नवीन लेखन...

रक्तदाब – कारणे व उपाय

रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे. दिवसेंदिवस हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. त्याचा महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे अति रक्तदाब (Hypertension). दिवसेंदिवस अति रक्तदाबाचे प्रमाणसुद्धा वाढते आहे. तो फक्त वयस्कर व्यक्तींचा आजार राहिला नसून त्यांची पाळेमुळे तरुण पिढीमध्ये सुद्धा रुजली आहेत.

जेव्हा हृदयाचे ठोके वाढतात तेव्हा ते संपूर्ण शरीरात रक्त पंप करते. तुमचे हृदय तुमच्या शरीरातून ज्या वेगाने रक्त पंप करते त्याला तुमचा रक्तदाब म्हणतात. रक्ताची हालचाल होत असताना, ते शिराच्या बाजूने ढकलले जाते. या ढकलण्याची गुणवत्ता म्हणजे तुमचा रक्तदाब. हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे आकुंचन पावणे (Systole) आणि प्रसरण पावणे (Diastole) या क्रिया होतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावर दाब अधिक असतो, त्या दाबाला सिस्टोलिक रक्तदाब (Systolic Blood Pressure) असे म्हणतात. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत (Relaxation Stage) येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला ‘डायास्टोलिक रक्तदाब (Diastolic Blood Pressure) असे म्हणतात.

जर तुमचा रक्तदाब खूप जास्त असेल तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दबाव टाकते आणि यामुळे स्ट्रोक होऊ शकतात. हा रक्तदाब दोन प्रकारचा असतो. उच्चदाब व कमी रक्तदाब. (High and Low BP).

I) उच्च रक्तदाब: (Hypertension)
दोन्ही प्रकारचे रक्तदाब ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते. नुकतेच हे पॅरामीटर अमेरिकेच्या मेडिकल असोसिएशनने बदलले आहेत. वयाच्या ५० वर्षांपर्यंत च्या व्यक्तींचे सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० (मी. मी./ पारा mm of Hg) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४० च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब (Hypertension जास्त असेल तर अशा व्यक्तींना आहे रक्तदाब असे समजावे. परंतु ज्या व्यक्ती साठ पेक्षा ज्यास्त वयाचे आहेत त्याचा रक्तदाब हा १४०/९० (सिस्टोलिक /डायस्टोलिक) असले तरी ते नॉर्मल आहे असे समजले जाते. हायपरटेन्शन, हा उच्च रक्तदाब (HTN) म्हणून ओळखले जाते, याचा अर्थ पुरवठा धमन्यांमधील दाब असावा त्यापेक्षा जास्त आहे. हायपर टेन्शन चे दुसरे नाव उच्च रक्तदाब आहे. उच्च रक्तदाब म्हणजे 130/80 किंवा त्याहून अधिक दाब जो काही काळानंतर जास्त राहतो. हायपरटेन्शनची सहसा कोणतीही चिन्हे किंवा साइड इफेक्ट्स नसतात. म्हणूनच ते धोकादायक आहे. त्याला सायलेंट किलर म्हणतात. कारण आपल्याला उच्च रक्तदाब आहे हे त्या व्यक्तीला समजत नाही. ते समजे पर्यंत बरेच नुकसान झालेले असते. त्याकरता वयाच्या पन्नाशी नंतर दर सहा महिन्यांनी किंवा वर्षांने रक्त दाब तपासून घ्यावा. परंतु जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे नियमित तपासणी करत असाल तर तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही.

आपल्या सर्वांना माहित आहे की, सामान्य रक्तदाब, कमी रक्तदाब आणि उच्च रक्तदाब असे वेगवेगळे रक्तदाब आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाची भिन्न मूल्ये आहेत, त्यानुसार त्यांना उपचार आणि नाव दिले जाते.

रक्तदाबाचे वर्गीकरण

जे.एन.सी.७ (Seventh Report of the Joint National Committee on Prevention, Detection,. Evaluation, and Treatment of High Blood.Pressure) नुसार रक्तदाबप्रमाणाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाते.

