नवीन लेखन...

सज्जनांची तटस्थता



आज संपूर्ण जग हे समस्यांचे माहेरघर झालेले आहे. एकजात सर्वांनी होकारार्थी माना डोलवाव्यात असेच हे वाक्य आहे आणि

सर्वांच्या माना डोलतातसुध्दा. परंतु केवळ माना डोलावण्याने काय साध्य होणार? समस्या उद्भवणे आणि त्यांचे निराकरण हे

जगाचे रहाटगाडगे चालू राहण्याचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे समस्यांच्या निराकरणाचा प्रयत्न व्हायला पाहिजे. असा प्रयत्न

आज होताना दिसत नाही किंवा होतही असतील तर त्याचे प्रमाण आणि परिणाम अत्यल्प असतात. आज संपूर्ण जग समस्यांचे

माहेरघर झाले आहे, असे म्हणावे लागते ते त्याचमुळे. समस्या उद्भवण्याचे प्रमाण आणि त्यांच्या निराकरणाचा प्रयत्न यातील दरी

दिवसेंदिवस रूंद होत आहे. यामागे प्रमुख कारण जर कोणते असेल तर ते म्हणजे समस्यांच्या मुळापर्यंत न जाता येणे. मूळं

कायम राहत असेल तर फांद्या छाटण्यात फारसा अर्थ नाही, उलट अशा फांद्या छाटण्याने मूळं अधिकच भक्कम होतात. शारीरिक

व्याधीसंदर्भात बोलताना डॉक्टर मंडळी नेहमीच सांगत असतात की, 90 टक्के आजार मानसिक कारणाने उद्भवतात. डॉक्टरांचे हे

प्रतिपादन थोड्या वेगळ्या अर्थाने अनेक सामाजिक आणि इतर समस्यांच्या संदर्भात देखील चपखल लागू पडते. आज जगात

किंवा समाजात आढळून येणार्‍या बहुतेक समस्या या व्यक्तींच्या मानसिक विकृतीमुळे किंवा मानसिक विकृतीच्या व्यक्तींमुळे

निर्माण झालेल्या आहेत. सरधोपट भाषेत अशा व्यक्तींना दुर्जन संबोधले जाते. खरेतर कोणतीच व्यक्ती दुर्जन नसते किंवा

कोणतीच सज्जन नसते. सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीतच असतात. फक्त फरक पडतो तो या प्रवृत्तीच्या प्रमाणामुळे.

सुष्टतेचे प्रमाण अधिक असलेली व्यक्ती सज्जन ठरते तर दुष्टतेचे प्रमाण अधिक झाल्यास

सज्जन होण्याची क्षमता असलेली

व्यक्तीदेखील दुर्जन ठरते. हा भेद व्यक्तिगत पातळीवर

असतो तसाच तो सामाजिक पातळीवरसुध्दा दिसून येतो. शेवटी समाज

म्हणजे सुष्ट – दुष्ट व्यक्तींचे कडबोळेच असते. या समाजातील दुष्ट प्रवृत्तीचे प्राबल्य वाढले की समस्यांचे प्रमाण वाढते. समाज

व्यवस्था अस्तित्वात आली तेव्हापासून हे असेच चालू आहे आणि हा अपघात म्हणा अथवा दुर्दैव, समाजात नेहमीच दुष्ट प्रवृत्तीचे

प्राबल्य राहत आले आहे. दुष्ट प्रवृत्तींचे समाजात प्राबल्य वाढण्याचे कारण म्हणजे अशा प्रवृत्तींच्या वाढीला प्रतिबंध घालणारी

सत्प्रवृत्ती संघटित नाही. प्रत्येक सज्जन हा पृथ्वीतलावर आपणच एकमात्र सज्जन आहोत, या आविर्भावात वावरत असतो.

आपण एका अतिशय खडतर मार्गाने जात असून या मार्गाने इतर कुणी येऊच शकत नाही, अशी त्याची भावना असते. त्यामुळे

या मार्गावरचे प्रवासी नेहमीच एकटे आणि एकलकोंडे असतात. गुंडांची टोळी सहज जमून येऊ शकते, परंतु सज्जनांचा समूह होणे

शक्य नाही. खरेतर सज्जन लोकांतील हा दुर्गुणच म्हणावा लागेल. प्रत्येकाचे डोके वेगळे, विचार वेगळा, मार्ग वेगळा आणि

उद्देशही वेगळा. याच्या अगदी उलट दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचे असते. ते संघटित असतात. त्यांचा उद्देश आणि मानसिकता एकच

