नवीन लेखन...

सीएफएल बल्ब

वीज वाचवणे हे वीज निर्माण करण्याइतके महत्त्वाचे आहे यात शंका नाही. आपल्याला प्रकाश देतात ते बल्ब किंवा ट्यूब यांना जास्त वीज लागते, त्यामुळे कमी विजेवर चालणारे सीएफएल बल्ब तयार करण्यात आले. हे बल्ब कमी किमतीत जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न चालू आहेत.

सीएफएल याचा अर्थ कॉम्पॅक्ट फ्लुरोसंट लॅम्प असा आहे. पूर्वी हे बल्ब आपल्या नेहमीच्या बल्बच्या सॉकेटमध्ये बसत नव्हते, आता ते बसतील अशाच पद्धतीने तयार केले आहेत. आपल्या नेहमीच्या बल्बइतकाच प्रकाश हे बल्ब कमी वीज खर्च करून देत असतात. त्यांचा प्रकाश हा शुभ्र चांदण्यासारखा पडतो, त्यामुळे तो आल्हाददायक वाटतो. या ब्लबचे एकच वैगुण्य म्हणजे त्यात पारा वापरलेला असतो व निकामी झालेल्या सीएफएल बल्बची विल्हेवाट लावणे ही डोकेदुखी असते, त्यामुळे अशा प्रकारचा बल्ब गेल्यानंतर तो पुन्हा दुकानदाराकडे जमा करावा, नाहीतर कुठेही फेकल्यास त्यातील विषारी पारा पर्यावरणात मिसळू शकतो.

सीएफएल दिव्यांचे मूळ असलेला फ्लुरोसंट लॅम्प १८९० मध्ये पीटर कुपर हेविट यांनी १८९० मध्ये तयार केला. आज आपण ज्या स्वरूपात हा बल्ब बघतो आहोत तो जॉर्ज इनमन यांन जनरल इलेक्ट्रिकच्या मदतीने तयार केला. स्पायरल ट्यूब असलेला असा बल्ब एडवर्ड हॅमर यांनी जनरल इलेक्ट्रिकमध्ये असताना तयार केला. आपल्या नेहमीच्या इलेक्ट्रिक बल्बपेक्षा हे बल्ब दहापट जास्त टिकतात व ८० टक्के कमी वीज खातात. या एका बल्बमुळे एक टन कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात मिसळण्याचे टळते. सीएफएलमध्ये प्रकाशनिर्मितीसाठी फ्लुरोसन्स पद्धत वापरतात.

काजवे ज्याप्रमाणे रसायनांचा वापर करून उष्णतेशिवाय शीतल प्रकाश देतात तेच तंत्र यात असते. सीएफएलमध्ये गॅसने भरलेली ट्यूब असते, तसेच चुंबकीय किंवा इलेक्ट्रॉनिक बॅलास्ट असतो. बॅलास्टमध्ये सर्किट असते, त्यात रेक्टिफायर, फिल्टर कपॅसीटर व दोन स्वीचिंग ट्रान्झिस्टर असतात. ते डीसी टू एसी इनव्हर्टरला जोडलेले असतात. त्यामुळे बल्बला ४० किलोहर्ट्स किंवा त्याहून अधिक फ्रिक्वेन्सी मिळते. बल्बला मिळालेला करंट हा रेझोनंट कनव्हर्टरने स्टॅबिलाईज केला जातो व प्रकाशाची निर्मिती होते. आता सीएफएलमध्ये इलेक्ट्रॉनिक बॅलास्ट असतात, त्यामुळे थेट प्रकाशताना वेळ घेत नाहीत.

सीएफएलचा ९-१३ वॉटचा बल्ब आपल्या ४० वॉटच्या इलेक्ट्रिक बल्बइतका, १३-१५ वॉटचा सीएफएल ६० वॉटच्या इलेक्ट्रिक बल्बइतका १८-२५ वॉटचा सीएफएल ७५ वॉटच्या इलेक्ट्रिक बल्बइतका प्रकाश देतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..