नवीन लेखन...

कवी-लेखक-बालसाहित्यिक – अरुण वि. देशपांडे

परिचय लेखक – आदित्य अ. जाधव, उमरगा

आज आपणा सर्वांस  ज्यांनी इतरांसोबत मला ही मार्गदर्शन केलं, ज्यांनी मला लिहायला शिकवलं. साहित्य प्रकारची अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख करून देऊन, मला समृद्ध केलं. लेखनशैली उत्तम होण्यासाठी वेळात वेळ काढून कायम तत्परता दर्शवली. असे जेष्ठ साहित्यिक श्री. अरुण वि.देशपांडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या दीर्घ लेखन-प्रवासाबद्दलचा हा परिचय लेख.


मूळ परभणीचे असलेले देशपांडेकाका सेवानिवृत्तीनंतर  २००६ पासून आता पुणेकर झाले आहेत, बावधन -पुणे येथे ते वास्तव्यास आहेत.
त्यांचा लेखक परिचय करुन देताना सांगावं वाटतं कि, त्यांचा साहित्यप्रवास हा १९८३-१९८४ पासून सुरु झाला.
आणि आजही तितक्याच उत्स्फूर्ततेने, त्यांचे लेखन सातत्याने चालू आहे. तब्बल 37 वर्षापासून चालू असलेले लेखन. असे हे एक प्रेरणादायी लेखक, कवी व्यक्तिमत्व. नवोदितांना कायम मार्गदर्शन करणारे.
नवोदित लेखक वा कवी यांच्या साहित्याला एक मूर्त स्वरूप देऊन, त्यांचं काही साहित्य पुस्तक स्वरूपात आणून ती जनमाणसांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तमरित्या बजावली आहे. आणि ते बजावत राहतील यात शंकाच नाही.
आजपावेतो साहित्य सेवा करत असताना त्यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र, अनुवाद अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारात लिखाण करून, एकूण चौपन्न  पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे हे साहित्य प्रिंटपुस्तकं स्वरूपात आणि  ई- बुक स्वरूपात उपलब्ध आहेत.
त्यांनी बालसाहित्यामध्ये ‘समीक्षा लेखन’ देखील केलं आहे. त्यांच्या या लेखनाविषयी थोडे सविस्तर सांगतो जे महत्वाचे वाटावे असेच आहे.
त्यांच्या समीक्षा ग्रंथाचे -शिर्षक आहे-
” बालसाहित्य मराठवाड्याचे : नवे स्वरूप-नव्या वाटा”.
या ग्रंथास महाराष्ट्र राज्य शासनाचा २००८-२००९ चा ‘दि.के.बेडेकर स्मृती-बाल साहित्य समीक्षा ‘ पुरस्कार देखील प्राप्त आहे जो केवळ बालसाहित्य समीक्षासाठीच दिला जातो.
१३७ पुस्तकांचा परिचय या संदर्भ ग्रंथात केला आहे. ज्यामध्ये २८ कादंबऱ्या, ३५ बालकथासंग्रह, ४८ बालगीतसंग्रह, १७ बालनाट्य-एकांकिका आणि ९ विज्ञान व ललितविषयक लेखन अशा वेगवेगळ्या तब्बल १३७ पुस्तकांचा परिचय करुन दिला आहे.
बालसाहित्य अभयसकांसाठी एक उत्तम मार्गदर्शक व संदर्भ ग्रंथ म्हणून याची उपयुक्तता ठरली आहे यात शंकाच नाही.
अरुण वि.देशपांडे यांचे कथा, कविता, कादंबरी,विनोदी लेखन, ललित लेखन व अध्यात्मिक लेखन आणि बालकथा, बालकवितां, ललित, बालकादंबरी असे सर्व प्रकारचे लेखन प्रिंट मीडियातून तर होतच असते, त्यांच्याबद्दल विशेष कौतुकाने सांगेन की-
२०११ पासून त्यांनी इंटरनेटवर लेखन करण्यास सुरुवात केली, आणि त्यांच्या लेखनाची हे दुसरे पर्व अधिक जोमाने सुरू आहे. ई-पेपर, ई-मासिके, ई-दिवाळी अंकातून त्यांचे साहित्य सतत प्रकाशित होत असते. फेसबुकवरील नामवंत साहित्यिक समूहात त्यांचा लक्षणीय सहभाग असतो.
ई-साहित्य साठी सध्या आघाडीवर असलेल्या प्रतिलिपी मराठी, स्टोरी मिरर, मातृभारती मराठी, मराठीसृष्टी डॉट कॉम, इन्स्टाग्राम, yourquote .in या वेबसाईटवर ते निमंत्रित साहित्यिक म्हणून लेखन करीत आहेत.
स्वतःचे लेखन तर ते करतात .त्यात काही विशेष नाही, विशेष हे आहे की- ते सोबतच्या साहित्यिक मित्रांच्या साहित्या बद्दल मोठ्या आस्थेने लिहीत असतात, पुस्तक परिचय-समीक्षण “हा त्यांच्या आवडीचा लेखन प्रकार आहे,  त्यासाठी अक्षरमित्र” हा त्यांचा पुस्तक-परिचय करून देणारा ब्लॉग आहे.
फेसबुक वरील अनेक कवी-,कवयित्री, लेखक यांच्या साहित्यकृतींना देशपांडे काकांनी लिहिलेली प्रस्तावना लाभलेली आहे,
मित्रांनो-  माझ्या आरंभ’ या पहिल्या कवितासंग्रहाची प्रस्तावना” , अरुण देशपांडे काकांनीच लिहिली आहे.
त्यांच्या सर्वच साहित्यकृतींचे उल्लेख करता येणे शक्य नाही, पण अलीकडच्या वर्षात त्यांचे विपुल असे ई-बुक्स प्रकाशित झालेत त्याबद्दल सांगतो-

