मी याचे नामकरण केले नाही व करू इच्छीत नाही. कारण तो अभिमानाला, वासनेला जागे करील. पुन्हा विचारचक्र सुरू होतील. मला एका सत्यमय वातावरणामधून संसारीक अर्थात मिथ्या जगांत नेईल. हे होणारच कारण मला माझ्या अल्प क्षमतेचे व अल्प अशा वर्तमान काळाची जाणीव आहे. ईश्वर जो जसा असेल, त्याला जाणण्यासाठी मानवी इंद्रिये परीपूर्ण नाहीत. त्यांच्या मर्यादा, झेप,क्षमता ह्या […]
आकाशातील हवा, नाकपुड्या जवळ येणे, शरीरात शिरणे येथपर्यंत अस्तित्वाची तुम्हालाच जाणीव होत होती. कारण ती विचारांनी घेरलेली होती. आता पुढचा प्रवास म्हणजे, वाहत जाणे हे निसर्गावर सोडा. आकाशातील पोकळीतील हवेबरोबर प्रथम तुम्ही जाणीवेने शरीरात शिरता परंतू आता ती जाणीव तुम्हास सोडावी लागेल. आता कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका. येथेच तुमची खरी परिक्षा असेल. प्रयत्न तुमचा. […]
आता मनला स्थीर करणे, शांत करणे हा ध्यान धारणेचा प्रमुख गाभा आहे. विचार रहित अवस्था साध्य करणे आहे. कोणतीही कल्पना द्रव्य, समाधान, हालचाली,भावनीक अविष्कार ह्या सर्व बुध्दीच्या विचार प्रणालीत निर्माण झालेल्या असतात. मेंदूचे प्रमुख कार्यच विचार उत्पन्न करणे हे आहे. वासना (वा इच्छा) (Desire) हा देहाचा नैसर्गीक गुणधर्म असतो. जो प्रत्येकाला जन्मता हा मिळालेला असतो. वासना […]
प्रथम बैठक स्थिर होण्याचा प्रयत्न यशस्वी करणे नंतर मनाला बाह्यांगातून अंतरंगात नेणे जरूरी असते. मनाला शरीराच्या आतील प्रत्येक इंद्रियाशी समरस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्याच मार्गाने मन एक एक अवयवाशी एकरूप होत सर्व देहाशी तादाला पावते. मानवी (वा कोणताही सजीव प्राणी) देह ही त्या निसर्गाची वा परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती आहे. कल्पनेने आणि आयोजनानी एकदम परिपूर्ण. त्याच्या […]
आज भारतीय संरक्षणक्षेत्रापुढे असणारी आव्हाने, शेजारील राष्ट्रांचा धोका, त्यांची युद्धसज्जता, संरक्षणक्षेत्रावर या देशांनी वाढवत नेलेला खर्च, त्यातुलनेने आपल्याकडे असणारी शस्रास्रांची उणीव, मागे पडत गेलेले आधुनिकीकरण, शस्रास्र आयातीवर होणारा प्रचंड खर्च, त्यामुळे वाढत जाणारी आर्थिक तूट ही सर्व पाश्र्वभूमी लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची गरज होती. मात्र प्रत्यक्षात संरक्षणक्षेत्राच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही. […]
बैठक – माझी ध्यान योग धारणा साधारण अशी होती. एक ठरलेली जागा असे. लहान, स्वच्छ आणि जेथे वर्दळ (अर्थात घरातील) कमी प्रमाणात असेल अशी मऊ आसन व त्यावर रोज धुतलेले धुत वस्त्र आंथरलेले असे. मागे पाठीला आधार म्हणून एक मऊ उशी घेत असे. २० मिनीटे ध्यान धारणा करण्याचा सराव करीत असे. ध्यान रोज दोन वेळा केले […]
शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता. भास्कर बहिर व त्याचा मित्र सुनील जाधव दोघेजण बागेतील एका बाकड्यावर बसले होते. मंद मंद वारे वाहत होते. भास्करला आळस आला होता. आळेपिळे देत शरिराला […]
विचार निर्मीती आणि त्याचा वेग ह्या दोन्हीवर लक्ष केंद्रीत केले. एकानंतर दुसरा विचार, लगेच तिसरा चौथा विचार अशी एक प्रंचड रांगच सतत चालते. विचारांचे उत्पन्न होणे, भविष्यकाळातून लगेच वर्तमानाची रेखा पार करीत भूतकाळांत जाणे ह्या विश्लेशनासाठी वा समजण्यासाठी भिन्न बाबी आहेत. त्यांच्या वेगापुढे त्यांना विभागणे तसे अवघडच. योग सामर्थ्य व विचारांच्या उत्पत्तीकडे लक्ष केंद्रीत करण्याची प्रथम […]
ईश्वर दर्शन जे सर्व प्रयत्नकरून भेटत नव्हते, दिसत नव्हते. त्याचे कारण आता लक्षात आले. असमाधानी, अशांत, लोभी, रागीट, अहंकारी, हेकेखोर, खोटे, दिशाहीन आणि अशाच दुर्गुनांनी घेरलेले, मन शांततेमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नाही. ही दुर्गुणाची झाकणे प्रथम दूर व्हावयास हवीत. तरच मन शुद्ध व पवित्र स्थितीमध्ये राहील हे सत्य आहे. सत्यच फक्त ईश्वराशी एकरूप होवू शकते. इश्वरी […]
थोड्याशाच काळानंतर मनाची संभ्रमी अवस्था एकदम नाहीशी झाली आणि माझ्या भक्तीची दिशा व नामस्मरण मी केवळ जय जगदंबेच्या चरणी अर्पण करण्यात यशस्वी होवू लागलो. त्या जगदंबेचे सततचे नामस्मरण व भक्तीपूर्वक आठवण हा देखील पूजा अर्चाचाच एक भाग असल्याची जाणीव होत होती. ते एक कर्मकांडच होते. जर देव दिसला, भेटला तर कदाचित श्री जगदंबेच्या स्वरूपात असेल ही […]