नवीन लेखन...
Avatar
About डॉ. आनंद बोबडे
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

ऑक्टोबर १० – पहिले झिम्मी शतक आणि हातोडा हेडन

१० ऑक्टोबर १९८७ रोजी भारतात हैदराबादच्या मैदानावर एक उच्चकोटीची एकदिवसीय खेळी झाली. झिंबाब्वेचा कर्णधार डेव हटनने विश्वचषकाची दणक्यात सुरुवात केली.
[…]

ऑक्टोबर ११ – जन्म-मृत्यू ११ ऑक्टोबर आणि ‘मंद’ कसोटी

११ ऑक्टोबर १९४३ रोजी खर्‍याखुर्‍या कॅलिप्सो खेळाडूचा जन्म झाला. (कॅलिप्सो हा आधी एकदा सांगितल्याप्रमाणे वेस्ट इंडीजमधील-विशेषतः त्रिनिदादमधील – तालबद्ध नृत्याचा एक प्रकार आहे.)
[…]

सप्टेंबर २९ – हुकमी कारकून आणि फिरक्या गिब्ज

२९ सप्टेंबर १९४१ रोजी “युद्धासाठी खास बोलविण्यात आलेल्या बँक कारकुनाचा” जन्म झाला आणि २९ सप्टेंबर १९४१ रोजी कसोट्यांमध्ये सर्वप्रथम ३०० बळी घेणार्‍या फिरकीपटूचा जन्म झाला.
[…]

ऑक्टोबर ०२ – पोंद्या वॉर्नर आणि बुधी कुंदरन

ग्रॅन्ड ओल्ड मॅन ऑफ इंग्लिश क्रिकेट किंवा ‘पोंद्या’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या सर पेलहॅम फ्रान्सिस वॉर्नरचा जन्म २ ऑक्टोबर १८७३ रोजी त्रिनिदादमध्ये झाला. २ ऑक्टोबर १९३९ रोजी कर्नाटकातील मंगलोरजवळील मल्कीत बुधिसागर कृष्णाप्पा कुंदरन यांचा जन्म झाला.
[…]

ऑक्टोबर ०३ – रे लिंड्वॉल – एक झंझावात

३ ऑक्टोबर १९२१ रोजी रेमंड रसेल लिंड्वॉलचा जन्म झाला. संक्षिप्तपणे रे लिंड्वॉल म्हणून ओळखला जाणारा रेमंड हा सार्वकालिक द्रुतगती गोलंदाजांच्या ताफ्यातील सर्वोत्तमांपैकी एक म्हणून सार्थपणे क्रिकेटिहासात आपली जागा कमावून आहे.
[…]

ऑक्टोबर ०४ – ‘रंगीत’ बेसिल आणि बूम बूम १००

पाव शतकभर न सुटलेला एक प्रश्न निर्माण करणार्‍या एका प्रतिभावान खेळाडूचा जन्म ४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. बेसिल लुईस डि ऑलिव्हेराचा जन्म या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये झाला.
[…]

सप्टेंबर २६ – विजय मांजरेकर आणि इअन ‘चॅपेली’

२६ सप्टेंबर १९३१ रोजी तेव्हाच्या बॉम्बेत विजय लक्ष्मण मांजरेकरांचा जन्म झाला. वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे जवळजवळ नसण्याच्या काळात त्यांनी वेगवान गोलंदाजी खेळण्याचे दंडक घालून देण्याजोगी फलंदाजी केली. २६ सप्टेंबर १९४३ रोजी इअन मायकल चॅपेलचा जन्म झाला. ‘चॅपेली’ या नावाने तो ‘लाडका’ आहे. अनेक लेखक-विश्लेषकांच्या मते इअन चॅपेल हा क्रिकेटच्या सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक आहे.
[…]

1 15 16 17 18 19 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..