आणि एके दिवशी एक घटना घडली. सांज समयी संधी प्रकाशात डोंगरावर प्रचंड ढगांची जमवाजमव दिसू लागली. निरनिराळे आकार, काळे-पांढरे ढग. त्याचवेळी अचानक चमकणाऱ्या विजांचे दिसणे, त्यांच्या रेषामय दिसणे, त्यांचे ढगामधून चंचलतेने होणारे वहन व प्रकाश आणि नंतर प्रचंड आवाज. सारे वातावरण एक भयानक भीती निर्माण करणारे भासत होते. सर्व चकीत होऊन त्याकडे बघू लागले. जे स्वत:ला शक्तीवान, सामार्थ्यवान समजत होते ते देखील त्या अनामिक ज्ञात नसलेल्या निसर्गाच्या एक प्रकारे रौद्र रुपाला घाबरुन गेले. जीवाला मृत्यूची भीती ही तर निसर्गाचीच देण असते. “सुरक्षित जगा वाढत जा आणि आपली योनी वृद्धींगत करीत जा” हाच तर निसर्गाचा मूलमंत्र असतो. तो प्रत्येक सजीव प्राणी त्याचा आधार घेत जगत असतो. सारे दृष्य बघून लोक घाबरुन गेले. त्याचक्षणी त्यावेळी तथा कथीत विद्वान परंतू शरिराने तसे अशक्त पुढे सरसावले. त्यांनी सर्वांना दिलासा दिला. ही सारी कोणतीतरी अदृष्य शक्ती आहे. प्रचंड ऊर्जा धारण केलेली आहे. ती सर्वांचे भले करील वा आपणांस नष्ट ही करु शकेल. आपण त्या शक्तीला विरोध न करता त्याला मान्यता देवू या. त्याच्या समोर नतमस्तक होवू या. त्या विद्वानाला सर्वांनी एक मुखाने मान्यता दिली. त्याचे विचार सर्वांना पटले. ह्यात मुख्यत्वेकरुन काही विचार धारा होत्या. जे दिसतं, जे जाणवतं, जे अनुभवले १) ते सार कोणत्यातरी अदृष्य, अज्ञात शक्तीमुळे २) त्याची शक्ती प्रचंड असे ३) ती सर्वांना मदत करेल ४) तिला विरोध केला तर ती सर्वाना नष्ट करेल ५) तिचा आकार, प्रकार बदलणारे असतील. सर्वांनी त्याच्या ह्या संकल्पनेला मान्यता दिली. रानटी वृत्ती मधून सामाजिक संकल्पनेला एक प्रकारे आरंभ होत होता. पुढे अशाच अनेक प्रसंगी अनेक वेळा नैसर्गिक तथा कथीत चमत्कारपूर्ण घटना घडत गेल्या. मग ती आग असो. विजेचे चमकणे असो, धरणीकंप असो, वादळ वारे असो, सुनामी वा समुद्राचे उसळणे असो, ज्वालामुखी असो वा असेच काही. जेव्हां मानव हा भयभीत होत गेला. त्या प्रसंगावर उपाय करण्याची त्याची बौद्धिक पाकळी वा क्षमता विकसित झालेली नव्हती. कोणत्याही प्रसंगाना विरोध न करता सारे मान्य होऊ लागले. नैसर्गिक तत्त्वानुसार जर सर्वच चक्रमय असेल तर हे प्रसंगही चक्रमय होते. ते येथे घडतं, प्रचंडता दर्शवितं, आघात करीत आणि अल्पकाळानंतर निघून जात. सर्व मानव जातीमध्ये एक विशाल चर्चेचा विषय मागे ठेवून ह्यातच दोन गोष्टी झाल्या. देवत्व अर्थात कोणत्यातरी अज्ञात, सामार्थवान, सर्व श्रेष्ठ संकल्पनेचा जन्म झाला. कदाचित वर वर्णिलेला ढगाचा वा विजेचाच प्रसंग असेल असे नाही. असे अनेक प्रसंग काळ व वेळेप्रमाणे घडत गेले. प्रत्येकाला कारण कोणते हे समजू शकले नाही. तशी त्यावेळी प्रगल्भता कमी पडू लागली. हतबलता मात्र प्रामुख्याने दिसू लागली. यातूनच जन्म पावला तो देवत्वाच्या माध्यमाचा. देवत्व हे श्रेष्ठत्व वा सामर्थ्य ह्या अंगाने त्याला मान्यता मिळू लागली. आज देखील आपण जेव्हा कांही प्रचलित संकल्पना व त्यात होणारा काळानुसार बदल लक्षात आणला, तर हे लक्षात येवू लागते.
About डॉ. भगवान नागापूरकर
2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply