे दप्तर घेऊन मी शेतातून चिखल तुडवित शाळेला रोज जात असे. मराठी शाळा म्हणजे एक ज्ञान मंदिर याच ज्ञान मंदिरात ज्ञानाची पूजा केली जात होती. पूर्वीचे मास्तर विद्यार्थ्याला कळेपर्यंत शिकवत होते एखाद्यावेळी प्रश्नाचे उत्तर नाही आले तर छडीने मारत होते. परंतु विद्यार्थ्यांचे आई-वडील माझ्या मुलाला का मारले म्हणून शाळेत कधी तक्रार करायला येत नव्हते. जिल्हा परिषदशाळेतशिकून आज पर्यंत कितीतरी मुले मुली शाळा पूर्ण शिकून कुणी मास्टर झाले कुणी सरकारी क्षेत्रामध्ये कामाला लागले. तर कोणी वकील अथवा चांगल्या पोस्ट वरतीकामाला लागले. म्हणजे जिल्हा परिषद शाळा या शाळेला व शाळेत शिकव नाऱ्या शिक्षकाला किती मोठी किंमत आहे हे लक्षात चटकन येण्यासारखे असे आहे. मराठी शाळा विद्यार्थ्यांनी भरली की मनाला किती आनंद व्हायचा रोज एकमेकाच्या गाठीभेटी त्यातून वर्षातून एकदा निघणारी सहल. डोकीवर अभ्यासाचा जोर आणि मास्तरांची फटके हे समीकरण जुळून आले होते. शाळा भरली म्हणजे मधल्या सुट्टी मध्ये गप्पांचा महापूर कबड्डी खेळत असताना लागलेली भांडणे. शर्ट ओढा ओढी आणि अशा समस्येतून होणारी भांडणे यात भांडणाचे रुपांतर वर्गांमध्ये झाली म्हणजे वरून वर्गशिक्षकाचामार. मास्तरांच्याभितीने घाबरलेली मुले व त्यांचे पडलेली चेहरे हे दृश्य मला भीतीचे वाटत होते…।
…. शाळेत असताना माझी सुंदर अक्षर असल्यामुळे शाळेचे हेडमास्तर रामकृष्ण साधू गुरव हे सुंदर अक्षरांमध्ये शाळेच्या फळ्यावर सुविचार रंगीबेरंगी खडूने मला लिहायला लावत असे. शाळा म्हणजे शिक्षण घेण्याचे मंदिर मुलांचा गलबला हे सारे दृश्य अजूनही पाहिल्यासारखे वाटते. मी शाळा शिकत असताना गावातून जात असताना पाहिजे म्हणून सर्वांशी बोलत जात असे कारण मराठी शाळा माळावरच्या जागेत असल्यामुळे गावातून जाताना सुद्धा मी गप्प जात नसे. एखाद्यावेळी शाळेला जायला उशीर झाला तर वयस्कर माणसे म्हणत आज काय बोलेना. इतकी त्या काळची माणसं प्रेमाने बोलवत असे त्यांचं तोंड भरून बोलणं प्रेम जिव्हाळा नेहमीच असायचा. गावाच्या एका कडेला सोपान काका कुंभार व त्यांची बायको हिरा मावशी तोंड भरून माझ्याशी बोलत असत. ही दोन माणसे कुंभार असल्यामुळे बेंदराची बैल गवर गणपतीचे मकुटे. मातीच्या चुली गाडगे अशा वस्तू मातीपासून तयार करत असे. बेंद्रा पासून गवर गणपती पर्यंत सोपान काकाच्या मूर्तीला चांगली किंमत मिळत असे. त्याना भाजी भाकरी ला काही कमी नव्हती पूर्वी ऑपरेशन हा विषय नसल्यामुळे सोपान काकाला पाच मुले व एक मुलगी व हे दोघे जण असहे.. गरीब कुटुंब आमच्या गावामध्ये राहायला होते या दोघांचे स्वभाव अतिशय गुणी व चांगला असल्यामुळे. हे घराणे गावातील लोकांना अतिशय प्रिय असे होते उन्हाळ्यामध्ये मातीची गाडगे चुली डोक्यावर घेऊन ही हिरा काकू चार गावांमध्ये फिरून चुलीवगाडगी विकत होती. हिरा काकू मला सुशीला चा मुलगा म्हणून नेहमी बोलवत होती मी पुष्कळ वेळा सांगितले माझे नाव दत्ता आहे परंतु ती म्हणायची तुझे अवघड नाव आहे मला म्हणता येत नाही. कारण या दोघांची शाळा बिलकुल झाली नव्हती हे दोघेही अंगठी बहादुर होते. एके दिवशी म्हणजे शनिवारी माझी आवडती शाळा संपली आणि मी शेताकडे घर असल्यामुळे काकूच्या घराकडून पुढे जाउ लागलो. हिरा मावशीने मला पाहिले आणि हाक मारली..।
