नवीन लेखन...

प्रसिद्ध अभिनेता रणधीर कपूर

रणधीर कपूर यांची एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता व करीश्मा व करीना कपूर यांचे वडील व राजकपुर यांचा मुलगा अशी ओळख आहे. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. रणधीर कपूर यांना चित्रपट क्षेत्र हे वारसाने मिळाले आहे. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. तर रणधीर कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दो उस्ताद’ चित्रपटात काम केलेल्या रणधीर कपूर यांनी १९६८ सालच्या ‘झुक गया आसमान’ चित्रपटा दरम्यान सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले होते. १९७१ च्या ‘कल आज और कल’ चित्रपटात अभिनय केलेल्या रणधीर कपूर यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात देखील पाऊल ठेवले. चित्रपटात कपूर कुटुंबातील पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर या तीन पिढ्यांनी अभिनय केला होता. याशिवाय बबीताने देखील महत्वाची भूमिका साकारली होती. सत्तर ऐंशीच्या दशकात त्यानी हिंदी चित्रपट जवानी दिवानी, हाथ कि सफाई, रामपूर का लक्ष्मण, ढोंगी, खलिफा, कच्चा चोर, कल आज और कल, पोंगा पंडित, कस्मे वादे, बिवी ओ बिवी, भंवर, हरजाई, हमराही, चाचा भातीजा,राम भरोसे,आज का महात्मा, लफंगे, खलिफा आखरी डाकू, पुकार असे चांगले व उत्तम चित्रपट दिले. किशोरकुमार व त्याचे चांगले जमत असे. किशोरकुमार यांनी गायलेली गुम है किसीके प्यारमे दिल सुबह शाम’, ‘जा ने जा धुंडता फिर रहा’ व ‘भवरे की गुंजन ए मेरा दिल’ ही गाणी अजून लोकांच्या तोंडावर आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..