प्रकार प्रकुंचनीय रक्तदाब मिमी पारा अनुशिथिलनीय रक्तदाब मिमी पारा
साधारण रक्तदाब ९०-११९ मिमी ६०-७९
पूर्व उच्च रक्तदाब १२९-१३९ ८०-८९
उच्च रक्तदाब अवस्था१ १४०-१५९ ९०-९९
उच्च रक्तदाब अवस्था२ १६० १००

 

कारणे :

उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण अज्ञात आहे. परंतु धुम्रपान, अल्कोहोलचे सेवन, सोडियमचे जास्त सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव इत्यादी सारख्या अनेक घटकांवर प्रभाव पडतो. येथे आपण उच्च रक्तदाबाची अनेक कारणे नमूद करता येतील.

धूम्रपान : धुम्रपानामुळे रक्तदाब वाढतो, परंतु रक्तदाब तत्काळ वाढणे तात्पुरते असते. परंतु तंबाखूमध्ये अशी रसायने असतात ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतींना इजा होऊ शकते आणि रक्तवाहिन्या अरुंद होऊन हृदयविकार आणि रक्तदाब वाढू शकतो.

जादा वजन असणे, शारीरिक क्रियाकलाप अभाव
आहारामध्ये मिठाचे ज्यास्त सेवन
मद्यपान, मानसिक ताण (Stress) किंवा आघात
उच्च रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास, आनुवंशिक कारणे
तीव्र मूत्रपिंडाचा रोग, एड्रेनल आणि थायरॉईड विकार
अपुरी झोप, श्वसनक्रिया बंद होणे

उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम:

वाढलेला रक्तदाब हा मेंदूमधील वाहिन्या फुटण्याचे कारण असू शकतो. मेंदूमधील वाहिनी फुटल्यास मेंदूत रक्तस्राव होतो. हे रक्त काही काळाने गोठते. रक्ताची ही गुठळी मेंदूवर दाब निर्माण करते. मेंदूचा जो भाग दाबला जातो, तो भाग शरीरातील ज्या भागाचे नियंत्रण करीत असतो तो शरीराचा अवयव लुळा पडतो आणि यालाच अर्धांगवायू (लकवा) असे म्हणतात. थोडक्यात वाढलेला रक्तदाब लकवा निर्माण करू शकतो. लकवा होण्यामागचे कारण बहुदा अनियंत्रित रक्तदाब हेच असते.

निदान:

स्टेथोस्कोप, कफ, डायल, पंप आणि व्हॉल्व्ह असलेले स्फिग्मोमॅनोमीटर म्हणून ओळखले जाणारे उपकरण वापरून, रक्तदाब वारंवार मोजला जातो. रक्तदाब दोन संख्यांमध्ये नोंदविला जातो. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दाब.

जेव्हा हृदय संपूर्ण शरीरात रक्त पाठवते तेव्हा हृदयाचा ठोका असताना सिस्टोलिक रक्तदाब हा जास्तीत जास्त दाब असतो.
डायस्टोलिक रक्तदाब, जेव्हा हृदय रक्ताने भरलेले असते, तेव्हा हृदयाच्या ठोक्यांमधील सर्वात कमी दाब असतो.

डिजिटल रक्तदाब मापक:

सध्या डिजिटल रक्तदाब मापक मिळतात. त्यामुळे पेशंटला प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जावे लागत नाही. हे बॅटरी वर काम करते व ९५% बिनचूकपणा देते.
परंतु ते कंपनीच्या सूचनांचे पालन करून वापरावे लागते. नाहीतर चुकीचा रक्तदाब नोंदवला जाण्याची शक्यता असते. दिवसातून दोनदा रक्तदाब मोजणे पुरेसे असते. अगदी सकाळी रक्तदाब मोजू नये कारण त्यावेळी रक्तदाब ज्यास्तच असतो. सकाळी १० च्या सुमारास रक्तदाबाच्या गोळ्या न घेता व कांही नाश्ता न करता रक्तदाब मोजा. पहिल्या रक्तदाबाची नोंद घेऊ नका. दुसऱ्या व तिसऱ्या रक्तदाबाची नोंद घेऊन त्याची सरासरी काढा. हा तुमचा जवळ जवळ बरोबर रक्तदाब असेल. संध्याकाळी सहा वाजता परत त्याच पद्धतीने रक्तदाब नोंद करा.

