नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

प्रामाणिकपणा

  ही गोष्ट खूप जुनी. माझ्या लहानपणाची. खरे तर या चाळीस वर्षांत इतक्या काही घटना-घडामोडी झाल्यात की ती सहज विसरून जावी; पण नाही, ती घटना मी विसरू शकलेलो नाही. ती घटना मी विसरू शकणार नाही. आपण म्हणतो ना, की या घटनेनं माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली, तशीच ही घटना. अर्थात, जेव्हा हे सारं घडलं तेव्हा या घटनेचा […]

आणीबाणी

पुण्यातल्या तरुण भारत या दैनिकामध्ये त्यावेळी मी काम करीत होतो. नेमकेपणानं सांगायचं तर २६ जून १९७५ रोजी रात्रपाळीचा उपसंपादक म्हणून माझं काम सुरू होतं. त्याआदल्या दिवशी पहाटे चारपर्यंत ऑफिसमध्येच होतो. इंदिरा गांधींनी काही विरोधी नेत्यांची धरपकड केल्याचं छोटं वृत्त त्यादिवशीच्या अंकात प्रसिद्धही केलं होतं; पण खरी सुरुवात झाली ती २६ जून रोजी. देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर […]

फौजदार

  एकोणिसशे ऐंशीचा तो काळ. नुकताच कोल्हापूरमध्ये दाखल झालेलो होतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घटना-घडामोडी इतक्या होत्या, की बातम्या लिहिताना दमछाक व्हावी. त्यात निवडणुकीचे दौरे, प्रत्यक्ष मतदारांचा अंदाज घेण्यासाठी भेटीगाठी असं बरंच काही सुरू होतं. अचानक एके दिवशी मुख्य कार्यालयातून फोन आला. सांगली भागाचा दौरा करून या वसंतदादांच्या दौर्‍याचा वृत्तांत द्या. त्यावेळी माझी सारी मदार स्कूटरवर असायची. कोल्हापूर-सांगली […]

भेट

शरद जोशी, हे नाव महाराष्ट्राला तरी अपरिचित नाही. ही गोष्ट त्यांच्याच संदर्भातली आहे. घटना आहे १९८० ची.
[…]

गरीब आणि गरिबी

  एकदा एका थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता गरिबी. खरं तर ‘गरिबी’ या शब्दाशी ज्यांचा त्यांच्या अल्पशा हयातभर संबंध आला असल्याची शक्यता नव्हती. तरीही शिक्षकांना वाटत होते, की आपले विद्यार्थी ‘गरिबी’ या विषयावर उत्तम लेखन करू शकतील. स्पर्धा झाली. निबंध झाले. त्यांचे परीक्षण झाले आणि एका मुलाला […]

कोडी

माणसाच्या आयुष्यात सतत, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी कोडी येत असतात. त्यातली काही सोडविता

येतात तर काही नाही. वृत्तपत्रातल्या कोड्यांचं तसं नसावं. एक तर ती सहजी सुटतात. आपल्यालाही कोडी सोडविता येतात, हा

विश्वास बळावतो अन् मग तो पुन्हा नव्या कोड्याची प्रतीक्षा करीत राहतो. ही कोडी सोडविताना वास्तवातल्या कोड्यांचं काय, हा

प्रश्न मनात अजूनही कायम आहे. पाहा, तुम्हाला उत्तर सापडतंय का?
[…]

बातमीतली कोंबडी

कोंबड्या काय? मरतातच! खरंय. कोंबड्या तर रोजच मरतात. परवाच पुण्या-मुंबईत किती कोंबड्या ‘डिश’ हऊन येतात, याची

आकडेवारी प्रसिद्ध झालीय. एरवी ती होतही नाही; पण नवापूरच्या कोंबड्यांना वृत्तपत्राच्या रकान्यात जागा मिळाली… अर्थात

माणसासाठीच! बातमीच्या, वृत्तमूल्याच्या व्याख्येत कोंबड्या नेहमी बसत नाहीत, तर त्यासाठी काही निमित्त असावं लागतं.

मनात आलं, असे अनेक विषय, घटना, माणसंही असतीलच की जे मरतात कोंबड्यांसारखे; पण त्यांची बातमी होत नाही! […]

1 486 487 488 489
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..