नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्येदेवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ८-ब/११

‘आजच्या जगात भौतिक व्यवहारासाठी संस्कृतचा कांहींही उपयोग नाहीं’ ( इति शिरवळकर) – हा मुद्दा आपण आधीच हाताळला आहे. आंतरराष्ट्रीत कीर्तीचे ज्येष्ठ विद्वान (कै.) दिनेश माहुलकरांचा अनुभव व त्याचें कथन काय सांगतें, तें आपण पाहिलें आहे. अन्य उदाहरणेंही पाहिली आहेत. त्यामुळे, यावर अधिक लिहिण्याची जरूर नाहीं. *(ज्यांना प्रा. माहुलकरांची माहिती नसेल , त्यांनी सरोजिनी वैद्य या, महाराष्ट्र […]

महाराष्ट्रातील तिसरे शक्तिपीठ – श्री रेणुकामाता माहूरगड

महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, […]

बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणूनही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग ८-अ/११

विवेक शिरवळकर यांच्या प्रतिसादाबद्दल : शिरवळकर यांनी राजोपाध्ये यांच्या कांहीं मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. आपण त्यांची चर्चा आधी केलेलीच आहे. पुनरावृत्तीची आवश्यकता नाहीं. ‘संस्कृतमधील बरेंच ज्ञान काळाच्या उदरात लुप्त झालें’ (इति शिरवळकर) – लुप्त झालें, हें खरें आहे. पण, संस्कृत शिकण्यास बंधनें होती, म्हणून तिच्यातील ज्ञान लुप्त झाले, असें शिरवळकर म्हणतात, तें योग्य नाहीं. एक तर, […]

महाराष्ट्रातील दूसरे शक्तीपीठ – श्री महालक्ष्मी कोल्हापूर

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी दुसरे व पूर्ण शक्तीपीठ आहे. श्रीमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या जिल्ह्याचे ठिकाणी आहे .कोल्हापूरला प्राचीनकाळी गौरवाने दक्षिणकाशी म्हटले जाते असे. महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परीसरात पश्चिमाभिमुख आहे या मंदिराचे उल्लेख ईस च्या सुरवाती पासून मिळतात. या मंदिराच्या चारी दिशांना प्रवेश दरवाजे आहेत ईस ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा जयसिंग व […]

ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची

आपल्या भारतीय संस्कॄतीची ओळख खास करुन आपल्या मुलांना द्या.  पाश्चात्यिकरणाच्या या जमान्यात ही माहिती त्यांना होणे आवश्यक आहे दोन पक्ष कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष तीन ऋण  देव ऋण पितृ ऋण ऋषि ऋण चार युगे सतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग चार धाम  द्वारिका बद्रीनाथ जगन्नाथ पुरी रामेश्वरम धाम चार पीठे शारदा पीठ ( द्वारिका ) ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम ) […]

महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ – श्री तुळजाभवानी, तुळजापूर

भारतीय पातळीवर १०८ शक्तिपीठांपैकी प्रमुख मानल्या जाणाऱ्या शक्तीपिठात महाराष्ट्रातील तुळजापुर, कोल्हापुर, माहूर, यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात साडेतीन पीठे असल्याचे मानले जाते, हि साडेतीन शक्ती पिठाची संकल्पना ओंकाराचे साडेतीन मात्रांवर आधारित आहे, या साडेतीन शक्ती पीठांचा परिचय आपण पुढे पाहणार आहोत. महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ – श्री तुळजाभवानी तुळजापूर तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पासुन […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ७/११

किशोर मांदळे यांच्या प्रतिक्रियेबद्दल : ‘संस्कृतच काय कुठल्याही भाषेचा निषेध करणें हितावह नाहींच’, हें मांदळे यांचें म्हणणें योग्य आहे. मात्र, चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकोबा यांच्या काळीं मराठी ही जनभाषा बनलेली होती. त्यामुळे, संस्कृतच्या निषेधासाठी नव्हे, तर जनसामान्यांच्या भाषेत ज्ञान आणण्यासाठी या सर्वांनी प्रादेशिक भाषेत लिहिलें. इतरत्रही आपल्याला मध्य युगात हेंच दिसतें. कबीर, तुलसी, सूरदास, मीराबाई, […]

नवरात्र

आजपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव देवींच्या महापूजेचा असला तरी तो पृथ्वीतलावरच्या तमाम ‘स्त्री’ जातीच्या पूजेचा आहे..’स्त्री’च्या ‘प्रसव’क्षमतेची, ‘मातृत्वा’ची ही महापूजा आहे..आपण त्याची सांगड महालक्ष्मी, दुर्गा , काली आदी देवतांशी घातलीय इतकंच..!! नवरात्रात ‘घट’ बसवतात हे आपण पाहातो, ऐकतो आणि बोलतो देखील. मुंबईसारख्या शहरात गुजरातकडच्या अनेक स्त्रीया नवरात्रात हातात ‘घट’ घेऊन फिरताना दिसतात. या हे घट मातीचे असतात […]

1 52 53 54 55 56 71
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..