शुक्रवारची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्र्याने फारच त्रासलेला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीने तिला शुक्रवारचं व्रत संगितलं. ती म्हणाली, “ बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास धरावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावेत, तिला हळद कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी. […]