असते, येनकेनप्रकारे संपत्ती, पैसा गोळा करणे. सत्प्रवृत्तीचे लोक विखुरलेले असतात, तसे यांचे नसते. ‘चोर-चोर मौसेरे भाई’ या

उक्तीला ते नेहमीच जागत असतात. माणसं व्यवस्थित जोडली जातात, भक्कम साखळी उभारली जाते. एक – एक काडी

स्वतंत्रपणे सहज मोडता येते. (सज्जनांच्या बाबतीत तेच झाले आहे) परंतु या काड्या एकत्र आल्या तर त्यांची मजबुती अगदी

भक्कम होते. सज्जनांना न उमगलेले हे सूत्र या दुष्टप्रवृत्तीच्या लोकांना मात्र चांगल्या प्रकारे समजले आहे. माया गोळा करणे, या

एकमेव उद्देशाने कार्यरत असल्यामुळे सगळ्यांच्या प्रयत्नात एकसूत्रता येते. कधी काळी या लोकांची उद्दिष्टे वेगळी असतात, परंतु

संघटितपणा आणि आपल्या उद्देशाशी प्रामाणिक राहणे, हे गुण मात्र सामायिक असतात. सज्जन असो वा दुर्जन आपले ईप्सित

साध्य करण्यासाठी संघटित आणि प्रामाणिक प्रयत्न आवश्यक असतात. या अपरिवर्तनीय नियमाचे दुर्जनांकडून काटेकोर पालन

होते आणि म्हणूनच त्यांची विघातक क्षमता वाढते. (प्रत्यक्ष पुरावा हवा असेल तर जॉर्ज बुशला विचारा) अगदी आंतरराष्ट्रीय

स्तरावर कार्य करणारे असोत अथवा गल्लीतले भुरटे अपराधी असोत, ‘धंदा बेईमानी का जरूर है, लेकिन करना पडता

इमानदारीसे’, या तत्त्वज्ञानाला सगळे बांधील असतात. आपल्याकडे ज्याला नंबर दोनचा समजला जातो हा व्यवहार एक नंबरच्या

थोबाडीत मारेल एवढ्या प्रामाणिकपणे केला जातो. वरलीची छोटीशी चिठ्ठी हजारो – लाखो रूपयांचा बाऊन्स न होणारा धनादेश

ठरतो. हवालाद्वारे अगदी तोंडी शब्दांवर लाखोंचा हेरफार केला जातो आणि कुठेच हाक – बोंब होत नाही. दुर्जनांची भलावण

करण्याचा माझा हेतू नाही, परंतु सज्जनांमध्ये ज्या गुणांचा अभाव आढळतो त्याच गुणांच्या साहाय्याने हे मुठभर दुर्जन केवढा

उत्पात करू शकतात, हेच मला सांगायचे आहे. राजकारणापासून समाजकारणापर्यंतच्या कोणत्याही क्षेत्रात या दोन वृत्तींमधला

संघर्ष नेहमी पेटलेलाच असतो आणि नेहमीच संख्येने मुठभर असलेले दुर्जन उपरोल्लेखित गुणांच्या मदतीने सज्जनांसकट

सगळ्यांना वेठीस धरत असतात. समाजात, राजकारणात सज्जन लोकांची कमतरता नाही. मी तर असं म्हणेन की 90 ते 95

टक्के लोकं सज्जन असतात, परंतु ‘भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी?’ या न्यूनगंडाने आणि त्या न्यूनगंडातून

निर्माण

झालेल्या द्वेषाने बरेचसे पछाडलेले असतात. दुर्जनांशी सामना करण्याऐवजी आपापसातच स्पर्धा केल्यामुळे या सज्जनांनी

समाजाचे

खूप नुकसान केले आहे. जे सज्जन आहेत त्यांना स्वत:लाच आपल्या सज्जनतेविषयी आत्मविश्वास नाही. त्यामुळे

डोक्यात कोलाहल निर्माण झाला आहे. जे खपते ते विकण्याचा धंदेवाईक दृष्टिकोन ठेवणार्‍या प्रसारमाध्यमांनी हा गोंधळ अधिकच

किचकट केला आहे. एखादी व्यक्ती एकाच वेळी चंागली आणि वाईट दिसण्याची किमया या प्रसारमाध्यमांच्या कृपेने होत असते.