मोठ्यासाठी-

१. प्रिंट बुक्स –  १७

२. ई-बुक्स –       ९

बुक्स –            २६
—————————–

बाल मित्रांसाठी –

१.प्रिंट -बुक्स = २१ ,
२.  ई-बुक्स =     ७

बुक्स-              २८
———————————————–
एकूण बुक्स -प्रिंट बुक्स – ३८
ई-बुक्स-    १६
——————————————–
एकूण पुस्तके –               ५४
———————————————-
यातील  – ई बुक स्वरूपातले साहित्य
एक माहिती-
एकूण ई-बुक्स -१६
———————————-
मोठ्यांसाठीची ई बुक्स- ११
बालमित्रांसाठी ई बुक्स – ०९
—————————————
– ई- कथा संग्रह – २.
———————————————-
१. शो पीस , २. झुळूक
——————————————————————————-
प्रकाशित झालेले
. ई-बुक- कविता -संग्रह – ९
————————————————–
१.मनभावन- ई- कविता संग्रह,  २०१४
२.स्नेहबंध – ई- चारोळी संग्रह-   २०१५,
३.सहेलीच्या कविता – ई- संग्रह-  २०१६,
४.मानस पूजा – ई- भक्ती कविता  २०१६
५.माझ्या कविता ई-कवितासंग्रह  २०१८
६. हळवी फुंकर
७. ए सुंदर अस्मानी परी (२०१९)
८. नवदुर्गा दर्शन-नवरात्र कविता- २०१९
९.घनमेघ – कविता संग्रह -२०१९
————————————————-
…२….
प्रकाशित बाल-साहित्य- ई- बुक्स – ७.
————————————————
ई-बाल कथा संग्रह – २.
——————————
१. समजुतीच्या गोष्टी ,
२. निधीची गोष्ट
————————————————–
प्रकाशित-
ई-बाल-कविता संग्रह – ५
————————————
१.पियुचे स्वप्न – ई- कविता संग्रह- २०१३,
२..टिनु- मिनुच्या कविता- ई-कविता संग्रह- २०१४
३. गोड गोड चिकोबा  -ई-बाल कविता – २०१६
४. गाेड गाेड गाणी – कविता ई- कविता संग्रह-२०१६
५.. पिकनिक – ई- बाल कविता – २०१८
————————————————–

असे हे अरुणकाका देशपांडे – त्यांच्या लेखनास शुभेच्छा देतो.

मित्रांनो तुम्ही त्यांना जरूर बोला

 त्यासाठी संपर्क-

अरुण वि.देशपांडे- पुणे.
संपर्क- मो- ९८५०१७७३४२
emel – arunvdeshpande@gmail.com

परिचय-लेखक-

@आदित्य अ. जाधव,उमरगा;
०९४०४४००००४;
(शब्दसृष्टी समीक्षा व रसग्रहण)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..