राजकुमारी दुबे उर्फ राजकुमारी एक गोड आवाजाच्या पार्श्वगायिका. बोलपटाच्या सुरवातीच्या पार्श्वगायन गायिका म्हणून राजकुमारी दुबे यांना ओळखले जाते. त्या पहिल्या महिला पार्श्वगायिका म्हणून सुद्धा ओळखल्या जात. बाल स्टेज कलाकार म्हणून राजकुमारी यांनी आपले करियरची सुरवात केली १९३३ मधील ‘आंख का तारा’, ‘भक्त और भगवान’, व १९३४ मध्ये आलेल्या लाल चिट्ठी, मुंबई की रानी, ‘शमशरे आलम’ या […]
मालतीबाई बेडेकरांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. त्यांचा जन्म १८ मार्च १९०५ आवास, रायगड येथे झाला. विश्राम बेडेकरांशी १९३८ साली त्यांचा विवाह झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या. ‘महिला सेवाग्राम’शी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सह्रदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दु:खी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या […]
पुण्याच्या फिल्म अॅ ण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमधून सुवर्णपदक मिळवून नवीन निश्चल ‘सावन भादो’ या १९७० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर झळकले. त्यानंतर ‘संसार’, ‘परवाना’, ‘बुढ्ढा मिल गया’, ‘नादान’, ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’, ‘हँसते जख्म’, ‘धर्मा’, ‘छलिया’, ‘धुंद’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यांचा जन्म १८ मार्च १९४६ रोजी झाला. दोन पंजाबी आणि सुमारे ८०-९० चित्रपटांतून सुरुवातीला नायक किंवा सहनायक […]
दत्ता वाळवेकर हे फक्त मराठी भावगीत गायक आणि संगीतकार नव्हते तर उत्तम समीक्षक, शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, सुलेखनकार, छायाचित्रकार सुध्दा होते. त्यांचा जन्म ३० मार्च १९२८ रोजी बेळगाव येथे झाला. १९४८ च्या सुमारास मास्टर दत्ता या नावाने ते मेळयामध्ये काम करीत. बापूराव माने यांच्या बरोबर त्यांनी ’’युध्दाच्या सावल्या’’, ’’लग्नाची बेडी’’ अशा नाटकातून भूमिका केल्या. याच काळात त्यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व, सीताकांत […]
‘बिब घ्या बिब शिककाई.., परिकथेतील राजकुमारा..गोड गोजिरी लाज लाजिरी.. अशा एकाहून एक अवीट गोडीच्या मराठी व २०० हून अधिक हिंदी गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या कृष्णा कल्ले या मूळच्या कारवारच्या. त्यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० रोजी झाला. पण त्यांचे वडील कानपूर येथील नोकरीला होते. त्यामुळे त्यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदी भाषी प्रदेशात झाले. परिणामी त्यांच्या गळ्यावर मूळच्या […]
बरकत राय मलिक उर्फ वर्मा मलिक यांचा जन्म १३ एप्रिल १९२५ रोजी फरीदाबाद पाकिस्तानचा येथे झाला. खूप लहान वयात त्यांनी कविता लिहण्यास सुरवात केली, फाळणीनंतर ते दिल्लीत स्थाईक झाले. संगीत निर्देशक हंसराज बहल यांचे भाऊ वर्मा मलिक यांचे मित्र होते त्याच्या मुळे ते मुंबईला आले. पंजाबी चित्रपटापासून वर्मा मलिक यांनी सुरवात केली. बहल यांनी वर्मा को पंजाबी चित्रपट […]
अल्लादिया खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी झाला. मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले. खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोट्याशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. मा.अल्लादिया खाँ यांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’ […]
मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणार्याच या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला. त्यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी झाला.‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ अशी हाक देऊन पृथ्वीला ‘सुरलोक साम्य’ प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणार्याक कवी केशवसुत. कवी केशवसुत म्हणजे मराठी कवितेच्या […]
श्वास, सामना, गारंबीचा बापू, सरीवर सरी, एक डाव भुताचा असे गाजलेले चित्रपट आणि ‘घाशीराम कोतवाल’ सारखी अजरामर नाटय़कृती संगीतबद्ध करणारे प्रयोगशील संगीतकार, प्रसिद्ध सतारवादक आणि अध्यापक भास्कर चंदावरकर यांनी रवीशंकर व त्याच्या पत्नी अन्नपुर्णा देवी यांच्याकडून त्यांनी सतारवादनाचं शिक्षण घेतलं. त्यांचा जन्म १६ मार्च १९३६ रोजी झाला.चित्रपट आणि संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि संशोधन करणा-या जगातल्या मोजक्या जाणकारांमध्ये त्यांचं नाव […]