नवीन लेखन...

आत्महत्या का वाढता आहेत ?

आत्महत्येच्या बातम्या आता सर्रास वाचायला आणि पहायला मिळतच असतात वर्तमानपत्र आणि टी.व्ही.च्या माध्यमातून. पूर्वी आत्महत्येच्या बातम्या लोकांना व्यतीत करायच्या पण ह्ल्ली त्या बहुदा तश्या करत नसाव्यात. आता समाजात सामूहीक आत्मह्त्येच प्रमाणही वाढू लागलय. लोकांच्या आत्मह्त्ये बाबत आता समाजमनही उदासिन होऊ लागलय. त्यामुळेच की काय हल्ली शेतकर्यांच्या आत्महत्येचा विषयही मागे पडलेला दिसतो निवडणूका तोंडावर असतानाही. त्यात नियमित होणारे अपघात आणि त्यात कधी – कधी नाहक जीव गमावणारे शेकडो लोक या शेकडो लोकांच्या मृत्यूच्या बातमीपुढे एखाद्याच्या आत्मह्त्येला महत्व ते काय मिळणार. वाढती लोकसंख्या, वाढती बेकारी आंणि वाढत्या सामाजिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांमुळे लोक इतके हैराण झाले आहेत की त्यांचा सामना करण्या ऐवजी लोकांना आत्महत्या करणे अधिक सोप्पे वाटू लागले आहे. लोकांना आत्मह्त्या करण्याला कधी – कधी प्रेमभंगासारखी फुटकळ कारणेही पुरेशी ठरतात हा भाग वेगळा.

आपल्या देशात जे आत्महत्येच प्रमाण वाढतयं त्यात शहरी भागात आत्मह्त्या करणार्यांच प्रमाण लक्षणीय आहे. याचा अर्थ ग्रामिण भागात आत्मह्त्या होतच नाही असा होत नाही. मानसिक समस्यांचा सर्वाधिक सामना शहरी भागात राहणार्या लोकांनाच करावा लागतो हे ही एक कारण असेल शहरी भागात वाढ्त्या आत्मह्त्यांमागे. आपल्या देशातील सर्वच क्षेत्रातील स्पर्धा आता जीवघेणी झाली आहे. आपल्या देशातील वाढत्या आत्मह्त्यांना आपल्या देशातील भ्रष्टाचार आणि राजकारणी मंडळीच जबाबदार आहेत असं जर कोणी म्ह्टलं तर त्यात तथ्य नाही. शहरातील वाढती लोकसंख्या आणि गावातील वाढती आधूनिकता याच्या मुळाशी आहे. आत्महत्या करणे पाप आहे हे मान्णारी पिढी आत्मह्त्या करण्यापासून स्वतःला परावृत्त करण्यासाठी सक्षम होती.
पण आजची पिढी पाप- पूण्य मानतच नाही .खाईन तर तुपाशी नाहीतर राहिण उपाशी अशी मानसिकता सध्याच्या पिढीची तयार झालेली आहे. आनंदाचा भरभरून उपभोग त्यांना घेता येतो पण दुःखा ची छोटीशी जाणिवही त्यांना कोळ्मडून टाकते. आपल्यानंतर आपल्यावर अवलंबून असणार्यांच्या वाट्यालाही दुःख येऊ नये असा विचारही बळावू लागतो, ज्यामुळे समाजात सामूहीक आत्मह्त्येच प्रमाणही वाढतय. अगदी कोठ्याधीश आणि सुप्रसिध्द असणारे लोकही जेंव्हा आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. तेंव्हा त्यांच्या आत्मह्त्येच्या बाबतीतही काही लोक नकारात्मक विचार करू लागतात. की इतक्या मोठ्या व्यक्तींच्या मनात जर आत्मह्त्येचा विचार येऊ शकतो तर आमच्या मनात आला यात काय आश्चर्य.

आत्महत्या करणे म्ह्णजे कित्येकांना हल्ली सर्व त्रासातून मोकळ होण्याचा सोप्पा आणि सरळ मार्ग वाटू लागला आहे. खंर म्हणजे माणसाला आत्मह्त्या करण्यास कारणीभूत ठरावी अशी समस्या या जगात अस्तित्वातच नाही. माणसाची चूकीची विचारसरणीच त्याला आत्मह्त्या करण्यास प्रवृत्त करते. ह्ल्ली प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हलकासा का होईना आत्मह्त्येचा विचार येऊन गेलेला असतोच. सध्याच्या परिस्थितीत आत्मह्त्या करणे हे पाप आहे आणि आपल्याकडून ते पाप कोणत्याही परिस्थितीत होता कामा नये असा प्रत्येकाने मनाशी ठाम निर्धार केला तरी होणार्या आत्मह्त्यांच्या प्रमाणात थोडी घट होईल अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही.

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..