नवीन लेखन...

स्त्रियांवरील अत्याचार आणि पुरूषांची मानसिकता…

देशात आणि राज्यात स्त्रियांवरील आत्याचार आणि बलात्कार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे देशभरात अनेक वाद नव्याने निर्माण होत आहेत. प्रसारमाध्यमे ही ते वाद चवीने चघळ्त आहेत. या सर्वात मुळ प्रश्न नेहमी सारखाच बाजुला पडत आहे. या सर्व घटनांसाठी पोलीस सुरक्षा सबंधी मंत्री आणि अधिकारी यांच्यासह खुद्द स्त्रियांनाही आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करून या समस्या सुटणार नाहीत. देशातील प्रत्येक सुजान नागरिकाने शांतपणे आणि विचारपूर्वक या समस्येकडे पाहायला हवे. देशभरातील स्त्रियांना आता असुरक्षित वाटू लागत असल तरी आपल्या देशात स्त्रियांची सुरक्षितता, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यांच्यावर होणारे बलात्कार या तिन्ही गोष्टींकडे थोड्या वेगवेगळ्या दृष्टीने पाहायला हवे. या तिन्ही प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी एकच मार्ग अवलंबता येणार नाही.

स्त्रियांच्या असुरक्षिततेचा विचार करता देशात फक्त स्त्रियाच असुरक्षित आहेत असं नाही. देशभरात सुरक्षे अभावी कित्येक पुरूषांनाही आपले प्राण गमवावे लागता आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एका घटनेत रस्त्याने चालणार्‍या एखाद्या स्त्री च्या गळ्यातील दागिना बाईकवरील एका चोराने हिसकावला आणि दुसर्‍या घटनेत एका पुरूषाने एका स्त्रीवर बलात्कार केला. या दोन्ही घटनात स्त्रीवर अन्याय करणारा पुरूषच असला तरी बलात्काराच्या घटनेत बलात्कार करणारा पुरूष आहे आणि चोरीच्या घटनेत चोरी करणारी एक प्रवृत्ती आहे. या दोन्ही घटना एकाच तराजूत नाही तोलता येणार हे येथे लक्षात घ्यायला हवे. स्त्रियांवर होणार्‍या कौटुंबिक आत्याचाराला जेवढे पुरूष जबाबदार आहेत तेवढ्याच स्त्रियाही जबाबदार आहेत कारण कायद्याच्याच भाषेत सांगायच झालं तर अन्याय करणार्‍या इतकाच अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो.

बलात्कार हा एकमेव गुन्हा आहे जो फक्त पुरूषांकडून स्त्रियांच्या बाबतीत केला जातो. या गुन्हयासाठी आपल्या देशात दिली जाणारी शिक्षाही त्यामानाने कठोरातील कठोरच आहे. अस असतानही आपल्या देशात बलात्काराच प्रमाण दिवसेन – दिवस वाढतच आहे याचा अर्थ असा होता की बलात्कारासारखा गुन्हा करणार्‍याला आता कायद्याचे आणि शिक्षेचे भय उरलेले नाही हे तर अधिकच भयंकर आहे.

