अनामिक जे होते पूर्वी,
साद प्रेमाची ऐकू आली ।
योग्य वेळ येतां क्षणी,
हृदये त्यांची जूळूनी गेली ।।१।।
शंका भीती आणि तगमग,
असंख्य भाव उमटती मनी ।
विजयी झाले ऋणानुबंध,
बांधले होते हृदयानी ।।२।।
उचंबळूनी दाटूनी आला,
हृदयामधला ओलावा ।
स्नेह मिळता प्रेम मिळाले,
जगण्यासाठी दुवा ठरावा ।।३।।
मनी वसविल्या घर करूनी,
क्षणीक सुखांच्या आठवणी ।
जगण्यासाठी उभारी देतील,
शरीर मनाच्या दु:खी क्षणी ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply