‘डिस्को किंग’ संगीतकार व गायक बप्पी लहिरी

बॉलिवूडला ‘रॉक’ आणि ‘डिस्को डान्स’ची ओळख करून देणारे आणि आपल्या संगीताने संपूर्ण देशाला वेड लावणारे ‘डिस्को किंग’ अर्थात सुप्रसिंद्ध संगीतकार व गायक बप्पी लहरी यांची क्रेझ अद्यापही संपलेली नाही. ‘बंबई से आया मेरा दोस्त,’‘आय एम अ डिस्को डान्सर’ पासून ते ‘ऊ लाला ऊ लाला’पर्यंत बप्पींचे गीत आजही लोकांच्या ओठांवर आहेत.

बप्पी लाहिरींनी डिस्को नृत्यांसाठी दिलेल्या चालींमुळे ते डिस्को किंग म्हणूनही ओळखले जातात.

बप्पी लहिरी यांचे आई आणि वडील दोघेही शास्त्रीय गायक आणि कंपोझर होते. त्यांच्याकडूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला. तीन वर्षांचा असताना ते तबला वाजवायला शिकलो. वयाच्या चौथ्या वर्षीच गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच्या गाण्यासाठी तबला वाजवला होता. या मुळे त्यांना ‘मास्टर बप्पी’ ही ओळख मिळाली. व तेच त्यांचे व्यावसायिक नांव बनले. डिस्को संगीताला नुसते हिंदी चित्रपटात वापरलेच नाही तर त्यात प्रावीण्य मिळवून त्यांनी अशी गाणीही गायली आहेत.

मोहम्मद रफी, किशोर कुमार, मन्ना डे ते लता मंगेशकर अशा सगळ्या महान गायकांसोबत त्यांनी काम केले आहे. अमिताभ ते आमीर आणि जयाप्रदा ते विद्या बालन अशा कलाकार त्यांच्या गाण्यांवर थिरकले आहेत. आता बप्पी दा ‘मोआना’या अ‍ॅनिमेटेड हॉलिवूडपटाच्या माध्यमातून डिज्नी वर्ल्डपणे पाऊल ठेवत आहे.
‘मोआना’ एक अ‍ॅनिमेटेड हॉलिवूडपट आहे. यात त्यांनी ‘शोना’ हे गाणे गायले आहे. शिवाय यातील ‘टमाटोआ’ या कॅरेक्टरला आवाज (व्हाईस ओवर) दिला आहे. टमाटोआ एक महाकाय खेकडा आहे. त्यांनी प्रथमच एका अ‍ॅनिमेटेड हॉलिवूडपटासाठी काम केले आहे.

बप्पी लहरी हे अनेक वर्षांपासून हॉलिवूडमध्ये काम करत आहेत. समंथा फॉक्स, बॉय जॉर्ज, एमसी हॅमर अशा अनेक हॉलिवूड कलाकारांना त्यांनी भारतातही आणले. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका हॉलिवूड अल्बमसाठी गाणे गायले होते.

बप्पी लहिरींनी संधी मिळाली तेव्हा शास्त्रीय रागांवर आधारित सुमधुर गाणीही तयार केली आहेत. त्यांची डिस्कोवर आधारित गाणी बरीच लोकप्रिय झाली. बप्पी लहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय आहेत. १९८० च्या दशकात त्यांच्या डिस्को डान्सर, नमक हलाल व शराबी सारख्या चित्रपटांमुळे ते खूप प्रसिद्ध झाले.  काळे चश्मे व दाग-दागिने यांची त्यांना खूप आवड आहे.

— संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2166 Articles
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…