नवीन लेखन...

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झीरवाळ

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झीरवाळ यांचा जन्म १९ जूनला झाला.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी सारख्या आदिवासीबहुल तालुक्या त वनारे या अतिदुर्गम गावात जन्मलेल्या नामदार नरहरी झिरवाळ यांचा जीवन प्रवास आजच्या तरूण पिढीला निश्चि तच प्रेरणा देणारा आहे. साधी राहणीमान, मितभाषी आणि अभ्यासू नेते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे. आदिवासी बहुल भागाचे प्रतिनिधीत्व करणारे झिरवाळ अथक संघर्षातून पुढे आले आहेत. नरहरी झिरवाळ हे दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचं गाव. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे.

झिरवाळ यांची राहणीमान अत्यंत साधी आहे. आजही ते साध्या घरात राहतात. विधानसभेचे उपाध्यक्ष झाले तरी आजही ते शेती काम करतात. जलंधारण, कुपोषण मुक्ती, जंगलतोड बंदी, आदिवासींचे प्रश्न आणि गुजरात पाणी प्रश्नावर त्यांचा गाढा अभ्यास आहे.

घरी अठराविश्वेश दारिद्य्र असूनही शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेतून त्यांनी गावातील प्राथमिक शिक्षणानंतर वणी येथे राहून उच्च शिक्षण घेतले. मात्र, पोटापाण्याची चिंता अन्‌ मार्गातील अनंत अडथळे यामुळे काही दिवस रोजगार हमी योजनेत रोजंदारीवर काम केले. नाशिकला बांधकाम ठेकेदाराकडे बिगारी म्हणूनही काम केले तर घरी पत्नी व त्यांनी विहीर खोदत शेती ही फुलवली.

दरम्यानच्या काळात शिक्षण आणि स्वकतृत्त्वाच्या जोरावर तहासिल कार्यालयात नोकरीही केली. या काळात त्यांना प्रामुख्याने आदिवासी व शेतकरी बांधवांच्या समस्या जवळून बघावयास मिळाल्या. जनता दलाचे माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांच्या ते संपर्कात आले आणि जनता दलातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले आणि वनारे गावचे सरपंचही झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २००१ साली ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिल्हा परिषदेवर निवडून आले. त्यानंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीचं राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं आणि ते विजयी झाले.

विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत झिरवाळ यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत भरुन काढला. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी १२ हजार ६३३ मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झिरवाळ यांनी ६० हजार ८१३ च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. या विजयासह झिरवाळ यांनी सलग दोनवेळा दिंडोरी मतदार संघातून निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळवला. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यावर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर उपाध्यक्षपद झिरवाळ यांच्याकडे आहे.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..