नवीन लेखन...

अप्रतिम कविता

1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते….

गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट
सर्व काही होते….

वाढदिवसाच्या शुभेच्छा ही
त्यातून देता येतात
वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही
पाठवता येतात….

अभिनंदन, स्वागत,
सर्व काही करता येते
श्रद्धांजलि द्यायला
मौन ही धरता येते….

सर्व कसे अगदी
ऑनलाइन चालते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते….

फेसबूक, whatsapp
आणि काय काय राव
चॅटींग मधली मजा
तुम्हाला कुठे ठाव….??

विनोद, मस्ती,
असो कि जयंती, पुण्यतिथी
पोस्टचा वर्षाव होतो
साऱ्यांच्या माथी….

शाळेत नसेल शिकवित
एवढे ज्ञान मिळते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते….

तसे भेटून बोलणे
होत नाही आता फारसे
तुम्ही ऑनलाइन या ना
बोलू मग खुपसे….

गेलात जवळून तर
नमस्कार ही करु नका
ऑनलाइन मात्र
हाय हॅलो विसरू नका….

थोडीशी virtual दुनियाच
आता हवी-हवीशी वाटते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते….

ऑनलाइन जग झाले
याची नाही खंत
माणुसकी आटत चालली
हे मना सलतं….

भावनेचा ओलावा
कोरडा झाला फ़क्त
समुहात राहुनही
एकटं एकटं वाटतं….

नुसत्या शब्दांनी
ह्रदय कुठे हलते
1GB माणुसकी
आम्हाला महिनाभर पुरते….!!

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..