नवीन लेखन...

क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ

मोहिंदर ‘ जिमी ‘ अमरनाथ भारद्वाज यांचा जन्म २४ सप्टेंबर १९५० रोजी पंजाबमधील पटियाला येथे झाला. त्यांचे वडील लाला अमरनाथ आणि त्यांचे बंधू सुरिंदर अमरनाथ हेदेखील भारतीय संघासाठी क्रिकेट खेळलेले होते. सुरवातीला मोहिंदर अमरनाथ शॉर्ट पीच जलद गोलंदाजी करत असत परंतु त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी मात्र ते अत्यंत झुंझार फलंदाज म्हणून प्रसिद्धीस आले अर्थात ते गोलंदाजीही करत असत. खरे तर त्यांनी पहिला कसोटी सामना २४ डिसेंबर १९६९ रोजी खेळला होता परंतु ते १९८३ मध्ये परत खेळण्यास आले कारण त्याआधी तीन वर्षे त्यांच्या खेळण्यात खंड पडलेला होता. परंतु आल्यावर त्यांनी ११ कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध खेळताना ११८२ धावा केल्या त्या पाच शतकांच्या सहाय्याने.

त्यानंतर १९८३ च्या वर्ल्ड कप मध्ये तर त्यांनी कमालच केली होतो. त्यांनी २६ धावा केल्या आणि ३ विकेट्स घेतल्या होत्या त्या १२ धावांमध्ये, त्या सामन्यात मदनलाल यांनी देखील तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या म्हणून आपल्याला वर्ल्ड कप जिंकण्याच्या जास्त जवळ जाता आले.  अर्थात त्या वर्ल्ड कपच्या सामन्यात प्रत्येक खेळाडूचे महत्वाचे कर्तृत्व होते हे निश्चितच. त्यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे २४ डिसेंबर १९६९ रोजी खेळला. त्या सामन्यात त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये नाबाद १६ धावा केल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये ते शून्यावर बाद झाले. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या इनिंगमध्ये दोन खेळाडू बाद केले होते. त्यावेळी त्यांनी स्टॅकपॉल आणि इयान चॅपल याला बाद केले होते.

मोहिंदर अमरनाथ एकदम झुंजार खेळाडू होते आजही इम्रान खानचा त्यांच्या डोक्याला लागलेला चेंडू पाहून अंगाचा थरकाप उडतो. त्यावेळी हेल्मेट वापरत नव्हते. मोहिंदर अमरनाथ यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील. फलंदाजीला येताना त्यांच्या पॅन्टच्या मागच्या खिशात लाल रुमाल असे आणि त्याचे लाल टोक नेहमी बाहेर आलेले असे, अर्थात त्यांची तशी श्रद्धा होती तर एकदा मुंबईच्या सामन्यात ते त्यांच्या वडिलांची हॅट घालून आले होते, जुन्या पद्धतीची शिकारीची ती हॅट होती, लाला अमरनाथ खेळताना ती हॅट घालत असत. मोहिंदर अमरनाथ फलंदाजीसाठी आले असताना ते स्टंपजवळ वाकले आणि त्यांची ती हॅट स्टंपवर पडली, आणि बेल खाली पडली, झाले अंपायरने त्यांना बाद केले तेव्हा तो प्रसंग स्लो मोशनमध्ये अनेक वेळा दाखवला जात होता आणि लोक चुचुकत का होईना तो प्रसंग एन्जॉय करत होते.

ते फलंदाजीमध्ये जबरदस्त होते विशेषतः देशाबाहेर कारण त्यांच्या एकूण ११ शतकांपैकी ९ शतके त्यांनी देशाबाहेरच्या मैदानावर केलेली आहेत. त्यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध चेन्नई येथे ११ जानेवारी १९८८ रोजी खेळला. त्यांनी ६९ कसोटी सामन्यात ४,३७८ धावा ४२.५० च्या सरासरीने केल्या. त्यामध्ये त्यांनी ११ शतके आणि २४ अर्धशतके केली. त्यांची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती १३८ धावा तसेच त्यांनी ६३ धावा देऊन ४ विकेट घेतल्या तर त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ३२ विकेट्स घेतल्या आणि ४७ झेल पकडले.

त्यांनी ८५ एकदिवसीय सामन्यात १,९२४ धावा केल्या त्यामध्ये २ शतके आणि १३ अर्धशतके होती. त्यांची एकदिवसीय सामन्यामधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद १०२ धावा. तसेच त्यांनी ४६ विकेट्स घेतल्या आणि २३ झेलही पकडले.

मोहिंदर अमरनाथ यांनी २४८ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात १३,७४७ धावा केल्या त्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २०७ धावा तसेच त्यांनी ३० शतके आणि ६७ अर्धशतके केली. तसेच त्यांनी एकूण २७७ विकेट्स घेतल्या. एका इनिंगमध्ये त्यांनी २७ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या होत्या.

मोहिंदर अमरनाथ यांनी अनेक वादग्रस्त विधाने निवड समितीवर केलेली होती ती खूपच गाजली. आजही मोहिंदर अमरनाथ म्हटले की त्यांची फलंदाजी आठवते आणि १९८३ चा वर्ल्ड कप.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 447 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..