राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

लढा दारिद्र्य हटवण्यासाठी

जगातील बहुतांश देशांमध्ये आर्थिक सुधारणांचे वारे वाहत असले तरी दारिद्रयरेषेखाली जगणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये दोन वेळचे अन्नही धड न मिळणार्‍यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत संपन्न देशांनी आपल्या संपत्तीचा छोटा हिस्सा गरिब देशातील जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यावर खर्च करायला हवा. या धारणेतून आता काही ठोस प्रयत्न केले जात आहेत. […]

निर्णयात भक्ती-भावनेचा विचार

बहुचर्चित रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाचा निकाल अखेर लागला आणि अख्ख्या देशातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने या निर्णयाचे सर्व स्तरांमध्ये शांततेने स्वागत झाले. या निर्णयात न्यायालयाने भक्ती आणि भावनांचा अधिक विचार केल्यासारखे वाटते. तसेच वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर होते असे सांगण्यापेक्षा रामाचा जन्म त्याच ठिकाणी झाला असे सांगणे संयुक्तिक वाटत नाही.
[…]

लुटीचे नवे साधन

खासगीकरणातून बांधण्यात आलेल्या विविध रस्त्यांवर सुरू असलेल्या अन्याय्य टोलवसुलीच्या विरोधात आता वाहनधारकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे या विषयाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुदत संपून गेल्यानंतरही टोलवसुली सुरू असल्याचे प्रकार यापुर्वी उघडकीस आले आहेत. त्यामुळे जनतेच्या आर्थिक लुटीचे नवे साधन बनलेल्या टोलबाबत सरकार फेरविचार करणार का हा खरा प्रश्न आहे.
[…]

डोक्यावरचा व्रण आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ

महाराष्ट्राचे अर्थकारण हे मुंबईशी निगडीत आहे; ६० वर्षापूर्वी या अर्थकारणाशी तात्कालीन मुंबई राज्याचा मोठा प्रदेश व देशाचे अर्थकारणही थेट संबंधित होते.
[…]

न्यायव्यवस्थेला नवा हादरा

गेल्या काही दिवसांपासून न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराची चर्चा मोठ्या प्रमाणात गाजते आहे. कधी न्यायमूर्तींनी आपली संपत्ती घोषित करण्यावरून तर कधी एखाद्या न्यायमूर्तींकडे बेहिशेबी संपत्ती असल्याचे आरोप होतात. या बातम्यांमुळे जनमत बिघडत असतानाच देशाचे माजी कायदेमंत्री अनेक न्यायाधिश भ्रष्ट असल्याची माहिती देऊन प्रतिज्ञापत्र दाखल करतात, तेव्हा एकूणच व्यवस्थेला हादरा बसल्याशिवाय राहत नाही.
[…]

वेध पाश्चात्य कृषी तंत्रज्ञानाचा

राज्यात उसाच्या लागवडक्षत्रात वरचेवर वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन कारखान्यांना गाळपाचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्याचबरोबर सरकारने लेव्ही रद्द करणे, साखरेच्या निर्यातीसाठी पावले उचलणे आदी प्रयत्नांवर भर द्यायला हवा. शेतकंर्‍यांनीही प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन उत्पादनखर्चात बचत करायला हवी. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील शेतकर्‍यांनी ब्राझीलमधील शेतीचे तंत्र समजून घ्यायला हवे. […]

बिहारमध्ये राजकारण्यांची सत्त्वपरीक्षा

बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली असून रणमैदान गाजायला लागले आहे. लालू यादव-रामविलास पासवान यांची आघाडी, नितीशकुमार-भाजपची युती आणि काँग्रेस या तीन मुख्य स्पर्धकांमुळे बिहारचे निवडणूक समर गाजणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार रूप पालटत आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि दीर्घकालीन परिणाम करणारी ठरणार आहे.
[…]

तरुण येतील पण घराणेशाहीचे काय ?

काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच महाराष्ट्रातील काही शहरांना भेटी देऊन तरुणांशी संवाद साधला. यावेळी तरुणांनी अधिक संख्येने राजकारणात यावे असे सांगण्यास ते विसरले नाहीत. वास्तविक अलीकडे प्रत्येक राजकीय पक्षात तरुणांची अधिक भरती होत आहे. पण घराणेशाहीमुळे या तरुणांना मोठी संधी प्राप्त होत नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी स्वत:च्या वक्तव्यावर आत्मपरिक्षण करायला हवे आहे. […]

यंग पॉलिटिशियन

काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी हे नुकतेच महाराष्ट्राच्या धावत्या दौर्‍यावर येवून गेलेत. […]

गुन्हेगार, दारूडे

काही वृत्तपत्रात ज्या बातम्या झळकल्या आहेत त्या धक्कादायक आहेत. तसेही आजकाल वृत्तवाहिन्यांची अमाप पीक आल्यापासून धक्कादायक बातम्यांमध्ये जाण राहीली नाही.
[…]

1 33 34 35 36 37