१८ सप्टेंबर १९५८ रोजी कॅरिबिअन द्वीपसमूहातील सेंट व्हिन्सेन्ट बेटांवर विन्स्टन वॉल्टर डेविसचा जन्म झाला. १९८२-८३ च्या हंगामात भारताविरुद्धच्या मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण साजरे केले. त्यानंतरचे विन्स्टनचे आयुष्य अत्यंत नाट्यमय राहिले.
१९८३ च्या विश्वचषकासाठी निवडल्या गेलेल्या संघात डेविसचा समावेश होता. साखळी सामन्यांमधील दुसर्याक – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या – सामन्यात तो खेळला आणि खणखणीतपणे त्याने आपले नाणेही वाजवले. लीड्स्वर ऑस्ट्रेलियाचे सात गडी त्याने एकट्याने केवळ ५१ धावा देऊन गारद केले. त्यानंतर २० वर्षे विश्वचषकातील कुठल्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी होती. साखळीतील पुढच्या चार सामन्यांमध्ये त्याचा समावेश होता पण त्या चार सामन्यांमधून त्याला अवघा एकच गडी बाद करता आला !
साहजिकच उपांत्य फेरीच्या सामन्यात आणि (भारताविरुद्धच्या) अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघात त्याला जागा मिळू शकली नाही. माल्क्म मार्शल, मायकल होल्डींग, जोएल गार्नर यांच्यासारखे गोलंदाज असताना त्याला जागा न मिळणे साहजिकही होते. त्यानंतर ग्लॅमॉर्गनकडून प्रथम श्रेणी हंगाम त्याने गाजवला.
धर्मावर डेविसची फार श्रद्धा. सेंट व्हिन्सेंटमध्ये नव्या चर्चच्या बांधकामासाठी एक जागा मोकळी करण्याच्या कामात त्याला अपघात झाला. झाडावरून पडल्याने त्याच्या मज्जारज्जूची भरून न निघता येण्याजोगी हानी झाली. कॅरिबिअन बेटांवर सोय नसल्याने उपचारांसाठी त्याला इंग्लंडमध्ये हलविण्यात आले. तो पुन्हा क्रिकेट खेळू शकला नाही. त्याला आर्थिक मदत देण्यासाठी अनेक सामने खेळविले गेले. सध्या तो वोर्सेस्टरशायरमध्ये स्थायिक आहे. ‘बिकॉज ऑफ यू’ नावाच्या चित्रपटात त्याने काम केलेले आहे.
१८ सप्टेंबर १९९७ रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबवर सुरू झालेला झिम्बाब्वे विरुद्ध न्यूझीलंड हा कसोटी सामना ‘भाऊगर्दी’साठी प्रसिद्ध आहे. झिम्बाब्वेच्या संघात सख्ख्या भावाभावांच्या तीन जोड्या होत्या. अॅन्डी आणि ग्रॅन्ट फ्लॉवर, ब्रायन आणि पॉल स्ट्रॅंग आणि गेविन आणि जॉन रेनी. पैकी गेविन रेनीचा
हा पदार्पणाचा सामना होता. आणखी एक
विक्रम होता होता वाचला – गाय विटल संघात होता आणि त्याचा भाऊ अॅ न्डी हा बारावा खेळाडू होता ! तोबा तोबा !!
ग्रॅन्ट फ्लॉवरने पहिल्या डावात १०४ आणि दुसर्याड डावात १५१ धावा काढल्या. जॉन रेनी आणि स्ट्रॅंगबंधू यांनी गोलंदाजी केली पण भावाच्या गोलंदाजीवर झेल पकडण्याची कामगिरी कुठल्या भावाने केली नाही.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply