माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसर्याध पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते.त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला. ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. ग्रेस यांची “ती गेली तेव्हा’ ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, तेव्हा आईला तिरडीवरून नेताना त्यांना ही कविता सुचली. त्यांच्या विषण्ण मनाने […]
पं. वामनराव सडोलीकर यांच्याबद्दल आजच्या पिढीला काही माहित नाही, पण मागच्या दोन पिढ्या मात्र जरूर त्यांची आठवण काढतात. मा.पं. वामनराव सडोलीकर यांना घरात भाऊ म्हणत. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूरपासून जवळच कोथळी गावी झाला. फार लहान वयात घर सोडून मुंबई आणि नाशिकला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या ‘गांधर्व महाविद्यालया’त पं. वामनराव सडोलीकर दाखल झाले. अल्पकाळ घरी कोल्हापूरला राहून […]
लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. हे पेशाने वास्तुविशारद होते. त्यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. कथा,ललित लिखाण, नाटक अशा सर्व लेखनप्रकारात उत्तम लिखाण करणारा हा लेखक व पुं चे विशेष म्हणजे कथेला एकदम शेवटी कलाटणी देण्याची ताकद … आणि जाता जाता जीवन विषयक तत्वज्ञान थोडक्यात सांगुन जायची त्यांची हातोटी .पण सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी मिळवणार्याज काही मोजक्या लेखकांमध्ये […]
नुरी ओ दिलबर …आजा रे …. नुरी ह्या चित्रपटातील या ओळी आज ही आपल्याला फारूक शेख यांचा गोड चेहरा.. आणि सुंदर अभिनय आठवून जातात ..आपल्या सहजसुंदर अभिनयाने व अनोख्या अदाकारीच्या जोरावर सामान्यजनांच्या हृदयात स्थान मिळविणारे फारुख शेख यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी बडोदा जिल्ह्यातील अमरोली येथे झाला.बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी […]
भावुक डोळे, साधारण सौंदर्य व ओठांखाली असलेला तीळ, ठेंगणी मुर्ती असं व्यक्तीमत्व असलेल्या व आपल्या उत्साहाने भारलेल्या मा.बेबी नंदा यांनी अनेक दशकं चित्रपट सृष्टी गाजवली. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. बेबी नंदा या मराठी चित्रपट सृष्टीतले एकेकाळचे आघाडीचे दिग्दर्शक निर्माते असलेल्या मास्टर विनायक यांच्या कन्या. मा.बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. मास्टर विनायक […]
मुकुल शिवपुत्र हे पद्मभूषण पंडित कुमार गंधर्व यांचे पुत्र आणि प्रमुख शिष्य आहेत आणि त्यांना भारतीय संगीतातील एक उत्तम गायक मानले जाते. त्यांचा जन्म २५ मार्च १९५६ रोजी झाला. मुकुल शिवपुत्र यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे यांच्याकडून धृपद-धमाराचे, तर एम. डी.रामनाथन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले.मुकुल हे ख्याल, भक्तिसंगीत व लोकगीतांसाठी विशेष ओळखले जातात. […]
कालच ‘दै. महाराष्ट्र टाईम्सचे’ संपादक, ज्येष्ठ पत्रकार व लेखक गोविंदराव तळवलकर यांचे अमेरिकेत निधन झाले. ‘मटा’चे ते माजी संपादक असले तरी माझ्या मनात मटा म्हणजे गोविंदराव हे समिकरण पक्क बसलंय व म्हणून मी सुरूवातीला त्यांचा उल्लेख ‘मटाचे संपादक’ असाच केलाय. मला समजायला लागल्यापासून पेपर वाचणं हा माझा छंद. आज वयाच्या ५१ व्या वर्षीही पेपर वाचल्याशिवाय दिवसाची […]
स्मृती इराणी याचे माहेरचे नाव स्मृती मल्होत्रा. स्मृती या तीन बहिणींपैकी सर्वात मोठ्या आहेत. दहावीच्या वर्गात असल्यापासूनच त्यांनी काम करायला सुरवात केली. एक ब्यूटी प्रॉडक्टच्या प्रचारासाठी त्यांना दिवसाला २०० रूपये मिळत असत. माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली होती. अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी मा.स्मृती इराणी दिल्लीतून मायानगरी मुंबईत आल्या. त्यांचे पूर्ण बालपण दिल्लीतच […]
जिवंतपणीच दंतकथा बनण्याचा मान मिळविलेली हॉलिवूडमधील मदमस्त नायिका, तसेच हॉलिवूडच्या सुवर्णकाळाची एक अनभिषिक्त सम्राज्ञी एलिझाबेथ टेलर या लिझ या नावाने ओळखल्या जायच्या. त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९३४ रोजी झाला. एलिझाबेथ टेलर हॉलिवूडमधील कारकीर्द संपल्यानंतरही सतत चर्चेत राहिल्या. मेट्रो-गोल्डविन-मेयर कंपनीच्या चित्रपटांतून वयाच्या नवव्या वर्षी त्या सर्वप्रथम ‘देअर इज वन बॉर्न एव्हरी मिनिट’ या चित्रपटात बाल कलाकार म्हणून झळकल्या. ‘फादर ऑफ द […]