नवीन लेखन...

अपेक्षा

Apeksha

आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, “बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी.”

मुलगा म्हणाला, “आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन.”

आई स्मितहास्य करित म्हणाली, ” अरे वेडया हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन् हो, तू जेव्हा खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला.”

मुलगा म्हणाला,”बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर”

आई आता हसली म्हणाली, “सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच ईच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न कराव ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ दयावी, समजून घ्याव व सुखाने एकत्र नांदाव.”

मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला, “आता तूच सांग ना आई मला, “मी काय कराव तुझ्यासाठी?”

आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली, “ऐक, जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हिच अपेक्षा आहे माझी.

जेव्हा देवासमोर उभा राहशील तेव्हा माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर.
मी जेव्हा मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर.
तु केलेले प्रत्येक चांगले काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, आसपास असलेल्या लहानथोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.

लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट हे मी स्वेच्छेने स्विकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.

देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची त्याबद्दल त्याची मी सदैव रृणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.

तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.
करशील का हे?”

निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.

धन्य धन्य ती माता!!
निरपेक्ष व निस्सिम प्रेम फक्त माताच करु जाणे, त्रिवार वंदन प्रत्येक मातेला !!!


— संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी
शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..