नवीन लेखन...

निवडणूका आटोपल्या – सरकार आलं – पुढं काय?

लेखक : वैभव भालेराव 

निवडणूका आटोपल्या, बहुमत देखिल सिद्ध झाले. सरकार पण स्थापन झाले. आता तुम्ही म्हणाल यात नवीन ते काय नेमेची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे लोकशाही मध्ये निवडणुका ह्या केवळ जत्रेचे स्वरूप बनून रहिल्या आहेत, हि केवळ माझीच नव्हे तर माझ्यासारख्या अनेक तरुणांची हीच मनोवस्था आहे.

येणार्‍या 1 मे ला महाराष्ट्र राज्य आपले सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करीन त्यावेळी आपण अनेक गोष्टींचा विचार करायला हवा त्यातली एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे राज्याचे राजकारण. खरेच महाराष्ट्राचे राजकारण योग्य दिशेने चालले आहे का याचा उहापोह करणे अत्यंत गरजेचे आहे.

1960 साली मुंबईच्या शिवाजी पार्कात महाराष्ट्र राज्याचा सुवर्णकलश हाती घेताना ना. यशवंतराव चव्हाणांकडे प्रगत, आत्मनिर्भर राज्याचे जे व्हिजन होते ते आज कुणातहि दिसत नाहि. गेल्या 6 दशकांपासुन आजही केवळ बिजली, सडक, पाणी या त्रयींवरच निवडणूकीचे प्रचार केले जातात. नवे विषयच नाहित. दहशतवादाने राष्टीय सुरक्षेला जे खिंडार पाडले आहे, नक्षलवादाचा मुद्दा आ वासून उभा असताना तो निवडणुकिच्या प्रचारात महत्वाचा मुद्दा का बनत नाहि याचा विचार आपण का करत नाहि? असे एक ना अनेक मुद्दे आहेत कि जे सोडवणे खुप महत्वाचे आहे.

1960 च्या दशकात शरदराव पवार आणि त्यांच्या जोडिला बाळासाहेब ठाकरे यांनी काहि काळापुरता का होइना लोकांमध्ये प्रगतीचा विश्वास निर्माण केला खरा पण ती आशा ही फोल ठरली. नंतरचा क़ाळ पाटिलकिच्या राजकारणाने गाजवला. परंतू गेल्या काहि वर्षात मात्र बरेच बदल घडून आल्यचे दिसुन येते आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर प्रकर्षाने जाणवुन येतो.

आधी जे सरदार होउन गेले ते गेले पण जाताना वारस मात्र देऊन गेले ते चुलत भावांचे आणि गांधी घराण्यापासुन सुरु झालेली परंपरा थेट ठाकरे कुटुंबाकडुन पवार घराण्यात येऊन पोहोचली, कुणास ठाउक अजुन अशी किती घराणी पहायला मिळणार आहेत. सर्व जण आपआपल्या पिलांना राजकारणात शिरस्थावर होण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करताहेत पण भविष्यातला महाराष्ट्र कुणाच्याच अजेंड्यावर नाहि, याला नेमके म्हणायचे तरी काय?

आज राजकारणात राज ठाकरेंच्या नावाचा चर्चा आहे. ते म्हणताहेत त्याप्रमाणे जर त्यांना त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकारायचा असेल तर तो नेमका कसा असेल याबद्दल काहिहि ठोस असा कार्यक्रम नाहि ( भय्यांना धुण्याचा सोडून ). सरकारी नोकर्‍यांची भरतीच्या बातम्या म्हणे मराठी मुलांना माहित नाहि पडत आणि नेमके याच मुद्याचे राजकारण करुन वातावरण तापवले जाते. जर खरेच इथल्या भुमीपुत्रांची काळजी अस्ती तर त्यांनी मुलांना employment news हा भारत सरकारचा पेपर वाचण्याचा सल्ला दिला असता पण तसे केले असते तर रस्त्यावर दगड मारायला मुले तरी कुठुन मिळाली असती !

एक आपले अजुन एक वारसदार , मनाने चांगले आहेत, आपल्या शांत जीवनशैलीवर मनापासुन प्रेम करणारे आणि सर्वहारा बळिराजाचे दु:ख कॅमेर्‍यातुन टिपणारे उद्धव ठाकरे पण शेतकर्‍यांसाठी ठरावीक हमी देणारी योजना देखील मांडु शकले नाहित याचेच आश्चर्य वाटते.

प्रश्न राहता राहिला तो दोन्ही कॉग्रेसचा तर तिथे फक्त लॉबिंग जोरदार असली कि सर्वकाहि निभावून जाते, पॅकेज जाहिर करण्याचा तर जणू काहि सुकाळच असतो पण तो पैसा गरजवंताची गरज कोणत्या मार्गाने पुर्ण करील याबद्दलचे कोणतेच नियोजन नसते.

शिवरायांच्या या पवित्र कर्मभूमीत त्यांच्याच नावाने जो काळाबाजार केला जात आहे ते पाहुन आज शिवरायांनाच मान खाली घालावी लागली असती. ज्या फुले- शाहु – आंबेडकरांच्या नावाने पुरोगामी राज्याचे पाईक असल्याची वल्गना करणार्‍य़ा राज्यातील नेत्यांनी बुवाबाबांच्या नावाने जी अक्कल पाझरली आहे ती सर्वश्रुत आहे.

थोड्क्यात काय कोणत्याही नियोजनाअभावी महाराष्ट्राची आगेकुच न होता केवळ पीछेहाट होत आहे हे लक्षात घ्यायला हवे आणि याबाबत जर इथल्या कॉंग्रेसी सरकारने गुजरातेतल्या मोदि सरकारच्या औद्योगिक धोरणांचा (च फक्त अन्य धोरणांचा मुळिच नको ) आदर्श घेण्यात गैर ते काय ?

पण तसे होणार तरी कसे , लोकशाहिच्या आशिर्वादाने एकदा निवडून दिलेले प्रतिनिधी पुन्हा बोलावण्याचा अधिकार आपल्याला नसतो म्हणुन येणारी पाच वर्षे हात चोळत बसण्या पेक्षा उद्याच्या महाराष्ट्र प्रगत आणि आत्मनिर्भर करण्याकरता आपण आत्ताच नियोजन सुरु करायला हवे आनि ते हि एकदम निरपेक्ष भावनेने.

नहितर पुन्हा एकदा ह्याच ओळी म्हणण्याची पाळी येईन,

धन्य ते शोषक,अन धन्य ती शोषकांची लोकशाही अंध दळत राहि अन कुत्रं पीठ खाई

— वैभव भालेराव

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..