नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके

वासुदेव बळवंत फडके (नोव्हेंबर ४, १८४५:शिरढोण, महाराष्ट्र – फेब्रुवारी १७, १८८३:एडन) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. […]

अभिनेत्री स्मिता पाटील

रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या. स्मिता एका राजकीय घराण्यातून पुढे आलेली […]

मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक, संगीतकार भास्करबुवा बखले

बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे भास्करबुवानी गायनकलेचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखाँ यांनी बखलेंची शिकवणी घेतली. फैजमहंमदखाँ, नथ्थनखाँ आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन […]

सिमी गरेवाल

सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच. सिमी गरेवाल यांचे वडील जे. एस. ग्रेवाल आर्मीत ब्रिगेडियर होते. त्यांचे बालपण इंग्लंडमध्ये गेले आणि शिक्षण न्यूलँड हाऊस स्कूलमध्ये झाले होते. इंग्लंडमध्ये बालपण घालवल्यानंतर किशोरावस्थेत सिमी भारतात परतल्या. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी दिल्ली येथे झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी तिला ‘टार्जन गोज टू इंडिया’ या […]

विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट

जुन्या काळातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म १२ मे १९०७ रोजी झाला. विजय भट्ट यांची प्रकाश पिक्चर्स व एव्हरग्रीन पिक्चर्स नावाची सिनेवितरण कंपनी होती. विजय भट यांचे रामराज्य (१९४३), बैजू बावरा (१९५२), गूंज उठी शहनाई (१९५९), हिमालय की गोद में (१९६५) हे चित्रपट खूप गाजले. गिरगाव, ग्रॅण्ट रोड येथील सुपर टॉकीज मध्ये […]

ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर

‘नयन तुझे जादूगार’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत मानापमान’ अशा विविध संगीत नाटकांतून व्यावसायिक रंगभूमीवर आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर पिळगांवकर यांनी पंडित के. डी. जावकर, पंडित जितेंद्र अभिषेकीआणि पंडित गोविंदराव अग्नी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले तर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम […]

पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर

हिराबाई पेडणेकर यांच नाव आज विस्मृतीत गेले आहे. हिराबाई यांना साहित्याची फार आवड होती. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८८५ रोजी सावंतवाडी येथे झाला. हिराबाई यांनी आपलं सातवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यावर साहित्याचे धडे घेण्यासाठी खाजगी शिकवणी लावली. साहित्य आणि मराठी भाषेची आवड असल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी मराठी भाषेत प्रभुत्व प्राप्त केले. मराठी साहित्याचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. मराठी […]

दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज असलेले ओम पुरी

रंगभूमी असो किंवा समांतर सिनेमा, टीव्ही, बॉलिवूड, हॉलिवूडचा पडदा; भूमिका दहा मिनिटांची असो किंवा नायकाची; ती अजरामर करण्याची ताकद ओम पुरी यांच्याकडे होती. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाना मधील अंबाला येथे झाला. चेहरा देखणा नव्हता, पण दमदार अभिनय आणि भारदस्त आवाज, या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला होता. विशेष म्हणजे, या […]

तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे

विजय घाटे यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरवात केली. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६४ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १२ व्या वर्षी त्यांनी तबलामधील विशारद पदवी मिळविली होती. वयाच्या १६ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि बारा वर्षांहून अधिक काळ तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या कडे गुरुकुल पध्दतीत शिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षीही ते […]

गीतकार शांताराम नांदगावकर

“हृदयी वसंत फुलताना’ यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला.सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर. मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. ‘पाहिले […]

1 271 272 273 274 275 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..