नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा

रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. त्यांच्या आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १८७४ रोजी झाला. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, […]

बालकवी ठोंबरे

बालकवी ठोंबरे यांचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी झाला. बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, […]

जुन्या काळातील जेष्ठ संगीतकार नौशाद अली

नौशाद यांचे लहानपण लखनौमध्ये गेले. ते ज्या ठिकाणी राहायचे त्याच्या बाजूलाच एक थिएटर होतं. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला.पूर्वी चित्रपट चालू असताना त्याचं पार्श्वसंगीत पडद्यासमोर बसलेली मंडळीच द्यायची. घरात बसल्या बसल्या या पार्श्वसंगीताचे सूर नौशाद यांच्या कानांवर पडायचे. यामुळे ते संगीताकडे खेचले गेले. लादनसब हे अशा प्रकारचे संगीत देण्यास माहीर होते. त्यांचा वाद्यवृंद पार्श्वसंगीत देत असताना नौशाद […]

बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी.रानी

बुलो सी रानी यांचे पूर्ण नाव बुलो चंदीराम रामचंदानी. बुलो. सी. रानी यांच्या नावाची हकीगतही रंजक आहे. त्यांचा जन्म ६ मे १९२० रोजी हैद्राबाद पाकिस्तान येथे झाला.सिंधी समाजात जन्माला आलेल्या बुलो चंदी रमानी यांनी आडनावाचं इंग्रजी आद्याक्षर ‘सी’ वेगळं काढलं व ‘रमानी’चं ‘रानी’ करून टाकलं. त्यामुळं अनेकांना हा पुरुष संगीतकार की स्त्री संगीतकार असा प्रश्न पडे. मा.बुलो सी रानी यांचे […]

प्रसिद्ध कादंबरीकार आणि वाचकप्रिय लेखक बाबा कदम

बाबा कदम यांचे खरे नाव वीरसेन आनंद कदम होते. त्यांचे वडिल अक्कासाहेब महाराजांचे स्वीय सचिव होते. संस्थांनी वातावरणातच बाबांचे बालपण गेले. त्यांचा जन्म ४ मे १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झाला. त्यांचे वडिल रेसकोर्सवर अधिकारी म्हणूनही कार्यरत असत. त्याचाच परिणाम बाबांच्या कथालेखनात झाला. त्यांच्या कथा, कादंबर्यानत मात्र ऐतिहासिक पार्श्वभूमी, संस्थानिक गढ्या, वाडे, सरंजामी सदर बोली भाषा, पोलीस, कायदा, […]

सुप्रसिद्ध भावगीत गायक अरुण दाते

इंदूरच्या रामूभैय्या दाते यांचा दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. रामूभैय्या म्हणजे अरुण दाते यांचे वडील. अरुण दाते यांचा जन्म ४ मे १९३५ रोजी झाला. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले. […]

मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे

‘मला आई व्हायचंय’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातून घराघरात ओळखली जाणारी प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर. तिचा जन्म ४ मे १९८६ रोजी पुणे येथे झाला. उर्मिला ही एक उत्तम अभिनेत्री आहे सर्वांना माहित आहे मात्र ती एक उत्तम क्लासिकल डान्सर असल्याचे फार कमी चाहत्यांना माहित असेल. प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे उर्मिलाने कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. उर्मिला ओडिसी नृत्यशैलीचेही […]

अरुणा इराणी

साठ च्या दशकात गंगा जमुना या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या अरुणा इराणी यांनी तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. त्यांचा जन्म ३ मे १९५२ रोजी झाला. १९६१ मध्ये गंगा जमुना या सिनेमात काम करणा-या अरुणा यांचे त्यावेळी वय केवळ नऊ वर्षे होते. ‘जहां आरा’, ‘फर्ज’, ‘उपकार’, ‘आया सावन झूम के’, ‘कारवां’ यांसारख्या हिट सिनेमांमध्ये मा.अरुणा इराणी यांनी […]

बॉलिवूड मधील स्वप्नसुंदरी अशी ओळख असलेल्या नर्गिस दत्त

नर्गिस दत्त यांचे खरे नाव फातिमा राशिद. त्यांचा जन्म १ जून १९२९ रोजी झाला. १९३५ साली त्यांनी तलाश-ए-हक चित्रपटातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. ज्यावेळी त्या सहा वर्षांच्या होत्या. त्यांना बेबी नर्गिस असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हेच नाव शेवटपर्यंत धारण केले. १९४३ साली त्यांनी मोतीलाल यांच्यासमवेत वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपट केला. त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण बाल कलाकार […]

पटकथा लेखक सचिन भौमिक

१९५८ साली नर्गिस यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लाजवंती’ या चित्रपटापासून सचिन भौमिक यांनी पटकथा लेखनाला सुरुवात केली. त्यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी झाला.त्यानंतर १९६० साली बलराज साहनी व लीला नायडू यांच्या अभिनयाने गाजलेल्या ‘अनुराधा’ चित्रपटाला त्यावर्षीचा उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने भौमिक कथा-पटकथा लेखक म्हणून प्रस्थापित झाले. ‘आई मिलन की बेला’, ‘जानवर’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘गोलमाल’, ‘हम किसीसे […]

1 318 319 320 321 322 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..