नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

ज्येष्ठ मराठी नाट्यनिर्माते सुधीर भट

सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी १ जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम केला होता. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. […]

जेष्ठ गायिका माणिक वर्मा

क्षणभर उघड नयन देवा — तुझा नि माझा एक पणा — निघाले आज तिकडच्या घरी — झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या जेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. […]

मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट

सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी झाला. त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही. मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं होते. गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनी. गझलचे सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला. ‘लाभले आम्हास भाग्य’ […]

इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक

इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म १५ एप्रिल १८९३ रोजी झाला. इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. भोर संस्थानात त्यांचे आजोबा कारभारी होते. तर सरकारी नोकरीमुळे वडिलांचे वास्तव्य उत्तर भारतात होते. त्यामुळे […]

हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा

१९९४ मध्ये महेश भट्ट यांच्या ‘स्वाभिमान’ मालिकेतील ‘त्यागी’ या पहिल्याच भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधणारा अभिनेता आशुतोष राणा पुढे ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’सारख्या चित्रपटांतून दज्रेदार आणि प्रभावी खलनायकाच्या भूमिकेत दमदारपणे उभा राहिला. दुश्मन सिनेमातील दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. […]

वासुदेव गोविंद आपटे

मराठी लेखक, भाषांतरकार, पत्रकार, आनंद मासिकाचे संस्थापक व संपादक, बंगाली कथा-कादंबर्यांाचे अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म १२ एप्रिल १८७१ रोजी झाला. ते १८९६ साली कलकत्ता विद्यापीठाची बी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर नागपूरच्या ‘हिस्लॉप’ कॉलेजात एक वर्ष फेलो आणि नंतर पुण्यात काही काळ शिक्षक होते. पुणे येथे असताना त्यांना हरि नारायण आपटे यांच्या सहवासात मराठी […]

मराठी रंगभूमीवरील फार्सचा राजा बबन प्रभू

फार्स किंवा प्रहसन या प्रकाराला मराठी रंगभूमीवर रुजवलं आणि गाजवलं नाहीतर प्रतिष्ठा मिळवून दिली ती अभिनेता-नाटककार बबन प्रभू यांनी. त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, घोळात घोळ’ यासारखे अनेक फार्स लिहिले. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते. […]

नाट्यअभिनेते डॉ. दाजी भाटवडेकर

भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृत नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही. […]

दिग्गज कसोटीपटू, यशस्वी कर्णधार अजित वाडेकर

अजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपले करिअर निवडले व यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका अजित वाडेकर समरसून जगले. अजित वाडेकर हे शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीमुळे रसिकांचे आवडते फलंदाज होते. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कव्हर ड्राइव्ह, तो ऑन ड्राइव्ह हे सर्व लाजबाब. […]

1 216 217 218 219 220 423
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..