नवीन लेखन...

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले

माधव गोडबोले यांचा अल्पपरिचय.

माधव गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९३६ रोजी पुणे येथे झाला.

गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम. ए. आणि पीएच्‌.डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आणि मार्च १९९३ मध्ये केंद्रीय गृहसचिव आणि न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. देशाच्या समकालीन राजकीय इतिहासाला वळण देणाऱ्या बाबरी मशीद पतनाच्या वेळी गोडबोले हे केंद्रीय गृहसचिव पदावर कार्यरत होते. या घटनेनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गृह खात्याबरोबर पेट्रोलियम तसेच अर्थ मंत्रालयाचे सचिव पदही भूषवले होते. महाराष्ट्र विद्युत मंडळाचे ते अध्यक्षही होते. माधव गोडबोल यांनी निवृत्तीनंतर जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्‍रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती आदी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये लिखाण केले.राष्ट्रीय राजकारणासंबंधित २० पुस्तकांचे ते लेखक होते.

ऑक्टोबर २०१९ पर्यंत माधवराव गोडबोले यांनी १५ इंग्रजी आणि १० मराठी पुस्तके लिहिली. ‘चांगले प्रशासन हा मूलभूत हक्क मानला जावा’ यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आधारित A Quest For Good Governance (2004) या पुस्तिकेचे ते सहलेखकही आहेत. त्यांचे The Judiciary and Governnace in India हे पुस्तक जानेवारी २००९ मध्ये प्रकाशित झाले व त्यानंतर India’s Parliamentary Democracy on Trial हे पुस्तक २०११ साली प्रसिद्ध झाले.

माधव गोडबोले हे एक सचोटीचे, कर्तव्यदक्ष, नियमानुसार काम करणारे सनदी अधिकारी होते.. पक्के सेक्युलर पण सनदशीर लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. गृहसचिव म्हणून निवृत्त व्हावे लागल्यावर ‘द अनफिनिश्ड इनिंग्ज ‘ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक चांगलेच गाजले.

माधव गोडबोले यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेची २००० व २००४ सालची पारितोषिके – दोन मराठी लेखसंग्रहांना वैचारिक लेखनासाठी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०१६ चा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार, ‘द फर्ग्युसनोनियन’ या फर्ग्युसन कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेकडून फर्ग्युसन गौरव पुरस्कार यासह विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.

25 एप्रिल 2022 त्यांचे निधन झाले. गोडबोले यांच्या स्मृतीस अभिवादन.

माधवराव गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके :

The Babri Masjid-Ram Mandir Dilemma : An Acid Test for Indian Constitution

The Changing Times : A Commentary on Current Affairs

The God who Failed – An Assessment of Jawaharlal Nehru’s Leadership

Good Governance : Never on India’s Radar

The Holocaust of Indian Partition – An Inquest

India’s Parliamentary Democracy on Trial

Indira Gandhi : An Era of Constitutional Dictatorship

Industrial Dispersal Policies – A Case Study oh Maharashtra

The Judiciary and Governance in India

Public Accountability and Transparency : Imperatives of Good Governance

Public Expenditure in Maharashtra – A Case for Expenditure Strategy

A Quest for Good Governance

Rural Employment Strategy – A quest in the Wilderness

Secularism : India at a Crossroad

Unfinished Innings : Recollections and Reflections of a Civil Servant (मराठीत – अपुरा डाव)

इंदिरा गांधी : एक वादळी पर्व

कलम ३७० आग्रह आणि दुराग्रह

नव्या दिशा बदलते संदर्भ

प्रशासनाचे पैलू, खंड १

प्रशासनाचे पैलू,

लोकपालाची मोहिनी

सत्ता आणि शहाणपण लेखसंग्रह

सार्वजनिक जबाबदारी व पादर्शकता; सुशासनाचे अत्यावश्यक घटक

सुशासन हे दिवास्वप्नच.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..