नवीन लेखन...

निवडणूक मार्गदर्शक तत्त्वे – काय करावे, काय करु नये

Code of Conduct for Elections

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत काय करावे आणि काय करु नये याबद्दल माहिती.

काय करावे :

१. पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या मुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी साह्यकारी व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील व त्या पुढे सुरु ठेवता येतील.

२. शांततामय व उपद्रवरहित गृहस्थजीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तिच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे.

३. प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस प्राधिकार्‍यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि अशी सर्व परवानगी मिळविण्यात यावी.

४. प्रस्तावित सभेची ध्वनिवर्धक किंवा इतर अशा सवलतीचा वापर करण्यासाठी परवानगी मिळविली पाहिजे.

५. मोर्च्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ देऊ नये.

६. ज्यांचा क्षेपके किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल अशा कोणत्याही वस्तू मोर्च्यात सहभागी असलेल्या व्यक्तिने बाळगू नये.

७. मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेने पार पडावे यासाठी सर्व वेळी सर्व निवडणूक अधिकार्‍याना सहकार्य देण्यात यावे.

८. बिल्ले व ओळखपत्रे, निवडणुकीचे काम करणार्‍या व्यक्तिंनी ठळकपणे लावली पाहिजे.

९.निवडणुक आयोगाचे वैध प्राधिकार पत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तिस कोणत्याही वेळी मतदार कक्षात प्रवेश करता येणार नाही.

१०. मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधाचे पूर्णपणे पालन करण्यात यावे.

काय करू नये :

१.शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचाराविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनांत पुढील कार्यालयांच्या वाहनांचा समावेश असेल-(1) केंद्र शासन (२) राज्य शासन (३) केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम (४) केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त क्षेत्रातील उपक्रम (५) स्थानिक (६) महानगरपालिका (७) नगरपालिका (८) पणन मंडळे (कोणत्याही नावाची) (९) सहकारी संस्था (१०) स्वायत्त जिल्हा परिषदा किंवा (११) ज्यामध्ये सार्वजनिक निधी मग तो एकूण निधीच्या हिश्यातील कितीही अल्पांशाने असो गुंतवण्यात आला आहे, अशी कोणतीही संस्था तसेच (१२) संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची आणि गृह मंत्रालय व राज्य शासने यांचया् केंद्रीय पोलीस संघटनेच्या मालकीची वाहने.

२. सत्तेमध्ये असलेला पक्ष/शासन यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टाबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देण्यात येऊ नये.

३. कोणत्याही वित्तीय अनुदानांची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते इ. बांधण्याचे वचन देणे इ. गोष्टी करू नयेत.

४. शासन/सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करू नयेत.

५. कोणताही मंत्री, तो उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्या खेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही.

६. निवडणूक मोहीम/प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये.

७. मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे कोणतेही प्रलोभन दाखवण्यात येऊ नये.

८. मतदाराच्या जातीय भावनांना आवाहन करण्यात येऊ नये.

९. मतदानाच्या दिवशी ओळख चिठ्या वितरित करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षानिकट प्रचारपत्रके, पक्षाचे ध्वज, चिन्हे किंवा इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये.

१०. ध्वनिवर्धकाचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसवलेले असोत सकाळी ६.०० वाजल्यापूर्वी किंवा मध्यरात्रीनंतर आणि संबंधित प्राधिकार्‍यांनी पूर्व लेखी परवानगी घेतली असल्याखेरीज वापर करू नये.

११. प्राधिकार्‍याची पूर्व लेखी परवानगी असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मोर्चात ध्वनिवर्धकाचा वापर करू नये. सर्वसाधारणपणे अशा सभा/मोर्चे रात्री १०.०० वाजल्यानंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार नाही. याखेरीज ती स्थानिक कायदे, त्या क्षेत्रातील सुरक्षिततेच्या आवश्यकतेचा स्थानिक दृष्टिकोन आणि हवामान, सणासुदीचा मोसम, परीक्षेचा काळ यांच्या अधीनतेने असतील.

(काय करु नये यासंबंधीची सूची केवळ वानगीदाखल आहे. सर्वसमावेशक नाही व ज्यांचे पालन काटेकोरपणे केले जावयास पाहिजे. वरील विषयाच्या संबंधातील कोणतेही इतर तपशीलवार आदेश, निदेश /अनुदेश यांना पर्याय म्हणून वापरले जाणे अभिप्रेत नाही.)

— मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..