यामुळे तुम्हाला आपल्या रक्तदाबात किती चढ उतार आहे याचा अंदाज येतो.

पेशंटला रक्तदाब आहे किंवा कसे हे तपासण्या करता त्याचा रक्तदाब हा सलग पाच दिवस विशिष्ट वेळी तपासून त्याची नोंद ठेवतात. त्याची सरासरी काढून त्यास रक्त दाब आहे की नाही हे ठरवतात. रक्त दाब बॉर्डर वर असेल तर त्यास त्याची जीवन पद्धती सुधारण्याची शिफारस करतात. त्यात आहार, व्यायाम योग्य ठेवण्यास सांगितले जाते. जवळ जवळ वर्षभर दरमहा रक्तदाब तपासल्यावर सुद्धा तो नॉर्मल येत नसेल तरच औषधें सुरु करतात.

रक्त तपासणी:

गंभीर किंवा उपचार करण्यायोग्य आरोग्य स्थितीमुळे तुम्हाला दुय्यम उच्च रक्तदाब आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी रक्त चाचण्यांची आवश्यकता असू शकते. उच्चरक्तदाबाचे निदान करण्यात मदत करण्यासाठी दिलेल्या रक्त चाचण्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

• इलेक्ट्रोलाइट पातळी
• रक्तातील ग्लुकोज
• थायरॉइड कार्य चाचण्या
• मूत्रपिंडाचे कार्य चाचण्या: रक्त युरिया नायट्रोजन (BUN) आणि क्रिएटिनिन पातळी,   मूत्र चाचण्या, इमेजिंग टेस्ट

प्रतिबंध:

निरोगी अन्न खा

तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी, तुम्ही जेवढे सोडियम (मीठ) खाता ते मर्यादित केले पाहिजे आणि तुमच्या आहारातील पोटॅशियमचे प्रमाण वाढवावे.

  • नियमित व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा
  • मद्यपान टाळा, धुम्रपान निषिद्ध
  • कॅफिन कमी करा, सकारात्मक विचारसरणी ठेवा.
  • नातेवाईक व मित्रांशी संबंधात रहा. सोशल मीडिया वर सक्रिय राहा.
  • एखादा आवडीचा छंद जोपासा, आणि हो ! दिवसातून एकदा तरी हसा.

योगा करण्याचा उपयोग

‘योगा’ या जीवनशैलीचा फायदा रक्तदाबाच्या रुग्णांना होतो. त्यातील प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टींमुळे अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते. यांना ‘मेडिटेशन’ असे म्हणतात.

रक्तदाबावरील उपचार:

ह्यामध्ये दोन भाग पडतात. –

१. जीवन पद्धतीत बदल (औषध न घेता)
२. तरी सुद्धा रक्तदाब कमी होत नसेल तर औषध घेऊन.

जीवन पद्धतीत बदल:

१. आठवड्यातून किमान २-३ वेळा पादाभ्यंग किटच्या मदतीने पादाभ्यंग करता येतो. योगासने, चालणे, नियमित पोहणे, योगासने, प्राणायाम, व्यायाम याचा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग होतो. मिठाचे आहारातील प्रमाण कमी करण्यानेही दाब नियंत्रणात राहतो. वेगवेगळे श्वसनाचे व्यायाम करूनही हे साध्य करता येते. नियमपूर्वक रोज ३० मिनिटे चालणे, सूर्यनमस्कार, अनुलोम- विलोम, शवासन, योगनिद्रा करणे हे सुद्धा उत्तम होय. योग्य वेळी व पुरेशी झोप, रात्री अकराच्या आत झोपणे, किमान ६-७ तासांसाठी झोपणे हे सुद्धा आवश्यक.

