नवीन लेखन...

५२ मोडी ५६ खोडी

मयेकराच्या शकल्याचा गेल्यावर्षीच लगिन झाला. कमनशिबी पोर… बेवडो घो आणी रोज बिनकारणाचे गाळी…. रांडेच्या ५२मोडीचा आसस वरती जोताच्या काटयेचो मार.. चार दिवसापूर्वी मायेराक ईल्ला रडान आजयेक सांगी होता… तिना कायतरी मंत्र दिल्यान… तसा ताबडतोब बाजार करून घराक गेला…. आणी सांजेक घोवाबरोबर शेंगदाण्याची भाटी करूक गेला… वायच आधिच गेला जोताच्या. ऊगाच गाळी नको म्हणान घोवान जोत बांधल्यान… चार तासा फिरली वाप्यात.. आणि नांगराच्या तासात कायतरी दिसला तेका…. बघून आराडलोच…. गो रांडेच्या वाप्यात इस्वन गावलो…. बघ तरी… मरांदे ती नडणी… तू ह्यो घे आणि घराक चल पयला…. तिनसानाक भाजून ठेव….

शकला गप मासो ऊचलून पुडच्या निर्गतीक वाटेक लागला….. घो खुषीत… भरडार इस्वन गावलो मस्करी हा काय?…… तिनसाना ज्वात सोडल्यान आणि पयलो मायकडे जावन दोन क्वॉटर मारल्यान….. इस्वन आसा तर एक एक्स्ट्रा…….

ईलो आट वाजता डुलत घराक… आनी सुरवात केल्यान…. रांडेच्या जेवक वाड…. शकल्यान पिटी आणी पाल्याची भाजी समोर ठेवल्यान… बघुन भिरकाटलोच काडल्यान हसोळेची काटी आणि केल्यान पेटूक सुरवात…… बावन मोडीचा रांडेचा अक्को इस्वन आपन खाल्यान आणि माका पिटी?……

शकल्यान अक्को अवाट जमा केल्यान बोंबटान…. आणी सांगल्यान ह्यो खुळावलो हा भरडार हेका ईस्वन गावलो म्हणान सांगता… आणी मारता माका … कंटाळलेल्या अवाटकारानी घोवाक पेट पेट पेटल्यानी… आनी गेले घराक…

शकल्यान मगे हळू घोवाक घरात नेल्यान ईस्वनाच्या भाजलेल्या तुकड्यानी भरलेला ताट पुड्यात ठेवल्यान. आणि घोवाच्या पाठीवरच्या वळांका हळद लावताना सांगल्यान माका ५२ मोडीचा म्हनतास ना?

मगे मीच पुरुन ठेवलय भरडार ईस्वन….. ही एक मोड दाखवलय… तर तुमची तर्हा बघा…. आणखी ५१ आसत, शाने आश्यात तर वापरूक लाव नको…..

आता शकला सुखान संसार करता… तसो तुमी करा…….

बापूर्झा
डॉ. बापू भोगटे

डॉ बापू भोगटे
About डॉ बापू भोगटे 13 Articles
डॉ बापू भोगटे हे पशुवैद्यकिय पदवीधर असून त्यांचा मुक्काम कोकणात कुडाळ येथे आहे. ते काजू आणि नारळ बागायतदार असून त्यांचा पोल्ट्री फार्मही आहे. ते गोदरेज अॅग्रोव्हेटचे डिस्ट्रीब्युटर आहेत. गेली २० वर्ष ते जंगल भ्रमंती करत आहेत. त्यांनी आता जंगल नाईट स्टे ऊपक्रम पर्यटकांसाठी सुरु केला आहे. ते स्वत:ला अगदी टिपीकल मालवणी ऊंडगो... माणूस.. असे म्हणवून घेतात. त्यांनी स्वयंसेवी संस्थांमार्फत पशुवैद्यकीय ऊपक्रमातून २००० लोकांना पोल्टी व डेअरी ट्रेनिंग दिले आहे. कोकणातील गावराहाटी याबाबत त्यांचा विशेष अभ्यास आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..