स्त्रियांचा पोशाख, वाढता चंगळ्वाद, वाढती अधूनिकता बलात्कारासारख्या घटना घडण्याला कारणीभूत आहेत अस वरवर जरी वाटत असल तरी त्यात तथ्य नाही. पुरूषांची बदलती मानसिकता या सर्व घटनांच्या मुळाशी आहे. पुरूष हा स्त्री पेक्षा श्रेष्ठच आहे ही मानसिकता आपल्या देशातील पुरूष आजही सोडायला तयार नाही आणि हाजोरो वर्षापूर्वीपासूनची पुरूषांची गुलामगिरी पूर्णपणे नाकारायला आपल्या देशातील स्त्रियाही तयार नाहीत. जी प्रसारमाध्यमे स्त्रियांवर अन्याय- अत्याचार झाला की रान पेटवितात. तिच प्रसारमाध्यमे नकळ्त स्त्रियांच्या पुरूषांप्रती गुलामगीरीला काही अंशी खतपाणीच घालतात हे सत्य नाकारता येणार नाही. देशभरात स्त्रियांवरील वाढत्या आत्याचारासाठी सरसकट सर्व पुरूषांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करण योग्य होणार नाही कारण स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्यावर अत्याचार करणार्‍या अत्याचार्‍यांचा नाश करण्यासाठी लाखो परूषांनी आपले प्राण संकटात टाकले आहेत हे विसरून चालणार नाही. स्त्रियांवर अत्याचार करणारा एक पुरूष असतानाही आपले संरक्षण करण्याची जबाबदारी दुसर्‍या पुरूषानेच घ्यायला हवी अशी अपेक्षा स्त्रियांनी करणे ते ही स्त्री- पुरूष समानतेच्या काळात योग्य नाही. आता आपल्या देशातील प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच घ्यायला हवी, देशातील प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षणासाठी सज्ज असायलाच हवं. आपल्या देशात हजारो वर्षात स्त्रीची जी प्रतिमा तयार झालेली आहे ती आता बदलायला हवी. पुरूषांसारखाच आपल्या डोळ्यातील अश्रूंवर ताबा मिळवायला हवा. आपल्या देशातील स्त्रियांवरील आत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातील पुरूषांवी मानसिकता बदलायला हवी. नग्नता अश्लिलता ही प्रत्यक्षात नसते, ती पाहणार्‍याच्या नजरेत असते. त्यामुळे परूषांनी प्रथम स्त्रियांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीत आणि दृष्टीकोणात बदल करायला हवा. आज स्त्रिया प्रत्येक बाबतीत, प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खाद्याला खांदा लावून चालत असताना जी कामे खास स्त्रियांची म्ह्णून समजली जातात ती सर्वच्या सर्व कामे करण्याची मानसिक तयारी आज आपल्या देशातील किती पुरूषांची असते. आजही आपल्या देशातील सुशिक्षीत मालींना नवरा आपल्यापेक्षा जास्त शिकलेला आणि जास्त कमावणारा हवा असतो ही मानसिकता काही अंशी स्त्रियांनी ही बदलायला हवी. पुरूषांनाही धुणी-भांडी करताना आता लाज वाटून चालणार नाही त्यासाठीची मानसिक तयारी आज पुरूषांनी करायलाच हवी. पुरूषार्थ वगैरे गोष्टी काळाच्या ओघात कधीच मागे पडल्या आहेत. आता आपल्या देशातील पुरूषांना संस्कृती आणि संस्कार यांच गाठोड फार काळ वाहता येणार नाही आणि वाहायचच असेल तर त्या गाठोड्यात आणखी भर घालावी लागेल. स्त्रियां एकवेळ पुरूषांची बरोबरी करूही शकतील पुरूष कधीच करू शाकणार नाहीत कारण पुरूषांना जन्माला घालणार्‍या स्त्रीला मात्र ते कधीच जन्माला घालू शकणार नाहीत. देशभरात स्त्रियांवर होणारे अत्याचारांना आळा घालायचा असेल तर भारतीय पुरूषांच्या मानसिकतेचा नव्याने अभ्यास करून त्यांची पुरूषी मानासिकता बदलण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत.

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

1 Comment on स्त्रियांवरील अत्याचार आणि पुरूषांची मानसिकता…

  1. माझ्या बहिणीच्या घरात जाऊन डोक्यात विट मारली आणि ती गंभीर जखमी झाली व बेशिस्तपणे पडली मग मेडिकल झाले गुन्हा दाखल करण्यात आला पण मात्र समोरच्या व्यक्तीला काही पण झाले नाही फक्त कारवाई केली जाईल असे सांगितले जाते आज वीस दिवस उलटून गेले तरीही कोणालाही अटक करण्यात आली नाही

Leave a Reply to सचिन कडू Cancel reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..