२. जंक फूड खाणे बंद करून हिरव्या भाज्या, ताजी फळे व पूर्ण धान्य (whole grains) याचा वापर करा.

३. मद्यपान टाळा.

४. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या वेळी घ्या. मनाने औषध बदलणे, बीपी नियंत्रित ठेवणारी औषधे घेण्यास टाळाटाळ करणे चूकीचे ठरते.

औषध योजना :

१. ऍलोपॅथिक:

ऍलोपॅथिक मध्ये चार प्रकारची औषधे आहेत.

i. एंजियोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम, (ACE) इनहिबिटर – रक्तवाहिन्यांमधील दाब कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध.
ii. लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ (मूत्रल) – एक औषध जे शरीरातील अतिरिक्त द्रव लघवीद्वारे काढून टाकते.
iii. बीटा ब्लॉकर – हृदय गती कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांमधील दाब कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध.
iv. कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर – रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या स्नायूंना आराम देण्यासाठी वापरले जाणारे औषध.

ही औषधे तज्ज्ञ (specialist) डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. तज्ज्ञ डॉक्टरांची औषध उपाय योजना ही त्यांच्या अनुभवावर, रुग्णाच्या पारिस्थितीवर व अवलोकनावर अवलंबून असते. तीन स्तरावरील कोठली एक उपाय योजना करावयाची किंवा दोन स्तरावरील उपाय योजना करावयाची हे ते ठरवतात. औषधांचा डोस, वारंवारिता यांचा विचार करावा लागतो. सहसा कमीतकमी डोसापासून औषध योजना सुरु होते. ह्यात औषधाच्या साईड इफ्फेक्टचा ही विचार करावा लागतो.

रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला व औषध योजना तंतोतंत पाळावी. त्याच्या सल्ल्या शिवाय डोस व वारंवारिता बदलू नये.

२. आयुर्वेदिक:

आयुर्वेदात रक्तदाबावर बरेच व सिद्ध केलेले उपचार आहेत. पण ते तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शनाखाली करावेत.

१. काली मिरी (चार ते पाच) पावडर रात्री एक ग्लास पाण्यात भिजवून सकाळी गाळून अनाशे पोटी घेणे.
२. अर्धा चमचा आवळा पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून घेणे.
३. रोज लसणाच्या दोन कच्च्या पाकळया दह्यात भिजवून खाणे.
४. खसखस आणि टरबुजाच्या बियांचा गर वेग-वेगळा वाटून समप्रमाणात मिसळून ठेवून सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी खाल्याने वाढलेला रक्तदाब कमी होतो व रात्री झोपसुद्धा चांगली लागते.
५. एक चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण आठवडाभर सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास
उच्च रक्तदाब कमी होतो.
५. मनुकांसोबत लसणाची पाकळी खाल्याने आराम येतो.

II) कमी रक्तदाब: (Hypotension)

हा एक आजार आहे जो स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. मज्जासंस्था कमकुवत होणे, प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, हिमोग्लोबिनची कमतरता यामुळे रक्तदाब कमी होण्याची समस्या उद्भवते. ज्यांचे मन कमकुवत आहे त्यांनाही कमी रक्तदाबाची समस्या असते. तुमचे बीपी कमी झाले तर चक्कर येते. आज आपण जाणून घेऊया घरच्या घरी आपण कमी रक्तदाबावर कसे उपचार करू शकतो.

