नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

सारे म्हणती माझे माझे (सुमंत उवाच – १११)

योग्य मार्ग, योग्य नीती, योग्य कर्म, योग्य परिणाम, योग्य समय याचे गणित आपल्या आयुष्यात अनुभव आणि सद्गुरू सोडवू शकतात. म्हणून थोरल्या लोकांचा अनुभव आपल्या प्रगती साठी कसा मोलाचा ठरेल याचे गणित मांडलेत की यशाच्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी पिछेहाट होणार नाही. […]

भरुनी येता आकाशी (सुमंत उवाच – १०९)

पावसाळा! काहींना न आवडणारा शब्द तर काहींसाठी आनंदाचं उधाण घेऊन येणारा शब्द. मला पावसाच्या रिमझिम सरींमध्ये भिजायला आवडतं, तर काहींना मुसळधार कोसळणाऱ्या पावसात चिंब व्हायला. पण, पावसाळा म्हटलं की कित्येक चांगल्या- वाईट गोष्टी तो घेऊन येतो. […]

मुकुट शिरी तो धारण करूनी (सुमंत उवाच – १०८)

विजापूर दारी चाकरी करणारे मोरे बंधु शिवाजीच्या कर्तृत्वाने चिडले होते. आपल्यापेक्षा लहान असलेल्या एका मुलाने आम्हास नोकरी द्यावी, हा त्यांचा अपमान होता आणि म्हणूनच त्यांनी शिवाजीला पकडून आणण्याचे आदेश दिले होते. […]

पत सांभाळण्या तीर मारिला (सुमंत उवाच – १०७)

दिल्लीचा बादशहा, आलमगीर, आलंपन्हा औरंगजेब याचा पुत्र अकबर त्याच्या कपटी स्वभावास, त्याने केलेल्या अघोरी कृत्यांना जाणून होता. ज्याने आपल्या भावाला आणि बापाला मारलं तो आपल्या मुलाची किंमत काय करेल अशी भीती अकबरास वाटू लागली आणि ठिणगी पडली, अकबर फुटला आणि बापविरोधात बंड पुकारून उत्तरेतून दख्खनला आला तो थेट संभाजी महाराजांना भेटायला. […]

गिरनार यात्रा (भाग – ५)

आम्ही सृष्टी सौंदर्य दर्शन आटोपते घेतले आणि उतरायला सुरुवात केली. गुरुशिखराच्या शेवटच्या काही पायऱ्या खूपच अरुंद होत्या आणि जवळ जवळ होत्या.त्यामुळे माझ्या चप्पल घसरायला लागल्या. शेवटी मी काही पायऱ्या चपला सरळ हातात घेऊन उतरले. […]

उंची त्याने गाठून पाहिली (सुमंत उवाच – १०६)

संभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६८० मार्च नंतर ते १६८९ सुरुवातीपर्यंत अनेक लढाया झाल्या. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर जणू डोलत होते. औरंगजेब सारखा विषारी सर्प स्वराज्याला चारही बाजूने विळखा घालून बसला होता. […]

पर्जन्य काल समीप येता (सुमंत उवाच – १०५)

पावसाळा जवळ आला, आता नालेसफाई कधी होणार? परत या वर्षी मुंबई तुंबणार का? किती दिवस ट्रेन बंद राहणार पावसामूळे? या सारख्या अनेक चिंता लोकांना सतावू लागतात आणि मग त्यावर काही ठोस उत्तर मिळाले नाही की मग लोकं व्यवस्थापनाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात. […]

गिरनार यात्रा (भाग – ४)

काही तरी अद्भुत घडलंय अस वाटत होतं. कदाचित माझ्या ह्या भावना आईपर्यंत त्या आजू बाजूच्या तरल वातावरणाने पोहचवला असतील. आईला पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने जाग आली. […]

1 34 35 36 37 38 150
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..