नवीन लेखन...

कृष्णधवल सिनेमा काळातील अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टूनटून

टूनटून यांचे खरे नाव उमा देवी खत्री होते. त्यांचा जन्म १ जानेवारी १९२३ रोजी झाला. १९४०-४५ चा काळ होता, रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी थापा पडल्या. डोअर बेल न वाजवता दारावर कोण सलग थापा मारतंय […]

पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर यांचा जन्म १ जानेवारी १९०० रोजी झाला. त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलिस अधिकारी होते, तसेच उत्तम सतारवादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट (कृष्णभट्ट होनावर) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांना […]

ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी

‘हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है’ या शोलेतल्या संवादाने व आपल्या अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांना रिझवणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी अनेक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी झाला. ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात सुद्धा असरानी यांनी काम केले आहे. संजीव वेलणकर पुणे. ९३२२४०१७३३ संदर्भ. इंटरनेट

बहुप्रसव लेखक राजा राजवाडे

राजा राजवाडे यांच्या वडीलाचं देवरूखला हॉटेल होतं. व पूर्वापार चालत आलेली निवे गावात शेती होती. त्यांचा जन्म १ जानेवारी १९३६ देवरूख जवळच्या निवे बुद्रुक येथे झाला. हा एक कौटुंबिक पार्श्वभूमीचा भाग आहे. बाबांचं मॅट्रिकपर्यंतच शिक्षण, देवरूखच्या‘न्यू इंग्लिश स्कूलमधून झाल्यानंतर, राजा राजवाडे पुढील शिक्षणासाठी मुंबईल आले. राजा राजवाडे यांचे शिक्षण मुंबईतील खालसा कॉलेज मधून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय […]

ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर

आज तब्बल साठहून अधिक वर्षांच्या तपश्चर्येतून संवादिनी या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि अनेक दिग्गज गायक-वादकांना आपल्या अलौकिक प्रतिभेने समर्थ साथ देऊन मैफली रंगविणारे ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर….. श्रुतीप्रधान भारतीय संगीतात मिंडयुक्त स्वर आणि श्रुती केवळ सारंगीसारख्या तंतुवाद्यातूनच मिळू शकतात, या कल्पनेने संवादिनीला दुय्यम वागणूक देण्यात येत असताना संवादिनीमधून स्वरविकास करून या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे […]

बलवंत संगीत मंडळीतील प्रमुख स्त्रीपार्टी नट मास्टर अविनाश

मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. त्यांचा जन्म १ जानेवारी १९०९ मिरज येथे झाला. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश […]

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे

श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा जन्म १ जानेवारी १६६२ रोजी झाला. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणार्या श्रीवर्धन या गावच्या या भट घराण्याकडे पिढीजात श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या गावांची देशमुखी होती. महादजी विसाजी भट यांच्यापासून भट घराण्याची माहिती मिळते. पेशव्यांच्या एका हकीकतीमध्ये महादजी विसाजींचे पुत्र परशुराम महादजी आणि नातू विश्वनाथ उर्फ विसाजी परशुराम हे […]

महर्षी व्यास, आणि महाभारतकालीन जीवनाचे कांहीं पैलू

महाभारत हें महाकाव्य भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. महाभारताचे मुळ रचयिते व्यास महर्षी आहेत, हें आपल्याला माहीत असतेंच. व्यास हे केवळ या ग्रंथाचे रचयिते नव्हते, तर त्यांचा त्याच्याशी प्रत्याप्रक्षपणें संबंधही आहे. आपण व्यासांबद्दल जरा माहिती करून घेऊं या; आणि त्याचबरोबर महाभारतकालीन जीवनाच्या कांहीं पैलूंकडेही नजर टाकूं या. […]

प्राणवायू – शिवशक्ती

सारेच आहे प्रभूमय, अणूपासून ब्रह्मांड होय…१, ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा, आकाश भाग हा ब्रह्मांडाचा….२, सर्वत्र व्यापले आकाश, न जाणती त्याचे पाश, ….३, वायूचा होवून संचार, जीव जंतू जगविणार….४ वायू असे शक्तीचे रूप, पेटवी तो प्राणदिप….५, प्राण आपल्या अंतरी, तोच असे रूप ईश्वरी….६ जसे शिव आणि शक्ती, तसे प्राण व वायू असती…७, बाहेरची वायू शक्ती, अंतरिच्या प्राणास […]

नववर्ष दिवस छे.. छे.. हा तर हिंदू विकृती दिवस

हिंदू धर्मावर केलीली टीका माझ्या मित्रांना आवडणार नाही पण क्रिश्चन नववर्षाची “वाट” आपल्या हिंदू लोकांनीच लावली आहे.आत्ताचा हिंदू समाज धड ना हिंदू धड ना क्रिश्चन असा बेगडी झाला आहे.कुणी हि विकृती आपल्या समाजात घुसवली हे कळत नाही.डी.जे चा धिंगाणा ,बेफाम दारू पिणे ,रस्त्यावर गोंधळ,आणि अनिर्बंध वागणूक हि आजच्या नव हिंदू संस्कृती ची ओळख झाली आहे. […]

1 21 22 23 24
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..