कमी :रक्तदाबाची कारणे

१ .गर्भधारणा, आई आणि वाढणारा गर्भ या दोघांकडून रक्ताची मागणी वाढल्यामुळे
२ जखमांमुळे मोठ्या प्रमाणात रक्त कमी होणे
३ हृदयविकाराचा झटका किंवा सदोष हृदयाच्या झडपांमुळे रक्ताभिसरण बिघडते.
४ अशक्तपणा आणि मानसिक धक्का, कधीकधी निर्जलीकरण
५ रक्तप्रवाह संक्रमण
६ औषधे देखील रक्तदाब कमी करू शकतात. बीटा-ब्लॉकर्स आणि नायट्रोग्लिसरीन, जे हृदयरोगावर उपचार करण्यासाठी वापरले जातात,     हे सामान्य गुन्हेगार आहेत. लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट्स आणि इरेक्टाइल डिसफंक्शन औषधाने       देखील हायपोटेन्शन होऊ शकते.

ज्या लोकांचा रक्तदाब कमी आहे त्यांनी पाण्यात साखर आणि थोडे मीठ घालून प्यावे, रक्तदाब सामान्य होईल.

उपचार:

• कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी योग करावा. यामध्ये सूर्यनमस्कार, कपालभाती आणि अनुलोम विलोम यासारखे व्यायाम करा. असे         केल्याने तुम्हाला कमी रक्तदाबापासून मुक्ती मिळेल.
• मज्जासंस्था ठीक करण्यासाठी दररोज दोन मिनिटे टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्याने ॲक्यू प्रेशर पॉइंट्स दाबले जातात, यामुळे     रक्तदाब सामान्य होतो. एक ते दोन मिनिटे टाळ्या वाजवल्याने मज्जासंस्था सुरळीत राहते.
• कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांनी रक्तदाब सामान्य करण्यासाठी अश्वगंधाचे सेवन करावे. ज्यांना साखरेची समस्या आहे त्यांनी अश्वगंधाचे सेवन करू नये. अश्वगंधा चवीला गोड असते ज्यामुळे साखर वाढते.
• ज्यांना रक्तदाब कमी आहे, त्यांनी आहारात खजूर, केळी, मनुका, गाजर, सफरचंद, पालक, बथुआ आणि अंजीर यांचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब सामान्य राहील.

महत्वाचे म्हणजे ‘HURRY, WORRY, CURRY’ या गोष्टी रक्तदाबाच्या आजाराला निमंत्रण देतात. या टाळण्याचा प्रयत्न करावा. या सर्व गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष दिल्यास आपण सर्व दीर्घायुषी होऊ यात शंकाच नाही.

रक्तदाबावरील या सर्व सामान्य माहितीचा वाचकांना उपयोग होईल हे निश्चित.

संदर्भ:

१. मराठी विकिपीडिया
२. दैनिक लोकसत्ता मधील लेख.
३. गूगल वरील बरेच लेख.
४. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने.

डॉ. दिलीप कुलकर्णी.
२४/०८/२०२३

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 62 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

7 Comments on रक्तदाब – कारणे व उपाय

  1. अतिशय उपयुक्त व वैद्यकीय सिध्दांतांना धरून दिलेली माहिती दिल्याबद्दल डॉ.कुलकर्णी ह्या चे आभार. तज्ञांच्या सल्ल्याने आहार, जिवन शैलीत, बदल केल्यास कमी औषधे घेऊन रक्तदाब नियंत्रित करता येऊ शकतो, असे दिसून येते.

  2. खूप छान स्पष्टीकरण सर्व मुद्द्यांचे.
    धन्यवाद.

  3. अतिशय सुंदर व समजेल अशा भाषेत
    उपयुक्त अशी माहिती सांगितली आहे.

    धन्यवाद.

    वि.ग.चिटणीस

  4. रक्तदाबावर अत्यंत उपयोगी अशी माहिती डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांनी सविस्तर लिहिलेली आहे.अर्थात ती सर्वांनाच उपयोगी नक्कीच होईल.
    डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांना मनःपूर्वक धन्यवाद!

  5. संग्राह्य असावा असा महत्त्वपूर्ण लेख.वाचून समजून घेतला तर आरोग्य चांगले ठेवता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..