त्यामुळे सज्जन लोकं राहिले नाहीत, ही तक्रार रास्त ठरू शकत नाही. आपण एवढेच म्हणू शकतो की, सज्जन व्यक्ती दिसत

नाही कारण जग किंवा समाज आपल्याला ज्या दोन डोळ्यांच्या माध्यमातून दिसत असतात ते दूरचित्रवाणीचा छोटा पडदा आणि

वर्तमानपत्र ही दोन्ही माध्यमे आपल्याला ते दिसू देत नाही. कारण काहीही असो परंतु हे सत्य आहे. त्यामुळे जो सज्जन आहे

तो केवळ स्वत:लाच सज्जन समजतो. उर्वरित जग त्याच्यासाठी दुष्टांनी भरलेले असते. व्यापार, राजकारण अथवा

समाजकारणात आपल्याला स्वच्छ व्यक्ती आढळत नाहीत कारण ज्या व्यक्ती खरोखर स्वच्छ असतात त्यांना आपण दलदलीत

फसलो आहोत, असे वाटते. आपली स्वच्छताच आपल्या प्रगतीच्या आड येईल, अशी शंका त्यांना वाटते आणि त्याचमुळे अशा

व्यक्तींचा आत्मविश्वास डळमळतो. ‘ऊद ंा दी हदू ूद ंा’ अशा द्वंद्वात अडकलेल्या अशा व्यक्ती एकतर अनैतिकतेचा

‘राजमार्ग’ स्वीकारतात किंवा स्वत:पुरतेच मर्यादित असलेल्या स्वत:च्याच विश्वात हरवून जातात. स्वच्छ चारित्र्याचे लोक

राजकारणातही कमी नाहीत. परंतु अलीकडील काळात बदललेल्या संकेतानुसार हे राजकारणीसुध्दा स्वत:ची स्वच्छता सिध्द

करण्यासाठी इतरांवरच चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहेत.

सांगायचे तात्पर्य समाजात सुष्ट वृत्तीचे, सज्जन प्रवृत्तीचे लोकं भरपूर आहेत. परंतु त्यांच्या स्वत:च्याच संकल्पना स्पष्ट नाहीत.

आपण करतो ते योग्य, असा आत्मविश्वास त्यांच्यात नाही आणि सर्वाधिक खेदाची बाब म्हणजे आपल्या मार्गावरचे सहप्रवासी

ओळखण्याची, पारखण्याची दृष्टी त्यांच्यात नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम सुष्ट शक्तींच्या विखुरण्यात झाला आणि दुर्जनांचे

फावले. विजय नेहमी सत्याचा, सुष्ट शक्तीचा होतो हे सत्य असले तरी कोणताही विजय झोळीत दान म्हणून पडत नसतो.

त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि संघर्षदेखील एकट्याने करून चालणार नसतो, तो संघटित असावा लागतो. परंतु शेकडो

वर्षांची गुलामी आणि आता कथित स्वातंत्र्यातील लाचारीचा अनुभव घेतल्यानंतर देखील सज्जनांना संघटित प्रतिकाराची सुबुध्दी

होत नाही, ही खेदाची बाब आहे. समाजात अन्याय, अत्याचार, बेदिली माजण्यासाठी दुर्जन कारणीभूत नाहीत. तेवढी त्यांची

शक्ती नाही. परंतु कळपाने शिकार करून जंगली कुत्रे वाघाचासुध्दा फडशा पाडू शकतात, हे विसरता येणार नाही. विखुरलेले

सज्जन हीच दुर्जनांची खरी ताकद आहे. त्यामुळे ‘एकला चलो रे’ ही वृत्ती सोडून सर्व सज्जनांनी एकत्रित, संघटित व्हायला

पाहिजे. सकारात्मक विचार केला पाहिजे आणि आपली बाजू इतर कोणत्याही परिणामाची पर्वा न करता ठामपणे मांडली

पाहिजे.

दूर उडाली कबुतरे नभातूनी, गिधाडांचेच राज्य माजले आहे.सर्वत्र गाजवितो सत्ता दूर्जन, कारण आजचा सज्जन तटस्थ आहे.

आणि ह्यामुळे तटस्थता सोडून सज्जनानी एकत्रित येणे काळाची गरज आहे कारण शेवटी कुत्रे, कुत्रेच असतात, वाघ, वाघ असतो

आणि शेपूट घालणे वाघांचा नाही तर कुत्र्यांचा धर्म आहे.

— प्रकाश पोहरे

The incredibly powerful wave editing tools let mobile spy software https://spyappsinsider.com you sculpt your sounds

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..