,,, हे पोरा हा कड ये तुझं नाव लई अवघड हाय मला बोलता येत नाही..।
,,, मावशी माझं नाव मी परवा सांगितले आहे दत्ता म्हणून मी म्हणालो..।
,,, तू कोण बी आस मी तुला सुशीला चा मुलगा असे म्हणेल पण काय रे काल तू माझ्याशी न बोलता का गेलास हिरा मावशी म्हणाली..।
,,, काय करू शेतातून येताना मला फार वेळ झाला मी म्हणालो..।
,,, का मावशी म्हणाली..।
,,, रात्रभर मी गावातच होतो मी म्हणालो..।
,,, पण काय कारण सांगशील की नाही मावशी म्हणाली..।
,,, रात्री लक्ष्मीच्या देवळामध्ये भजन होते म्हणून मी रात्रभर भजन ऐकत होतो परंतु सोपान काका सुद्धा चांगला मृदुंग वाजवत होती. त्याची गोडी मला लागली होती म्हणूनच मी रात्रभर थांबलो मी म्हणालो..।
,,, मग रात्री किती वाजता शेतामध्ये गेला तुला भिती वाटली नाही. तुझ्या शेताचा इलाका म्हणजे भुताचा इलाका त्या भागामध्ये भुते खेळतात असे मी ऐकून आहे मावशी म्हणाली..।
,,, मला तर अजून पर्यंत एक भूत सुद्धा दिसली नाही. तसाच गेलो शेतात परंतु माझी आई माझी वाट पाहत होती. ती मला म्हणाली रात्रभर तू कुठे होतास मी म्हणालो सोपान काकाचा मृदुंग ऐकण्यात दंग होतो मी म्हणालो..
,,, तू आदर्श आहेस व तुझ्या घराण्यात तू वेगळा मुलगा आहेस हे मला माहीत आहे. परंतु एक सांगू मावशी म्हणाली..।
,,, मग सांग की..।
,,, मला त्यातील काही कळत नाही मी फक्त आईच्या सांगण्यावरून शाळेत येतो..।
,,, कशा करता मावशी म्हणाली..।
,,, माझ्या आईची इच्छा आहे मी मास्टर म्हणून काम करावे म्हणून शकतो..।
,,, तुला शाळेत अभ्यास येतो का..।
,, येतो थोडा थोडा लक्षात राहत नाही मी म्हणालो..।
हा सारा विषय ऐकून मावशी विचारात पडली होती मी कोणीतरी विशेष पोरगा आहे अशी तिच्या मनाला वाटत होते. परंतु मावशी च्या अगोदर सोपान काका निघून गेले आणि मावशी पतीविना पोरगी झाली. परवा मी मावशीच्या मुलाला भेटलो. मावशीच्या मुलाला खुशाली विचारली परंतु हिरा मावशी सुद्धा देवाघरी गेली आहे हे माझ्या पटकन लक्षात आले. मी हिरा मावशी चा फोटो घेतला आणि तिच्या प्रेमळ स्वभावाची व बोलण्याची आठवण माझ्या लक्षात येऊ लागली. प्रेमाने तोंडभरून बोलणारी हिरा मावशी तिच्या आठवणी पुन्हा पुन्हा जाग्या होऊ लागल्या. पूर्वीचे दिवस सोन्यासारखे होते परंतु आताचे दिवस किती वाईट आले याचा मी मनात विचार करीत होतो. कोट्यावधी रुपये मिळतील परंतु प्रेम देणारी माणसं या कलियुगात फार कमी प्रमाणात भेटतील. या कलियुगामध्ये मानसे येत असतात जात असतात परंतु त्यांच्या आठवणी कायम स्वरूपी स्मरणात राहतात. शेवटी हे कली युग कितीही पुढे जावो याला किंमत कमी आहे परंतु किंमत देणारी माणसं प्रेम करणारी माणसं फार कमी आहेत. आठवणी जाग्या करून त्यांची नावे आठवणे हा माझा स्वभाव गुण असेल का याचा विचार मनामध्ये पडतो..।
… धन्यवाद मंडळी..।

— दत्तात्रय पांडुरंग मानुगडे उर्फ दपामा,

ग्रामीण कथा लेखक..।

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..