नवीन लेखन...

औषधनिर्मितीत बचतगट

सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात मोडणारा जव्हार तालुका. या तालुक्यात आदिवासींची संख्या ही अधिक आहे. दर्‍या-डोंगर, झाडे झुडपांनी बनलेल्या या जव्हार तालुक्यातील दुर्गम भागात खडतर जीवन जगणार्‍या महिलांनी मेहनत व जिद्दीने बचत गटाच्या माध्यमातून गुणकारी औषध निर्मिती करून नावलौकिक मिळविला आहे.

दर्‍या, डोंगरात राहणारा आदिवासी मुलभूत गरजा भागविण्यासाठी निसर्गाशी झगडत असतो. पावसाच्या पाण्यावर शेती व्यवसाय चालत असल्याने बारमाही काम मिळत नाही. म्हणून मोलमजुरी करून कशीबशी उपजिविका चालविणारे अनेक कुटूंबे या भागात दिसून येतात. वेळप्रसंगी गाव सोडून रोजगारासाठी इतरत्र ही स्थलांतर करीत असतात. अशाही बिकट परिस्थितीत चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर जव्हार तालुक्यातील जेमतेम ७५० लोकसंख्येच्या न्याहाळे खुर्द गावातील १५ महिला एकत्र आल्या इंदिरा स्वंयसहाय्यता महिला बचत गट स्थापन केला. सध्या या बचतगटाच्या अध्यक्षा लिलाबाई जाबर या आहेत. खुरासणीचे तेल बनविणे सुरु केले. या महिलांची कष्ट करण्याची तयारी लक्षात घेऊन त्यांना प्रारंभी बायफ या संस्थेमार्फत मार्गदर्शन मिळू लागले. तालुक्याच्या ठिकाणी होणार्‍या बैठकींना जाताना या तेलाचे महत्व पटवून देऊन तेथे विक्री होऊ लागली. यातूनच त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. निरगुडी तेल व जास्वंदी तेल बनविण्याचे मार्गदर्शन पंचायत समिती जव्हार मधून त्यांना मिळाले. बघता-बघता या औषधांना मागणी वाढली आणि या बचतगटास अर्थाजनाचे एक साधन उपलब्ध झाले.

या बचतगटातील महिला काही अशिक्षित तर काहींचे शिक्षण ७ वी पर्यंत असतानाही त्यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे निरगुडी, एरंड, धोतरा, रुई या वनस्पती उखळीत कुटून त्याचा रस काढून सांधेदुखी, पाठदुखी व गुडघेदुखीवर गुणकारी औषध तयार केले. या औषधाची १०० मि.ली. ची बाटली १० रुपयापासून विकून आता ४० रुपयाला विकली जात आहे. ही गुणकारी औषधी नाशिक येथील एका आयुर्वेदीक दवाखान्यात पुरविली जाते.

त्याच बरोबर या औषधाचा गुण पाहता शहरातील इतरांकडूनही त्यांच्याकडे मागणी येत आहे. अशा या औषधाबरोबर केसावर गुणकारी असे जास्वंदी तेल ही बनविणे या महिलांनी सुरु केले. त्याला ही मागणी येऊ लागली.

शेती, मोलमजूरी करणा-या महिलांपैकी या बचतगटात ११ महिला दारिद्रयरेषेखाली व ४ महिला दारिद्र्यरेषेवरील असून स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत हा बचतगट स्थापन केला आहे. आत्मविश्वास, जिद्द , मेहनत व नाविण्यपूर्ण करण्याची प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर या बचत गटाने या व्यवसायाबरोबर गाय, म्हशी, शेळी पालन, हळद, मिरची तयार करणे, दुध डेअरी स्थापन करून दुग्धव्यवसाय करणे आदि सारखे जोड व्यवसाय ही सुरु करून स्वत:बरोबर इतरांना ही रोजगार मिळवून दिला आहे. न्याहाळे खुर्द गावात ग्रामपंचायतीच्या वतीने नवदिशा स्वयंसहाय्यता महिला बचतगटाचा महासंघ ही स्थापन केला आहे. त्यांच्या माध्यमातून ही महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मोलमजपरीसाठी इतरत्र स्थलांतरीत करणारे कुटूंबे आज गावात रोजगार मिळवून उदरनिर्वाह चालवित आहे. म्हणून आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्यासाठी खेडया-पाडयातील बचतगट महत्वाची भूमिका बजावत आहे.

(महान्यूजच्या सौजन्याने)

— बातमीदार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..